नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स यांचा परिचय!
SarkariNaukriUpdates.com
तुम्हाला सरकारी नोकऱ्यांची बित्तंबातमी हवी असेल तर तुम्ही Govt Job search Sarkari Naukri  हे अ‍ॅप तुमच्या मोबाइलवर अपलोड करून घ्या. SarkariNaukriUpdates.com या वेबसाइटचं हे अ‍ॅप आहे. ते तुम्हाला चार सरकारी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या नोकऱ्यांचे अपडेट्स पुरवतं. यात Categories, Profession, Qualification आणि Location असे चार टॅब्स प्रामुख्याने दिलेले आहेत. त्यामुळे या टॅब्सनुसार तुम्हाला नोकरी शोधणं अधिक सोपं जातं.
पहिल्या म्हणजे कॅटेगरीज टॅबमध्ये बँकेचे जॉब, शिक्षक, रेल्वे, पोलीस, क्रीडा, सुरक्षा दल, यूपीएससी, आयआयटी, पब्लिक सेक्टर आणि वीकली एम्प्लॉयमेंट न्यूज असे उपप्रकार आहे. तर प्रोफेशन टॅबमध्ये टेक्निशियन, सुपरव्हायजर, शास्त्रज्ञ, व्यवस्थापन, क्लार्क, डॉक्टर, फायनान्स इत्यादी उपप्रकार आहेत.
क्लासिफिकेशन म्हणजेच शैक्षणिक पात्रता या टॅबमध्ये पदवीधर, पदव्युत्तर, पदविकाप्राप्त आदी प्रकार आहेत. यातल्या लोकेशन या टॅबमध्ये तुम्ही देशातल्या तुम्हाला हव्या असलेल्या शहराचं नाव टाकू शकता. उदा. तुम्हाला रेल्वेमधल्या नोकऱ्या शोधायच्या असतील, तर तुम्ही पहिल्या टॅबमध्ये सर्च देऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी शोधायची असेल, तर तिसऱ्या टॅबचा वापर करू शकता. तुम्हाला तुमच्याच शहरातल्या सरकारी नोकऱ्यांची संधी शोधायच्या असतील, तर तुम्ही चौथ्या टॅबचा वापर करू शकता. यामध्ये नव्याने पोस्ट झालेल्या नोकऱ्यांचे ‘जॉब अ‍ॅलर्ट्स’ही मिळतात. एकदा का तुमचा ईमेल आयडी तुम्ही यावर नोंदवला की तुम्हाला अपडेट्स येत राहतात.

http://www.devnetjobsindia.org
ही एक अफलातून जॉब सर्च करणारी वेबसाइट सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय आहे. शिवाय या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना ती या क्षेत्रातल्या संधींचा एक अंदाजही देते. या वेबसाइटशी युनिसेफसारख्या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था, मोठय़ा-मध्यम स्वयंसेवी संस्था, विकासकार्य किंवा पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थांही संलग्न आहेत.
इथे तुम्हाला जॉब शोधणारे म्हणजे ‘जॉबसीकर’ म्हणून लॉगइन करता येतं किंवा जॉब पोस्ट करणाऱ्या संस्था म्हणजे रिक्रूटर म्हणूनही आपलं नाव नोंदवता येतं. या दोन्हींसाठी साधं अकाऊंट हे मोफत उघडता येतं. जॉबसीकर्सना ‘व्हॅल्यू मेंबरशिप अकाऊंट’ पसे देऊन विकत घेऊ शकता येतं. या अकाऊंटधारकांना न्यूज अलर्ट्स, न्यूज लेटर्सशिवाय सल्लाही दिला जातो. तुमचा प्रोफाइल किंवा रेझ्यूमे जास्तीत जास्त संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ब्रॉडकािस्टग’ ही सेवाही पसे भरून घेता येते.
अकाऊंट उघडल्यावर   वेबसाइटवर तुमचा प्रोफाइल तयार करून तुम्हाला तुमचा रेझ्यूमे अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला ई-मेलने नवीन नोकऱ्यांचे अ‍ॅलर्ट्स येत राहतात. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या संस्थेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय इथे मर्यादित कालावधीचे प्रोजेक्ट्सही पोस्ट केले जातात. फ्री-लान्सर म्हणून काम करणाऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरू शकतात.

http://www.afaqs.com
जाहिरात आणि त्यासंबंधित माध्यम क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी http://www.afaqs.com या प्रसिद्ध वेबसाइटवर पाहता येतात. यातही ‘जॉबसीकर’ व ‘रिक्रिूटर’ अशी दोन अकाऊंटस् काढता येतात. अकाऊंट मॅनेजमेंट/ क्लाएंट सíव्हसिंग, व्हिज्युअलायझर, ग्राफिक डिझायनर, मीडिया, मीडिया प्लॅिनग, डिजिटल मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स, आयटी, ब्रँड मॅनेटमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट इत्यादी प्रकारची कामे इथे शोधता येतात. जाहिरात क्षेत्रातल्या मोठमोठय़ा कंपन्या यावर जॉब्स पोस्ट करत असतात.
या वेबसाइटचं वैशिष्टय़ं म्हणजे जाहिरात क्षेत्रांत गाजलेल्या, तसंच चांगल्या, पण प्रकाशित न झालेल्या अनेक असाइन्मेंट्स इथे टाकल्या जातात.  आपल्यातली कौशल्यं वाढवण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे, याचा अंदाज ते पाहून आपल्याला येऊ शकतो.