दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (जाहिरात क्र. DMRC/OM/HR/11/2018 dt. 27.1.2018) पुढील एक्झिक्युटिव्ह पदांची भरती.

४९ पदे कायम स्वरूपाची आणि ९२ पदे चार वर्षे कंत्राटी स्वरूपाची (जी कंसामध्ये दर्शविली आहेत.)  १) असिस्टंट मॅनेजर (i) इलेक्ट्रिकल – २१ पदे (२५ पदे), (ii) एस अँड टी – १२ पदे (२२ पदे), (iii) ऑपरेशन्स (सिव्हील) – ८ पदे (४४ पदे), (iv)  स्टोअर्स – २ पदे, (५) एन्व्हायर्न्मेंट – १ पद, (v) आयटी – ३ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (वरील जाहिरातीतील पात्रतेच्या अटींमध्ये गेट स्कोअर आवश्यक होता. आता १७ फेब्रुवारी २०१८च्या सुधारणेनुसार गेट स्कोअरची अट काढून टाकली आहे.)

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वष्रेपर्यंत (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत).

ऑनर्लान अर्ज www.delhi.metrorail.com या संकेतस्थळावर दि. १२ मार्च २०१८ पर्यंत करावेत.

 

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम), बंगलोर येथे ‘डेप्युटी इंजिनीअर’ पदांची भरती. (फक्त ३ वर्षांच्या मुदतीसाठी)

(१) डेप्युटी इंजिनीअर (कॉम्प्युटर सायन्स) – १८ पदे.

(२) डेप्युटी इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स) – ५ पदे (एकूण २३ पदांपकी खुला गट – १२ पदे, इमाव – ५, अजा – ४, अज – २)

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि १ वर्षांचा अनुभव.

कमाल वयोमर्यादा – दि. १ फेब्रुवारी २०१८ रोजी – २६ वर्षेपर्यंत (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत

वेतन – ग्रेड पे स्केल ए-कक- ४०,०००/-  (डीए/एचआरए/मूळ पगाराच्या ३५% इतर भत्ते).

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखत यातून निवड.

परीक्षा शुल्क – रु. ५००/-. एसबीआय चलानमार्फत किंवा ऑनलाइन पद्धतीने (अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज पुढील पत्त्यावर दि. १४ मार्च २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

The Deputy Gen. Manager (HR/Milcom), Military Communication SBU, Bharat Electronics Ltd. Jalahalli Post, Bengaluru – 560 013.

 

  • इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) फोर्समध्ये पुरुष उमेदवारांची ‘कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)’ पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – १३४ (यूआर – ४७, अजा – ६८, अज – ५, इमाव – १४)

पात्रता – (i) दहावी उत्तीर्ण, (ii) एलएमव्ही/ मीडियम किंवा हेवी मोटर वेहिकल चालविण्याचा परवाना सोबत २ वर्षांचा गाडी चालविण्याचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १५ मार्च २०१८ रोजी २१ ते २७ वर्षे (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षेपर्यंत). शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी. (अज -१६२.५ सें.मी.) छाती -८०-८५ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

निवड पद्धती – (i) शारीरिक मापदंड चाचणी (पीएसटी), (ii) बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन, (iii) शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) (ए)१.६ कि. ७.३० मि. धावणे, (बी) लांब उडी (११ फूट), (सी) उंच उडी – ३ १/२ फूट, (iv) लेखी परीक्षा – १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (ओएमआर). कालावधी २ तास.

(१) सामान्य ज्ञान, (२) गणित, (३) हिंदी, (४) इंग्रजी प्रत्येकी १० गुणांसाठी आणि (५) ट्रेडसंबंधित ज्ञान ६० गुणांसाठी.

(५) प्रॅक्टिकल (स्किल) टेस्ट – ५० गुण. (i) वैद्यकीय तपासणी.

वेतन – (लेव्हल – ३ इन पे मॅट्रिक्स रु. २१,७००/-  इतर भत्ते.)  ऑनलाइन अर्ज www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर १५ मार्च २०१८पर्यंत करावेत.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com