23 October 2020

News Flash

नोकरीची संधी

शिवाय पुस्तकांसाठी एका वेळेला रु. १८,०००/- दिले जातील

प्रतिनिधिक छायाचित्र

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

*   भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (DAE), भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) ट्रेनिंग स्कूल्स ‘सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप-ए)’ पदांच्या भरतीसाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स यांना ‘ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर’ (TSO) पदावर १ वर्षांच्या ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (TSO-२०२०)

(सन २०२०-२१) प्रशिक्षणकरिता पुढील BARC ट्रेनिंग.

स्कूल्समध्ये प्रवेश (BARC, मुंबई;

IGCAR, कल्पक्कम;, NFC हैद्राबाद;

NFC, इंदोर; AMD,, हैद्राबाद)

ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर (TSO) ट्रेनिंग पूर्ण करताना किमान ५०% गुण मिळवतील अशा उमेदवारांनी ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे जाहिर केले जाईल. यशस्वी e TSO’s ना ‘सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी’ पदावर पुढीलपकी एका DAE युनिटमध्ये तनात केले जाईल. (१)  BARC, मुंबई; (२) IGCAR, कल्पक्कम; (३) RRCAT,, कल्पक्कम; (४) VECC, कलकत्ता; (५) HWB, मुंबई; (६) NFC, हैद्राबाद; (७) BRIT, मुंबई; (८) NPCIL,, मुंबई; (९) BHAVINI,, कल्पक्कम; (१०) AMD, हैद्राबाद; (११) UCIL, जादूगुडा, (१२) DCS & EM,, मुंबई.

प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ५५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. शिवाय पुस्तकांसाठी एका वेळेला रु. १८,०००/- दिले जातील.

वेतन – ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी पदावर

रु. ९५,०००/- दरमहा वेतन दिले जाईल.

ट्रेिनगमधील कामगिरीवर आधारित ट्रेनीजना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा दिला जाईल. शिवाय ट्रेनिंग दरम्यानच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांना होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (HBNI) मध्ये एम.टेक./पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाईल.

पात्रता –

(अ) इंजिनिअरिंग विद्याशाखा – पुढील ९ पकी एका विद्याशाखेतून इंजिनिअरींगमधील पदवी (B.E./B.Tech..) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(१) मेकॅनिकल (कोड-२१),

(२) केमिकल (कोड-२२),

(३) मेटॅलर्जी (कोड-२३),

(४) इलेक्ट्रिकल (कोड-२४),

(५) इलेक्ट्रॉनिक्स (कोड-२५),

(६) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (कोड-२६),

(७) इन्स्ट्रमेंटेशन (कोड-२७),

(८) सिव्हिल (कोड-२८),

(९) न्यूक्लियर इंजिनिअरिंग (कोड-२९),

(१०) फास्ट रिअ‍ॅक्टर टेक्नॉलॉजी-एम

(ही एक वेगळी विद्या शाखा नसून मेकॅनिकल आणि केमिकल इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे) (कोड-३०),

(११) फास्ट रिअ‍ॅक्टर टेक्नॉलॉजी (कोड-३१) (ही एक वेगळी विद्या शाखा नसून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे.)

(१२) क्वालिटी अ‍ॅश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल (कोड-३२) (ही एक वेगळी विद्याशाखा नसून मेकॅनिकल आणि मेटॅलर्जी इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे.)

(ब) सायन्स विद्याशाखा – संबंधित विद्याशाखेतून (एम.एस्सी.) पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. बी.एस्सी.लासुद्धा किमान सरासरी ६०% गुण आवश्यक.

(१) फिजिक्स (कोड-४१),

(२) केमिस्ट्री (कोड-४२),

(३) बायोसायन्सेस (कोड-४३),

(४) रेडिओलॉजिकल सेफ्टी अँड एन्व्हिरॉनमेंटल सायन्स (RSES) (कोड-४४) (फिजिक्स, केमिस्ट्री आणि न्यूक्लियर इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम),

(५) जीऑलॉजी (कोड-४५).

GATE स्कोअर आधारित निवडीसाठी ऑप्शन दिलेल्या एम.एससी. उमेदवारांकडे  GATE-2019/GATE-2020  चा संबंधित विषयातील व्हॅलिड स्कोअर असणे आवश्यक. एम.एस्सी. (बाय रिसर्च) किंवा पीएच.डी. उमेदवार पात्र नाहीत.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२० रोजी २६ वष्रे (खुला गट), २९ वष्रे (इमाव), ३१ वष्रे (अजा/अज), ३६ वष्रे (विकलांग).

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (महिला/अजा/अज/विकलांग यांना

फी माफ आहे.)

निवड पद्धती – मुलाखतीसाठी निवड दोन पद्धतीने केली जाते.

(१) ऑनलाइन निवड चाचणी ((OCES))

(९ इंजिनिअरिंगच्या शाखा (कोड क्र. २१ ते २९) आणि चार सायन्समधील शाखांमधील प्रवेशासाठी (कोड क्र. ४१ ते ४३ आणि ४५)). देशभरातील ४० केंद्रांवर मार्च/एप्रिल, २०२० मध्ये घेतली जाईल.

