28 January 2020

News Flash

कोरियातील शिक्षणसंस्कृती सोल नॅशनल युनिव्हर्सटिी, दक्षिण कोरिया.

एसएनयूचे काही प्राध्यापक नोबेल विजेते असून ते तेथील कॅम्पसमध्ये अध्यापनाचे कार्य करतात.

विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

itsprathamesh@gmail.com

वैशिष्टय़

एसएनयूचे काही प्राध्यापक नोबेल विजेते असून ते तेथील कॅम्पसमध्ये अध्यापनाचे कार्य करतात. युनोचे माजी सरचिटणीस बान की मून (ban ki moon) वातावरण बदलांवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय समिती आयपीसीसीचे सध्याचे अध्यक्ष होशुंग ली, जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष ली जोंग वुक, जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे आतापर्यंतचे अनेक सीईओ हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

विद्यापीठाची ओळख –  दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल  शहरामध्ये स्थित असलेले ‘सोल नॅशनल युनिव्हर्सटिी (SEOUL NATIONAL UNIVERSITY)  हे दक्षिण कोरियातील राष्ट्रीय शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस ग्वानाक येथे आहे तर देहँग्नो आणि युंगचँग येथे प्रत्येकी एक असे विद्यापीठाचे एकूण तीन कॅम्पस आहेत. २०१९च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाचा छत्तिसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १९४६ साली झालेली आहे. ‘द ट्रथ इज माय लाइट’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. एसएनयू विद्यापीठाचा कॅम्पस एक हजार सातशे एकरांपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असलेल्या परिसरामध्ये स्थित आहे. एसएनयूमध्ये पाच हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून अठ्ठावीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. एसएनयूमध्ये एकूण सोळा महाविद्यालये, एक ग्रॅज्युएट स्कूल आणि नऊ व्यावसायिक विभाग आहेत. जगातील एक महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या एसएनयूचा चाळीस देशांमधील ‘जागतिक बँके’सहित एकूण सातशे आंतरराष्ट्रीय संस्थांशी शैक्षणिक आणि संशोधनातील सामंजस्य करार आहे.

अभ्यासक्रम – एसएनयू विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. या दोन्ही स्तरांवर विद्यापीठातील एकूण सोळा शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग एकूण ८३ पदवी आणि ९९ पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. एसएनयूमधील बहुतांश पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठ डॉक्टरल अभ्यासक्रम व प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज यांसारखे पर्यायही उपलब्ध करून देत आहे. एसएनयूमधील सर्व शैक्षणिक व संशोधन विभागांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्याने मानवतावाद, समाजशास्त्र, निसर्गशास्त्र, शेती आणि आयुर्विज्ञान, व्यवसाय प्रशासन, शिक्षण क्षेत्र, अभियांत्रिकी, ललित कला, मानवी पर्यावरणशास्त्र, लिबरल स्टडीज, वैद्यकीय शिक्षण, संगीत, नृत्य, परिचारिका अभ्यासक्रम, औषधीनिर्माण आणि पशुवैद्यकीय हे पदवी अभ्यासक्रम विभाग आहेत तर व्यापार, पर्यावरण शास्त्र, अभिसरण विज्ञान आणि तंत्रज्ञान, दंतवैद्यक, अभियांत्रिकी प्रॅक्टिस, जागतिक शेती तंत्रज्ञान, विधि शिक्षण, पब्लिक अफेअर्स, पब्लिक हेल्थ हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत.

सुविधा – एसएनयू विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपकी जवळपास सर्व विद्यार्थी हे कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आíथक मदत केली जाते.

विद्यापीठाचे ग्रंथालय हे देशातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाच्या नऊ शाखा इतर ठिकाणी आहेत. ‘करिअर डेव्हलपमेंट सेंटर’ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स आणि नोकरीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी सक्रिय असते. तसेच विद्यार्थ्यांना नदानिक चाचण्या, नात्यांमधील अडचणी, वैयक्तिक समुपदेशन, गट समुपदेशन इत्यादीसाठी विद्यापीठाचे समुपदेशन केंद्र आहे. याशिवाय दररोजच्या शैक्षणिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणारे ‘शैक्षणिक मदत केंद्र’ आहे. हे केंद्र आंतरराष्ट्रीय आणि नवीन पदवी अभ्यासक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आवश्यक भाषा, सादरीकरण यांसारखी शैक्षणिक कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करते. या केंद्राकडून संशोधनामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाते. याशिवाय अन्य विद्यापीठांप्रमाणे एसएनयूने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये खाद्यपदार्थाच्या अद्ययावत सोयी उपलब्ध असून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले क्लब्स आहेत. विद्यापीठाचा कॅम्पस सुरक्षित असून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एसएनयूने हेल्थ इन्शुरन्स, वैद्यकीय केंद्र यांसारख्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत्

संकेतस्थळ =https://www.useoul.edu/

 

First Published on September 10, 2019 2:52 am

Web Title: korean education seoul national university akp 94
Next Stories
1 वनसेवा परिस्थितिकी व जैवविविधता घटक
2 जागतिकीकरणाचे मुद्दे
3 करिअर : मंत्र
Just Now!
X