महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलतर्फे राज्यातील विविध संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमसीए अभ्यासक्रमाच्या २०१८ या शैक्षणिक सत्राच्या पहिले वर्ष अथवा थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एमएएच एमसीए  सीईटी- २०१८ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाती नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची एमएएच एमसीए- सीईटी २०१८ ही प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने २४ मार्च २०१८ रोजी घेण्यात येईल.

  • अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व एमएएच एमसीए सीईटी – २०१८ या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना राज्यातील संबंधित शिक्षण संस्थेत उपलब्ध असणाऱ्या एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या २०१८-१९ या सत्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांनी १००० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०० रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलची जाहिरात पाहावी दूरध्वनी क्र. ०२२- ३०२३३४२० अथवा ३०२३३४६४ वर संपर्क साधावा अथवा सेलच्या https://dtemaharashtra.gov.in/mcacet20 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१८.
  • कार्यालयीन संपर्क – महाराष्ट्र शासन, स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, मुख्यालय ३०५, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, खेरवाडी, अली यावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१.
  • प्रादेशिक कार्यालय – सीईटी सेल, डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ३, महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१.