• अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात पुढील ५७ पदांची भरती.

१) तपासनीस/पोलीस उपनिरीक्षक (अंमुके) – ४७ पदे. (अजा – ६, अज – ३, विजा (अ)/भज (क) प्रत्येकी २ पदे, भज (ब)/भज (ड), विमाप्र प्रत्येकी – १, इमाव – ९, खुला – २२) पे बँड – ९,३००/- – ३४,८००/-. ग्रेड पे – रु. ४,३००/-.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी  महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र.

शारीरिक पात्रता – सुदृढ शरीरयष्टी व निर्दोष दृष्टी आवश्यक. अपंग उमेदवार अपात्र आहेत.

२) सहा. शासकीय दस्तावेज परीक्षक – १० पदे सरळ सेवा भरती पद्धतीने (नामनिर्देशाने नियुक्ती करण्यात येईल.)

पात्रता – रसायनशास्त्र मुख्य विषय व भौतिकशास्त्र उपविषय घेऊन पदवी उत्तीर्ण. संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र. (ज्या उमेदवारांनी छायाचित्रणातील ज्ञान, विधि शाखेतील पदवी धारण केली आहे, मोडी लिपी, उर्दू आणि गुजराती भाषेचे ज्ञान प्राप्त केले आहे, अशांना प्राधान्य. उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात.

परीक्षा शुल्क – रु. ६००/-  (मागास प्रवर्ग – रु. ५००/-).

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. परीक्षेचे माध्यम मराठी राहील. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील १२० गुणांची परीक्षा, प्रत्येक प्रश्नास २ गुण ठेवण्यात येतील. कालावधी ९० मिनिटे.

निरीक्षण चाचणी ८० गुणांची असेल. काही वस्तूंचे काही मिनिटांत निरीक्षण करून पुढील काही मिनिटांत त्या वस्तूंची नावे उत्तरपत्रिकेत नोंदवायची आहेत. प्रत्येक वस्तूच्या नोंदीसाठी समान गुण असतील. लेखी परीक्षेचे गुण व निरीक्षण चाचणीचे गुण एकत्रित करून प्राप्त गुणांनुसार व प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी www.mahacid.com या संकेतस्थळावर प्रदíशत केली जाईल. वरील संकेतस्थळांवर दि. १४ डिसेंबर, २०१७ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.

 

  • स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कंबाइंड हायर सेकंडरी (१०+२) परीक्षा २०१७ दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी ssc.nic.in या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.

रिक्त पदांचा तपशील –

(१) लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी)/ ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (जेएसए) – ८९८ पदे.

(२) पोस्टल असिस्टंट (पीए)/सॉìटग असिस्टंट (एसए) – २,३५९ पदे.

(३) डेटा एन्ट्री ऑपरेटर – २ पदे. एकूण ३,२५९ पदे. (विकलांग/माजी सनिक यांच्यासाठी नियमानुसार जागा राखीव)

या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण.

वेतन श्रेणी रु. ५,२००/- २०,२००/-

पद क्र. (१) साठी ग्रेड पे रु. १,९००/-. एकूण वेतन रु. २७,६००/-. इतर पदांसाठी ग्रेड पे रु. २,४००/-, एकूण वेतन रु. ३६,६३९/-.

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे दि. १.८.२०१८ रोजी (इतर मागासवर्ग – १८ ते ३० वर्षे, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – १८ ते ३२ वर्षे) (परित्यक्ता/विधवा – खुला गट  ३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षेपर्यंत)

(विकलांग – खुला गट – ३७ वर्षे, इमाव – ४० वर्षे, अजा/ अज – ४२ वर्षेपर्यंत) या परीक्षेस बसू शकतात.)

 

परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अज/अपंग/महिला यांना फी माफ). कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल (१०+२)

परीक्षेची निवड पद्धती –

  • कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा (टायर – १) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • ज्यात पार्ट – १ – इंग्रजी भाषा; पार्ट – २ – सामान्य बुद्धिमत्ता; पार्ट – ३ – क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड (अंकगणित);  पार्ट -४ – सामान्य जागरूकता या विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयावरचे २५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील. (एकूण गुण २००) प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.५० गुण वजा केले जातील.
  • वर्णनात्मक परीक्षा (टायर – २) १०० गुणांसाठी – वेळ १ तास. (पेन अँड पेपर मोड) ज्यात उमेदवारांचे लेखनकौशल्य तपासले जाईल.
  • निबंध लेखन (२००-२५० शब्द), पत्र/अर्ज लेखन (१५०-२०० शब्द) (इंग्रजी/हिंदी माध्यम) (किमान पात्रता निकष ३३ गुण).
  • स्किल टेस्ट/टायिपग टेस्ट – डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी डेटा एन्ट्री स्पीड ८,००० श.प्र.मि.
  • सी अँड एजी (कॅग) मधील डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी डेटा एन्ट्री स्किल टेस्ट १५,००० की-डिप्रेशन्स पर मिनट या वेगाने इंग्रजी टायिपग (कॉम्प्युटरवर) परीक्षा (१५ मिनिटे कालावधी) फक्त पात्रता स्वरूपाची. सॉìटग असिस्टंट/पोस्टल असिस्टंट पदांसाठी कॉम्प्युटरवर टायिपग टेस्ट इंग्रजी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि (वेळ १० मिनिटे).
  • अंतिम निवड टायर – १ आणि टायर – २च्या गुणवत्तेनुसार केली जाईल. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज http://www.ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि. १८ डिसेंबर, २०१७ पर्यंत करावयाचे आहेत. ज्यांनी एसबीआय् चलान ऑनलाइन दि. १८ डिसेंबर, २०१७ पर्यंत डाउनलोड केले असेल, अशांना ऑफ लाइन फी भरण्याचा अंतिम दि. २० डिसेंबर, २०१७ आहे.