टाटा मेमोरियल सेंटर, (भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीद्वारा पुरस्कृत संस्था) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल, मुंबई- ४०० ०१२ (जाहिरात क्र. पीजी/२/२०१८)

‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फ्युजन इमेजिंग टेक्नॉलॉजी (पीजीडीएफआयटी)’ होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटच्या (एचबीएनआय) (डीम्ड युनिव्हर्सटिी) २ जुल, २०१८ पासून सुरू होणाऱ्या कृपाछत्राखालील कोर्ससाठी प्रवेश.

पात्रता – बीएससी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/

मॅथ्स/स्टॅटिस्टिक्स /बॉटनी/झूऑलॉजी/

बायोकेमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – २० ते ३० वर्षेपर्यंत

(इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत)

कालावधी – १ वर्ष + १ वर्ष इंटर्नशिप (अनिवासी)

इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच डिप्लोमा दिला जाईल.

एकूण प्रवेश क्षमता – १० प्रशिक्षणा दरम्यान रु. ९,०००/- प्रतिमाह स्टायपेंड दिले जाईल. १ वर्षांच्या इंटर्नशिप दरम्यान दरमहा वेतन रु. १५,०००/- दिले जाईल.

कोर्स फी रु. १५,०००/- मुंबई बाहेरील उमेदवारांना हॉस्टेल अकोमोडेशन दिले जाईल. रजिस्ट्रेशन फी रु. ३००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत यांतील कामगिरीवर आधारित.

लेखी परीक्षा दि. ११ जून २०१८ रोजी होईल. निकाल दि. १३ जून २०१८ रोजी जाहीर होईल.

लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची लिस्ट मे २०१८ च्या तिसऱ्या आठवडय़ात खालील संकेतस्थळावर जाहीर होईल.

ऑनलाईन अर्ज http://tmc.gov.in या संकेतस्थळावर दि. २ मे २०१८ पर्यंत करावेत. ऑनलाईन अर्जाची पिट्रआऊट आवश्यक त्या स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर (अ‍ॅकॅडेमिक्स), १३वा मजला, होमी भाभा ब्लॉक, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल, मुंबई – ४०० ०१२’ या पत्त्यावर दि.

९ मे २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

 

 

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, कोंढवा रोड, पुणे कॅन्टोन्मेंट -४११ ०४० येथे पुढील पदांची भरती.

१) सब डिव्हिजनल ऑफिसर – एकूण २१ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, खुला – १२)(२ पदे माजी सनिकांसाठी राखीव)

पात्रता – सिव्हील इंजिनिअरींगमधील पदवी उत्तीर्ण किंवा सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ३० मे २०१८ रोजी १८ ते ३२ वर्षे (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३७ वर्षेपर्यंत, विकलांग – ४२/४५/४७ वर्षेपर्यंत)

वेतन – रु. ५०,०००/-

(२) हिंदी टायपिस्ट – २ पदे (खुला गट). पात्रता – १०वी उत्तीर्ण आणि हिंदी टायिपग स्पीड २५ श.प्र.मि. वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे.

वेतन – दरमहा रु. २७,९००/-

(३) ज्युनियर हिंदी ट्रान्स्लेटर – १ पद (खुला)

पात्रता – हिंदी/इंग्रजी विषयांतील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी. पदवीला हिंदी/इंग्रजी विषय हिंदी-इंग्रजी माध्यम असावे किंवा हिंदी/इंग्रजी विषयासह पदवी उत्तीर्ण अधिक हिंदी/इंग्रजी ट्रान्स्लेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – रु. ५०,०००/-

निवड पद्धती – (१) सब-डिव्हिजनल ऑफिसर – लेखी परीक्षा १५० गुणांसाठी (टेक्निकल नॉलेज – १०० गुण, जनरल नॉलेज/जनरल अ‍ॅप्टिटय़ूड – २५ गुण, जनरल इंग्लिश – २५ गुण)कालावधी दोन तास.

(२) हिंदी टायपिस्ट – लेखी परीक्षा १०० गुणांची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची. कालावधी दोन तास.

(३) ज्युनियर हिंदी ट्रान्स्लेटर – लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची २०० गुण.

कालावधी २ तास. (निवडलेल्या उमेदवारांची स्किल टेस्ट घेतली जाईल. जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.)

विहित नमुन्यातील अर्ज www.dgde.gov.in किंवा www.punecantonmentboard.org किंवा http://www.cbkirkee.org.in ÎIYUF किंवा www.cbdehuroad.org  या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज ‘प्रिन्सिपल डायरेक्टर, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ईसीएचएस पॉलिक्लिनिकजवळ, कोंढवा रोड, पुणे – ४११ ०४०’ या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह साध्या पोस्टाने दि. १५ मे २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

अर्जा सोबत

(१) १० ७ २२ सें.मी. आकाराचे दोन लिफाफे ज्यावर स्वत:चा पत्ता लिहिलेले आणि प्रत्येकी १०/- रुपयांचे पोस्टाचे शिक्के लावलेले असावेत.

(२) दोन पासपोर्ट आकाराचे स्वयंसाक्षांकित केलेले (एक अर्जावर चिकटवावा व दुसरा अर्जासोबत जोडावा)(३) जन्मतारीख, शिक्षण, कॅटेगरीबाबतचे दाखले जोडावेत.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com