18 January 2019

News Flash

नोकरीची संधी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल्) रावतभाटा राजस्थान साईट

  • न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल्) रावतभाटा राजस्थान साईट, कोटा राजस्थान (जाहिरात क्र. आरआर्साईट/एचआरएम/१०/२०१८) पुढील पदांची भरती.

(१) असिस्टंट ग्रेड-१ (एचआर्) – १७ पदे (अजा -१, अज – ४, इमाव – ६, यूआर – ३, विकलांग – व्हीएच – २, एचएच – १)

पात्रता – पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

(२) असिस्टंट ग्रेड – १ (एफ अँड ए) – २० पदे (अजा – ३, अज – ४, इमाव – ४, यूआर – २, विकलांग – व्हीएच – ३, एचएच- २, ओएच – २)

पात्रता – बी.कॉम. किंवा समतुल्य पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

(३) असिस्टंट ग्रेड-१ (सी अँड एमएम) – १० पदे (अजा – ३, अज – १

इमाव – २, यूआर – १)

पात्रता – बी.एससी. (पी, सी, एम, स्टॅट्स)/बीबीए/बी.कॉम.

किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

(४) स्टेनो ग्रेड-१ – १० पदे.

पात्रता – पदवी कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. २५ एप्रिल २०१८ रोजी)

२१ ते २८ वर्षे (उच्चतम वयोमर्यादा शिथिल इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे,

विकलांग – १०/१३/१५ वर्षे)

वेतन – दरमहा रु. ३३,०००/-

निवड पद्धती – (१) स्टेज -१ प्रिलिमिनरी टेस्ट – १ तास कालावधी. सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी (२५ प्रश्न), कॉम्प्युटर ज्ञान (१५ प्रश्न), इंग्रजी (१० प्रश्न) एकुण १५० गुण.

(२) स्टेज – २ अ‍ॅडव्हान्स्ड टेस्ट – १५० गुणांची, २ तास कालावधी. क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड (२५ प्रश्न), क्रिटिकल रिजिनग (२५ प्रश्न)

(३) स्कील टेस्ट –

(ए) असिस्टंट ग्रेड-१ पदांसाठी – कॉम्प्युटर टाईिपग टेस्ट आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट.

(बी) स्टेनो – ग्रेड-१ पदांसाठी – स्टेनोग्राफी टेस्ट – ८० श.प्र.मि. इंग्रजी स्टेनोग्राफी व ४० श.प्र.मि. इंग्रजी टायिपग (हिंदी स्टेनोग्राफी/टाईिपग येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.), कॉम्प्युटर प्रोफिशिअन्सी टेस्ट. (स्टेज-१ व स्टेज-२ च्या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाच्या ज्यात एका बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील व एका चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल.)

याशिवाय नर्स (४), पुरुष – ५ पदे व महिला – ३ पदे, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन (१ पद),

एक्स-रे टेक्निशियन (१ पद), ऑपरेशन थिएटर असिस्टंट (२ पदे) पदांची भरती.

ऑनलाईन अर्ज

https://www.npcilcareers.co.in  या संकेतस्थळावर दि. २४ मे २०१८ (२७.०० वाजे) पर्यंत करावेत.

 

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

First Published on May 17, 2018 12:01 am

Web Title: loksatta job opportunity 20