23 October 2018

News Flash

करिअर मंत्र

सर, माझा भाऊ नववीत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

  • सर, माझा भाऊ नववीत आहे. त्याला इंडियन एअरफोर्समध्ये जायचे आहे. इयत्ता दहावीनंतर एअरफोर्समध्ये पायलट बनण्यासाठी त्याने काय करावे? – स्वाती चव्हाण

इंडियन एअरफोर्समध्ये पायलट बनण्यात दोन रस्ते आहेत. पहिला एनडीएची परीक्षा देऊन निवड झाल्यास सुरू होऊ शकतो. मात्र एकूण ३६० पैकी फक्त ४० जणांचीच त्यासाठी निवड करता येते. दुसरा म्हणजे सायन्समधील फिजिक्स, कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्सची पदवी किंवा इंजिनीअरिंगची पदवी घेऊन त्यानंतर अ‍ॅफकॅटची एअर फोर्स प्रवेशाची परीक्षा देणे.

ती पास झाल्यास पायलट अ‍ॅप्टिटय़ूडची चाचणी व एसएसबीची खडतर पाच दिवसांची चाचणी पास व्हावी लागते. यानंतर मेडिकल तपासणी पार पडली की प्रत्यक्ष ट्रेनिंग सुरू होते. या साऱ्या दरम्यान सायन्समधील बारावी व तिचा अभ्यास हा महत्त्वाचा टप्पा आहे. निव्वळ दहावीचे चांगले मार्क किंवा पायलटचे स्वप्न पाहणे या टप्प्यावरच अडू शकते ना? त्यासाठी भावाला प्रवृत्त करणे सध्या तुमचे लक्ष केंद्रित करावेत.

  • माझे वय ४७ आहे. मी डिप्लोमा होल्डर आहे. मला वकिली शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मला काय करता येईल? – हेमंत बागवे

आपल्याला प्रथम एखादी पदवी घेणे त्यासाठी गरजेचे आहे. पदवीनंतरच तीन वर्षांचे कायद्याचे शिक्षण घेता येते. आवड असणे व करिअरच्या अंगाने विचार करणे अशा विचार केला तर आजपासून सहा वर्षांनी आपण वकील बनू शकता एवढेच. त्याऐवजी वकिली शिक्षण का घ्यावेसे वाटते? यावर नीट विचार केल्यास तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

First Published on January 6, 2018 1:30 am

Web Title: loksatta career mantra 11