विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरूवनंतपुरम (जाहिरात क्र. VSSC/APP/01/2019)इंजिनिअरींग/लायब्ररी सायन्स/हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्सना सन २०२०-२१ मध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी सेंट्रलाईज्ड् सिलेक्शन ड्राइव्हमधून प्रवेश.

किती जागा
१) एअरोनॉटिकल/एअरोस्पेस इंजिनिअरींग – १५
२) केमिकल इंजिनिअरींग – १०
३) सिव्हील इंजिनिअरींग – १२
४) कॉम्प्युटर सायन्स/इंजिनिअरींग – २०
५) इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग – १२
६) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग – ४०
७) मेकॅनिकल इंजिनिअरींग – ४०
८) मेटॅलर्जी – सहा
९) प्रोडक्शन इंजिनिअरींग – सहा
पात्रता –
पद क्र. एक ते नऊ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी किमान प्रथम श्रेणीत ६५ टक्के गुणांसह (6.84 CGPA) उत्तीर्ण.
१०) लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्स – आठ
पात्रता –
पदवी + प्रथम श्रेणीत किमान ६० टक्के गुणांसह BLISc. उत्तीर्ण.
११) कॅटिरग टेक्नॉलॉजी/हॉटेल मॅनेजमेंट – चार जागा. पात्रता – प्रथम वर्गात किमान ६० टक्के गुणांसह कॅटिरग टेक्नॉलॉजी/ हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी.

एप्रिल, २०१७ पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पदवीच्या अंतिम वर्षांत शिकणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
प्रशिक्षणाचा (अ‍ॅप्रेंटिसशिपचा) कालावधी एक वर्षांचा असेल. त्या दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ९०००/- स्टायपेंड दिले जाईल.
बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या सदर्न रिजनमध्ये येणाऱ्या राज्यांतील (केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पाँडिचेरी) विद्यापीठातून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. जर जागा शिल्लक राहिल्या तर इतर विद्यापीठातील उमेदवारांचा विचार केला जाईल.

वयोमर्यादा – दि. २२ डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षपर्यंत. (इमाव – ३३ वर्षपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षपर्यंत, विकलांग – ४० वर्षपर्यंत)

प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडून राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची अॅप्रेंटिसशिपसाठी निवड करण्यात येईल.

अर्ज कसा करावा –
इच्छुक उमेदवारांनी दि. २२ डिसेंबर २०१९ (रविवार ८.३० ते १६.०० वाजेपर्यंत) रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर पॅव्हेलियन, कार्डिनल क्लीमिस ब्लॉक, सेंट मेरीज हायर सेकंडरी स्कूल, पट्टम्, तिरूवनंतपुरम येथे पुढील प्रमाणपत्रांच्या ओरिजिनल्स आणि स्वयंसाक्षांकित प्रितसह उपस्थित रहावयाचे आहे.
१) पदवी प्रमाणपत्र
२) पदवी कन्सॉलिडेटेड मार्क लिस्ट
३) जन्म तारखेचा पुरावा (दहावीचे प्रमाणपत्र)
४) जातीचा दाखला (अजा/अजच्या उमेदवारांसाठी)
५) नॉन-क्रिमी लेयरचा दाखला (इमावच्या उमेदवारांसाठी)
६) इन्कम अँड असेट सर्टिफिकेट (ईडब्ल्यूएस् उमेदवारांसाठी)
७) विकलांगतेचा दाखला
८) अनुभवाचा दाखला (असल्यास)
९) एक पासपोर्ट आकाराचा फोटो. उमेदवारांनी पूर्ण भरलेला अर्ज (जो सिलेक्शन सेंटरवर पुरविला जाईल)
आवश्यक त्या स्वयंसाक्षांकीत प्रतींसह सिलेक्शन सेंटरवर सादर करावयाचा आहे.