(२) GATE स्कोअर – GATE-2019/GATE-2020 स्कोअरवर आधारित उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.

ज्या उमेदवारांना एम.एस्सी. (इंटिग्रेटेड) चा स्कोअर ७.५/१० च्या स्केलवर पेक्षा जास्तीचा असेल असे UM-DAE-CBS, मुंबई आणि NISER, भुवनेश्वरचे विद्यार्थी यांना मुलाखतीसाठी सरळ निवडले जाईल.

GATE चा कट ऑफ स्कोअर सिलेक्शन मुलाखतीसाठी ऑनलाइन टेस्ट झाल्यानंतरच जाहिर केला जाईल.

सिलेक्शन इंटरव्ह्य़ू- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत मे-जून, 2020 मध्ये (जीऑलॉजी वगळता सर्व विद्याशाखांसाठी)  BARC, मुंबई येथे होतील.

जीऑलॉजीसाठी मुलाखती हैद्राबादला होतील.

अंतिम निवड सिलेक्शन मुलाखतीमधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

इतर संधी –  OCES-2020 साठी अर्ज करणारे उमेदवार ECIL मध्ये सरळ भरतीकरिता पात्र असतील. सिलेक्शन इंटरव्ह्य़ूच्या मेरिट लिस्टमधील उमेदवार एम.एस्सी. (इंजिनिअरिंग)/पीएच.डी. किंवा रेडिओलॉजिकल फिजिक्स या कोस्रेससाठी  BARC च्या HBNI मध्ये 2020-21 करिता निवडले जाऊ शकतात.

BARC ट्रेनिंग स्कूल, मुंबई येथे विद्याशाखा कोड क्र. २१ ते २८ आणि ४१ ते ४४ चे प्रोग्रॅम चालतात.

ऑनलाइन टेस्ट १३ ते १९ मार्च २०२०

GATE-2020 स्कोअर अपलोड करण्याचा अंतिम दि. १ एप्रिल २०२०.

सिलेक्शन इंटरव्ह्य़ूसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी दि. १५ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल.

सिलेक्शन इंटरव्ह्य़ू – १४ मे ते १३ जून २०२० दरम्यान घेतले जातील. OCES निवड यादी जून, २०२० च्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर होईल.

ऑनलाइन अर्ज दि. ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत http://www.barconlineexam.in या संकेतस्थळावर करता येतील.

*    स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)’च्या एकूण ८,३०८ पदांची भरती.

(यात एकूण ३०८ बॅकलॉग रिक्त पदांचा समावेश आहे. अज – १३०, इमाव – ४,

विकलांग – एचआय – ७२ पदे, व्हीआय – २, एमडी – १० आणि माजी सनिक कॅटेगरीमध्ये

९० पदे बॅकलॉगची आहेत. एक्सएस – ३, डीएक्सएस – ८७)

महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण ८६५ पदे भरावयाची आहेत. (अजा – ८६, अज – ७७, इमाव – २३२, ईडब्ल्यूएस – ८६, खुला – ३८४)

गोवा राज्यामधून भरावयाची पदे – १० पदे

(अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७). विकलांग उमेदवारांना ४% आरक्षण लागू आहे.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वष्रे (इमाव – ३१ वष्रेपर्यंत, अजा/अज – ३३ वष्रेपर्यंत, विकलांग – ३८ वष्रेपर्यंत).

पात्रता – दि. १ जानेवारी २०२० रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट – फेज-१ – प्रीलिमिनरी एक्झाम – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – १०० गुणांसाठी वेळ १ तास. (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, एकूण १०० प्रश्न)

फेज-२ – मुख्य परीक्षा – जनरल फायनान्शियल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे, जनरल इंग्लिश –  ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे; रिझिनग अ‍ॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अ‍ॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. एकूण २०० गुण, वेळ २ तास ४० मिनिटे.

रिक्त पदांच्या ५०% उमेदवारांची राज्यनिहाय प्रतीक्षा यादी बनविली जाईल. अंतिम निवड यादी मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार तयार केली जाईल. (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाकरिता असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.)

लँग्वेज टेस्ट – ऑनलाइन टेस्टमधून उत्तीर्ण उमेदवारांनी दहावी / बारावी स्तरावर लोकल लँग्वेज अभ्यासलेली आहे, अशांना लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही.

पे-स्केल – सुरुवातीला बेसिक पे रु. १३,०७५/- + इतर भत्ते.

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – स्टेट बँक ऑफ इंडिया ठरावीक केंद्रांवर अजा/अज/माजी सनिक यांच्यासाठी प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग आयोजित करणार आहे.

अर्जाचे शुल्क – रु. ७५०/- (अजा/अज/विकलांग/माजी सनिक यांना

फी माफ).

ऑनलाइन अर्ज  https://bank.sbi/careers किंवा  https://sbi.co.in/careers या संकेतस्थळावर दि. २६ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 12:35 am

Web Title: job opportunity job opportunity in india zws 70 2
Next Stories
1 भावनिक बुद्धिमत्ता
2 एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षा आर्थिक आणि सामाजिक भूगोल
3 करिअर क्षितिज : नवी हरित क्रांती
Just Now!
X