News Flash

नोकरीची संधी

करोनाच्या स्थितीमध्ये सुधार न झाल्यास परीक्षापूर्व प्रशिक्षण घेतले जाणार नाही.

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२२-२३ मधील एकूण रिक्त ५,८३० पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP Clerks-XI) ऑगस्ट २०२१/सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२१ मध्ये आयोजित करणार आहे.

CRP Clerks-XI मधील सहयोगी बँका –

(१) बँक ऑफ इंडिया, (२) बँक ऑफ महाराष्ट्र, (३) पंजाब अँड सिंध बँक, (४) युको बँक, (५) युनियन बँक ऑफ इंडिया, (६) इंडियन ओव्हरसिज बँक, (७) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, (८) बँक ऑफ बरोडा, (९) कॅनरा बँक, (१०) इंडियन बँक आणि (११) पंजाब नॅशनल बँक.

महाराष्ट्रातील रिक्त पदे – एकूण ७९९.

(१) बँक ऑफ इंडिया – २०६ पदे (अजा – २०, अज – १८, इमाव – ५५, ईडब्ल्यूएस् – २०, खुला – ९३).

(२) कॅनरा बँक – ४६ पदे (अजा – ४, अज – १७, इमाव – ८, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १४).

(३) पंजाब अँड सिंध बँक – १६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ९).

(४) UCO बँक – ३३ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १३).

(५) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – १७७ पदे (अजा – २४, अज – २०, इमाव – ४८, ईडब्ल्यूएस् – १६, खुला – ६९).

(६) युनियन बँक ऑफ इंडिया – ३२१ पदे (अजा – १८, अज – ३९, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – ५२, खुला – २०३).

गोव्यातील रिक्त पदे – एकूण ५८ पदे.

(१) बँक ऑफ इंडिया – ११ पदे.

(२) कॅनरा बँक – ७ पदे.

(३) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – १५ पदे.

(४) युनियन बँक ऑफ इंडिया – २५ पदे.

महाराष्ट्रातील सहयोगी बँकांमधून BOB, Bank of Maharashtra, Indian IBPS ‘ आणि IBPS यांनी रिक्त पदांचा तपशील कइढर ला कळविलेला नाही. IOB यांनी शून्य पदे कळविली आहेत.

पदाचे नाव – क्लर्क.

पात्रता – अर्ज करण्याच्या दिवशी – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२१ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षे; अजा/अज – ३३ वर्षे; दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे; विधवा/परित्यक्ता/कायद्याने विभक्त महिला – ३५/३८/४० वर्षे).

परीक्षापूर्व प्रशिक्षण – सहयोगी बँका अजा/अज/दिव्यांग/अल्पसंख्याक/माजी सैनिक उमेदवारांना परीक्षापूर्व प्रशिक्षण मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर दि. १६ ऑगस्ट २०२१ पासून आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी. करोनाच्या स्थितीमध्ये सुधार न झाल्यास परीक्षापूर्व प्रशिक्षण घेतले जाणार नाही.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांसाठी रु. १७५/- आणि इतर उमेदवारांसाठी रु. ८५०/-.

ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन दि. २८/२९ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर २०२१ रोजी.

ऑनलाइन मुख्य परीक्षा – दि. ३१ ऑक्टोबर २०२१.

निवड पद्धती – सीआरपी ऑनलाइन परीक्षा – (अ) पूर्व परीक्षा – (१) इंग्लिश भाषा – ३० प्रश्न, ३० गुण. (२) न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. (३) रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. प्रत्येक टेस्टसाठी वेळ प्रत्येकी २० मिनिटे. एकूण ६० मिनिटे.

(ब) मुख्य परीक्षा – १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे. (i) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे; (ii) जनरल इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; (iii) रिझिनग अ‍ॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अ‍ॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे; (iv) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे.

प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.

इंडियन नेव्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स इन इलेक्ट्रिकल ब्रँच एन्ट्रीकरिता अविवाहित पुरुष उमेदवारांची जानेवारी, २०२२ पासून सुरू होणाऱ्या नेव्हल ओरिएन्टेशन कोर्ससाठी प्रवेश. (SSC Electrical Branch (General Service) JAN २०२२ COURSE)

पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर इन इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सर्व्हिस) – ४० पदे.

पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/पॉवर इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन/अ‍ॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन/इन्स्ट्रमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रमेंटेशन/अ‍ॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६०%गुणांसह उत्तीर्ण.

(पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्यांना अंतिम निकाल १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करावा लागेल.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९७ ते १ जुलै २००२ दरम्यानचा असावा.

COVID-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे Jan–२२ कोर्सकरिता INET (०) एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी एसएसबी मुलाखतमधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

NCC-‘C’ सर्टिफिकेटधारक उमेदवारांना एसएसबीकरिता शॉर्ट लिस्टिंग करताना गुणात ५%ची सूट दिली जाईल. (किमान ६०% गुणांची अट लागू असेल.)

(i) NCC ‘C’ सर्टिफिकेट किमान ‘बी’ ग्रेडमधील

(ii) आर्मी/नेव्हील/एअर विगच्या सीनियर डिव्हिजनमधील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

(iii) NCC ‘C’ सर्टिफिकेट ३० जुलै २०१८ पूर्वी जारी केलेले नसावे.

(iv) NCC ‘C’ सर्टिफिकेटची वैधता DGNC/संबंधित NCC युनिटकडून तपासल्यानंतरच अंतिम निवड केली जाईल.

शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा कालावधी १० वर्षांचा असेल. जो आणखी ४ वर्षांनी (२ + २ वर्षे) वाढविला जाऊ शकतो.

निवड पद्धती – पात्रता पदवीच्या ५ व्या सेमिस्टर्सपर्यंत मिळालेल्या गुणांच्या

आधारे SSB मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जाईल.

एसएसबी मुलाखत सप्टेंबर, २०२१ मध्ये बंगलोर, भोपाळ, विशाखापट्टणम्, कोलकाता या केंद्रांवर होतील.

मेडिकल टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची एसएसबी मुलाखतमधील कामगिरीवर आधारित मेरिट लिस्ट बनविली जाईल.

प्रशिक्षण – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर तनात करून २२ आठवडय़ांचे नेव्हल ओरिएंटेशन कोर्स   INA, इझिमाला येथे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.

ऑनलाइन ई-अ‍ॅप्लिकेशन www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. ३० जुलै २०२१ पर्यंत करावेत. (सोबत आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या स्कॅण्ड् प्रती अपलोड करणे अनिवार्य आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:01 am

Web Title: job opportunity in india job opportunities in maharashtra zws 70
Next Stories
1 आर्थिक विकास : तोंड ओळख
2 नोकरीची संधी
3 नोकरीची संधी
Just Now!
X