सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, हेवी वॉटर बोर्ड (जाहिरात क्र. एचडब्ल्यूबी/१/२०२०) स्टायपेंडिअरी ट्रेनी /टेक्निकल ऑफिसर/सायंटिफिक असिस्टंट इ. पदांची भरती.

educational opportunities in banking technology
शिक्षणाची संधी : बँकिंग टेक्नॉलॉजीमधील संधी
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Thandai
होळी, धुळवडनिमित्त लाखो लीटर थंडाईची विक्री, ताज्या थंडाईबरोबर ‘रेडी टू मेक’ थंडाईची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली
Opportunity for education The calendar of exams to be conducted through UPSC has been announced
शिक्षणाची संधी: आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग

(ए) कॅटेगरी-२, स्टायपेंडिअरी ट्रेनी – एकूण ९२ पदे.

(१) प्रोसेस/प्लांट ऑपरेटर – ५६ पदे (अजा – ९, इमाव – ११, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – ३२)

(२) केमिस्ट्री (लॅबोरेटरी) – २ पदे (इमाव – १, खुला – १).

पात्रता – पद क्र. १ व २ साठी – बारावी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स) किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(3) इलेक्ट्रिकल – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

(४) मेकॅनिकल (फिटर) – १० पदे (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

(५) मेकॅनिक (मोटर वेहिकल) – १ पद (खुला).

(६) वेल्डर – ८ पदे (अजा – २, अज – १, इमाव – १, खुला – ४).

(७) रिग्गर – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १, खुला – १).

(८) टर्नर – २ पदे (इमाव – १, खुला – १).

(९) प्लंबर – ३ पदे (इमाव – २, अजा – १).

(१०) मेसॉन – २ पदे (अजा – १, ईडब्ल्यूएस – १).

(११) कारपेंटर – १ पद (इमाव).

पात्रता – पद क्र. ३ ते ११ साठी दहावी किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स किंवा एनएसी. (आयटीआय कोर्स २ वर्षे कालावधीपेक्षा कमी कालावधीचा असल्यास १ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.)

(बी) कॅटेगरी-१ – स्टायपेंडिअरी ट्रेनी – एकूण ६५ पदे (डिप्लोमा इंजिनीअर्स).

(१२) केमिकल – ४३ पदे (अजा – २, अज – ५, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २२).

(१३) मेकॅनिकल – १ पद (इमाव).

(१४) इलेक्ट्रिकल – ७ पदे (अजा – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).

(१५) इन्स्ट्रमेंटेशन – ९ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – पद क्र. १२ ते १५ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(१६) केमिस्ट्री (लॅबोरेटरी) – ५ पदे (अजा – १, खुला – ४).

पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री प्रिन्सिपल आणि फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/बायोलॉजी सबसिडिअरी विषयांसह किमान ६०% गुण).

(सी) टेक्निकल ऑफिसर-डी – एकूण २८ पदे (खुला गट).

(१७) केमिकल – २१ पदे.

(१८) मेकॅनिकल – ३ पदे.

(१९) इन्स्ट्रमेंटेशन – २ पदे.

(२०) सिव्हिल – २ पदे.

पात्रता – पद क्र. १७ ते २० साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि ४ वर्षे कामाचा अनुभव.

२१) नर्स-ए – ग्रुप-बी नॉन-गॅझेटेड – ४ पदे (अज – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता – बारावी आणि नìसग डिप्लोमा किंवा बी.एस्सी. (नìसग).

२२) सायंटिफिक असिस्टंट-बी सिव्हिल – ५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – १)

पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा ६०% गुण.

२३) सायंटिफिक असिस्टंट-बी/रेडिओग्राफी – १ पद (इमाव).

पात्रता – बी.एस्सी. (रेडिओग्राफी) ६०% किंवा बी.एस्सी. ५०%आणि डिप्लोमा रेडिओग्राफी.

२४) टेक्निशियन-सी (क्रेन/फोर्कलिफ्ट ऑपरेटर) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

पात्रता – दहावी ६०% किंवा बारावी (विज्ञान आणि गणित विषयासह उत्तीर्ण).

२५) सब-ऑफिसर ग्रुप-बी – ५ पदे (इमाव – २, खुला – ३).

पात्रता – दहावी आणि सब-ऑफिसर कोर्स (एचएमव्ही ड्रायिव्हग लायसन्सधारकांना प्राधान्य).

२६) स्टेनोग्राफर ग्रेड-कक ग्रुप-बी – २ पदे (खुला) (१ पद ओएच/एचएचसाठी राखीव).

पात्रता – दहावी आणि इंग्रजी शॉर्टहँड स्पीड १०० श.प्र.मि., इंग्रजी टायिपग – ४५ श.प्र.मि.

२७) स्टेनोग्राफर ग्रेड- ककक ग्रुप-सी – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ४).

पात्रता – दहावी आणि इंग्रजी शॉर्ट हँड स्पीड ८० श.प्र.मि., इंग्रजी टायिपग स्पीड ३० श.प्र.मि.

