|| सुहास पाटील

एमएस्सी/बी.ई./एम्.ए. पदवी/पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) (डिम्ड विद्यापीठ) येथे पुढील विषयांत संशोधनाची सुवर्णसंधी.

ग्रॅज्युएट स्कूल अ‍ॅडमिशन्स (जीएस – २०१९) पीएच.डी. आणि इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्रॅम –

१) मॅथेमॅटिक्स – स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स, मुंबई (http://www.math.tifr.res.in ) आणि बंगलोर येथील इतर दोन इन्स्टिटय़ूट्स.

२) फिजिक्स – टीआयएफआर, मुंबई (http://www.tifr.res.in/~sbp ), पुणे, हैद्राबाद.

३) केमिस्ट्री – डिपार्टमेंट ऑफ केमिकल सायन्सेस, टीआयएफआर, मुंबई (http://www.tifr.res.in/~dcs ), हैद्राबाद.

४) बायोलॉजी – डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस, टीआयएफआर, मुंबई (http://www.tifr.res.in/~dbs ), बंगलोर, हैद्राबाद.

५) सायन्स एज्युकेशन – (फक्त पीएच.डी. प्रोग्रॅम) – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (एचबीसीएसई), मुंबई (http://www.hbcse.res.in ).

६) कॉम्प्युटर अँड सिस्टीम सायन्सेस – (फक्त पीएच्.डी. प्रोग्रॅम) स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स (एस्टीसीएस्), टीआयएफआर, मुंबई (http://www.stcs.tifr.res.in ).

निवड पद्धती – वरील प्रोग्रॅम्सच्या प्रवेशासाठी टीआयएफआर राष्ट्रीय पातळीवर जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (बायोलॉजी आणि इंटर डिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस) (जेजीईईबीआयएलएस) दि. ९ डिसेंबर २०१९ रोजी घेणार आहे आणि मुलाखत. (कॉम्प्युटर अँड सिस्टीम सायन्सेस प्रोग्रॅमसाठी गेट (जीएटीई) मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/मॅथेमॅटिक्स) २०१७-१९ मधील गेट स्कोअरवर प्रवेश दिला जाईल. (टीआयएफआरची प्रवेश परीक्षा न देता.) फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजीमधील काही प्रवेश जीएटीई/एन्ईटी/जेईएसटी परीक्षांतील स्कोअरवर आधारित होऊ शकतात.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैद्राबाद इ.

अर्जाचे शुल्क – पुरुष उमेदवार रु. ९००/-, महिला उमेदवार रु. ३००/-.

पेमेंटविषयी चौकशीसाठी ई-मेल आयडी gsch@tifr.res.in

फेलोशिप – पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५,०००/- फेलोशिप दिली जाईल. (पीएच.डी. रजिस्ट्रेशननंतर रु. २८,०००/- दिले जातील.) इंटिग्रेटेड पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी दरमहा रु. १६,०००/- फेलोशिप दिली जाईल. त्यानंतर ती वाढवून रु. २५,०००/- दरमहा दिले जातील. (पीएच.डी. रजिस्ट्रेशननंतर रु. २८,०००/- दिले जातील.) विद्यार्थ्यांना नाममात्र दराने राहण्याची व्यवस्था केली जाते.

संपर्क –

१) मॅथेमॅटिक्स/फिजिक्स/केमिस्ट्री/कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्सेसमधील प्रोग्रॅमसाठी – युनिव्हर्सटिी सेल, टीआयएफआर, होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई – ४००००५.

फोन नं. ०२२- २२७८२६२९/२११४.

ई-मेल – gsch@tifr.res.in

२) बायोलॉजीमधील प्रोग्रॅम्ससाठी – ‘अ‍ॅडमिशन सेल, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, यूएएस्-जीकेव्हीके कॅम्पस, बेल्लारी रोड, बंगलोर – ५६० ०६५. फोन नं. – ०८० – २३६६६४०४.

ई-मेल – phd@ncbs.res.in

३)सायन्स एज्युकेशन प्रोग्रॅमसाठी – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टीआयएफआर, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०००८८.

फोन नं. ०२२ – २५५८००३९ / २५५६७७११. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१८

suhassitaram@yahoo.com