भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी के. सी. महिंद्र ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येतात. या शिष्यवृत्तींची माहिती पुढीलप्रमाणे आहे-
 शिष्यवृत्तींची संख्या
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या ५० आहे.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी अथवा पदविका कमीत कमी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते २०१५ या शैक्षणिक सत्रात संबंधित पात्रता परीक्षेला बसलेले असावेत आणि त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
अर्जदार विद्यार्थ्यांची विदेशी शिक्षण संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झालेली असावी. त्यांच्याजवळ तशा आशयाचे पत्र असायला हवे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना के. सी. महिंद्र ट्रस्टतर्फे जुलै २०१५ मध्ये मुंबई येथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ लाख रुपये तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी संपर्क
शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्टच्या http://www.kcmet.org
अथवा http://www.kcmet.org/what-we-do-scholarship-Grants.aspx या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्ट, सिसिल कोर्ट, तिसरा मजला, रिगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर ३१ मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.