News Flash

नोकरीची संधी

यूपीएससी - कंबाइंड डिफेन्स सíव्हसेस एक्झामिनेशन

यूपीएससी – कंबाइंड डिफेन्स सíव्हसेस एक्झामिनेशन (१) २०१८ दि. ४ फेब्रुवारी, २०१८ रोजी घेणार आहे. ज्यातून जानेवारी, २०१९ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी पुढीलप्रमाणे प्रवेश दिला जाईल.

इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए), डेहराडून (१००जागा), इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (आयएनए), इझिमाला (४५ जागा); फेब्रुवारी, २०१९ पासून एअरफोर्स अ‍ॅकॅडमी (एएफए), हैद्राबाद (३२ जागा) आणि एप्रिल, २०१९ पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (ओटीए), चेन्नई (पुरुष -२२५ जागा, महिला – १२ जागा)

एकूण ४१४ जागा. (आयएमए – १३ जागा, आयएनए – ६ जागा, ओटीए – ५० जागा (पुरुष) – एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव).

पात्रता –

आयएमए/ओटीए – पदवी (कोणत्याही शाखेतील).

आयएनए – अभियांत्रिकी पदवी (कोणत्याही शाखेतील).

एएफए- पदवी (कोणत्याही शाखेतील) (१२ वी फिजिक्स/गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक) किंवा बी.ई. (कोणत्याही शाखेतील).

पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा –

आयएमए/आयएनए /एएफएसाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी, १९९५ ते १ जानेवारी, २००० दरम्यानचा असावा. ओटीएसाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी, १९९४ ते १ जानेवारी, २००० दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड –

उंची – आयएमए/ओटीएसाठी – १५७.५ सें.मी. पुरुष, १५२ सें.मी महिला. आयएनएसाठी १५७ सें.मी., एएफएसाठी १६२.५ सें.मी.

ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ४ डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

 

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेत देशभरातील आस्थापनांवर ‘ऑफिस अटेंडंट’च्या एकूण ५२६ जागांवर भरती.

मुंबई, नवी मुंबई, पणजी येथील आरबीआयच्या आस्थापनांवर १६५पदांची भरती. (अज – २३, खुला – १४२) नागपूरसाठी ९ पदे. (अज – २, इमाव – २, खुला – ५).

पात्रता –

आरबीआयच्या प्रादेशिक भरती परीक्षेत्रात येणाऱ्या स्टेट बोर्डाकडून एसएससी उत्तीर्ण. (उमेदवार दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी अंडर ग्रॅज्युएट असावा. पदवी किंवा उच्चशिक्षित उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.) वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे (उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वष्रे, अजा /अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रे, परित्यक्ता/विधवा महिला – १० वष्रे.)

निवड पद्धती – 

ऑनलाइन टेस्ट –  रिझिनग,  जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी प्रत्येकी ३० प्रश्न / ३०गुण.  एकूण प्रश्न १२०.

एकूण गुण १२०. कालावधी – ९० मिनिटे.

प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी भाषेतून.

ऑनलाइन टेस्टमधून निवडलेल्या उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट (एलपीटी) (भाषा प्रभुत्व चाचणी) द्यावी लागेल. एलटीपी स्थानिय भाषेतून द्यावी लागेल. मुंबईसाठी मराठीतून द्यावी लागेल.

परीक्षा केंद्र – मुंबई रिजनरल ऑफिससाठी औरंगाबाद, धुळे, जळगाव, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, पणजी, वेरणा. रिजनरल ऑफिस नागपूरसाठी – अमरावती, चंद्रपूर, नागपूर, मुंबई केंद्रासाठी स्थानिय भाषा – मराठी, कोकणी आणि नागपूर केंद्रासाठी स्थानिय भाषा मराठी/हिंदी.

वेतन – दरमहा रु. २२,३३९/-.

अर्जाचे शुल्क – रु. ४५०/- (अजा/अज/विकलांग/माजी सनिक रु. ५०/-).

परीक्षा पूर्व प्रशिक्षण – अजा/ अज/इमाव/विकलांग उमेदवारांसाठी प्रि टेस्ट ट्रेनिंग आरबीआय देणार आहे. जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयाला (मुंबई किंवा नागपूर) अर्ज करावयाचा आहे. www.rbi.org.in या संकेतस्थळावर Recruitment for the post of Office Attendant वर क्लिक करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:53 am

Web Title: loksatta job opportunity
Next Stories
1 साथीचे रोग नियंत्रण कार्यक्रम
2 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : शिक्षणशास्त्रातील अभ्यासासाठी..
3 मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना
Just Now!
X