२८) अप्पर डिव्हिजन क्लर्क ग्रुप-सी – १८ पदे (अजा – ४, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७)

पात्रता – पदवी कोणतीही शाखा ५०% गुण.

२९) ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) ग्रुप-सी – २० पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – १४)

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि हलके व अवजड वाहन चालविण्याचा परवाना.

३०) ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमन-ए ग्रुप-सी – २६ पदे (अजा – ३, अज – ३, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – १, खुला – १२).

पात्रता – बारावी विज्ञान केमिस्ट्री किमान ५०% गुण + अवजड वाहन चालविण्याचा परवाना + १ वर्षांचा ड्रायिव्हगचा अनुभव + फायर फायटिंग इक्विपमेंट्समधील सर्टिफिकेट कोर्स.

वयोमर्यादा –

पोस्ट क्र. १ ते ११ – १८ ते २२ वर्षे;

पोस्ट क्र. १२ ते १६ – १८ ते २४ वर्षे;

पोस्ट क्र. १७ ते २० – ४० वर्षेपर्यंत;

पोस्ट क्र. २१ ते २३ – १८ ते ३० वर्षे;

पोस्ट क्र. २४ – १८ ते २९ वर्षे;

पोस्ट क्र. २५ सब ऑफिसर – ४० वर्षेपर्यंत;

पोस्ट क्र. २६ ते २९ – १८ ते २७ वर्षे;

पोस्ट क्र. ३० – १८ ते २५ वर्षे

(सर्व पदांसाठी वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा /अज – ५ वर्षेपर्यंत).

शारीरिक मापदंड – कॅटेगरी-१ व कॅटेगरी-२ पदांसाठी उंची – १५२ सें.मी. (पुरुष), १४८ सें.मी. (महिला); दृष्टी – दूरची ६/१८ चष्म्याशिवाय, ६/६ चष्म्यासह.

ट्रेनिंग कालावधी २ वर्षांचा असेल.

स्टायपेंड – कॅटेगरी-१ ट्रेनी – रु. १६,०००/- दरमहा पहिल्या वर्षी आणि रु. १८,०००/- दरमहा दुसऱ्या वर्षी.

कॅटेगरी-२ ट्रेनी रु. १०,५००/- दरमहा पहिल्या वर्षी आणि रु. १२,५००/- दरमहा दुसऱ्या वर्षी.

स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-१ च्या ट्रेनीजना ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९००/- + इतर भत्ते) वेतनावर सायंटिफिक असिस्टंट-सी या पदावर तनात केले जातील.

स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-क ट्रेनीजना ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर टेक्निशियन-बी पदावर पे-लेव्हल-३ (रु. २१,७००/- + इतर भत्ते) किंवा टेक्निशियन-सी पे-लेव्हल-४ वर (रु. २५,५००/- + इतर भत्ते) कायम केले जाईल.

ऑनलाइन अर्ज http://www.hwb.gov.in किंवा http://www.hwb.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. ३१ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.

* दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग’ संवर्गातील ७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १ मार्च २०२० रोजी औरंगाबाद, मुंबई व नागपूर या जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.

पात्रता – (दि. ३ जानेवारी २०२० रोजी)

(१) नवीन विधि पदवीधर –

विधि शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (पदवीच्या अंतिम वर्षी किमान ५५% गुण आवश्यक.) (सदर पदवी प्राप्त करण्यासाठी घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करणे आवश्यक.)

वयोमर्यादा – दि. ३ जानेवारी २०२० रोजी २१-२५ वर्षे अमागास; २१-३० वर्षे मागासवर्गीय.

(२) वकील, अ‍ॅटर्नी किंवा अधिवक्ता

पात्रता – विधि शाखेतील पदवी.

(किमान ३ वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव आवश्यक.)

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत अमागास; ४० वर्षेपर्यंत मागासवर्गीय.

(३) सेवा कर्मचारी

पात्रता – विधि शाखेतील पदवी. (३ वर्षांची न्यायालयीन सेवा किंवा मंत्रालयातील विधि व न्याय विभागातील सेवा आवश्यक.)

वयोमर्यादा – ४५ वर्षेपर्यंत अमागास; ५० वर्षेपर्यंत मागासवर्गीय.

निवड पद्धती –

१)     पूर्वपरीक्षा – १०० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी माध्यम इंग्रजी (पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)

२)     मुख्य परीक्षा – वर्णनात्मक स्वरूपाचे १०० गुणांचे दोन पेपर एकूण २०० गुण माध्यम मराठी व इंग्रजी.

३)     मुलाखत – ५० गुण (मुलाखतीत किमान ४०% गुण मिळविणारे उमेदवार निवडीस पात्र असतील.)

अंतिम निवड लेखी मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे (प्रतिक्षा यादी १ वर्षपर्यंत लागू असेल.)

अर्जाचे शुल्क  –

अमागास रु. ३७४/-,

मागासवर्गीय रु. २७४/-.

ऑनलाइन अर्ज  https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. २३ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.