|| सुहास पाटील

डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, हेवी वॉटर बोर्ड, मुंबई (जाहिरात क्र. एचडब्ल्यूबी/ १/२०१८) – १० वी, १२ वी, आयटीआय, इंजिनीअरिंग डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण उमेदवारांची भरती.

(१) स्टायपेंडिअरी ट्रेनी –

कॅटेगरी-कक, एकूण १३९ पदे.

(i) प्रोसेस/प्लांट ऑपरेटर – ६० पदे.

पात्रता – १२ वी (विज्ञान) (पीसीएम्) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(ii) इलेक्ट्रिकल – २८ पदे,

(iii) मेकॅनिकल (फिटर) – ३४ पदे,

(iv) टर्नर – ४ पदे,

(v) मशिनिस्ट – ५ पदे,

(vi) वेल्डर – ६ पदे,

(vii) ड्राफ्ट्समन (सिव्हील/मेकॅनिकल) – २ पदे.

पात्रता – १० वी किमान सरासरी ६०%  गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय/एनएसी (आयटीआयचा १ वर्षांचा कोर्स असल्यास १ वर्षांचा अनुभव आवश्यक)

वयोमर्यादा – दि. २५ जून २०१८ रोजी

१८ ते २२ वर्षे.

स्टायपेंड प्रतिमाह – पहिल्या वर्षी

रु. १०,५००/-, दुसऱ्या वर्षी रु. १२,५००/-.

निवड पद्धती – स्टेज – १ प्रिलिमिनरी टेस्ट (मॅथेमॅटिक्स, सायन्स आणि जनरल अवेअरनेस)

स्टेज-२ अ‍ॅडव्हान्स्ड् टेस्ट

(संबंधित ट्रेडवर आधारित प्रश्न).

स्टेज-३ स्किल टेस्ट. प्रत्येक बरोबर उत्तराला

३ गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल.

अंतिम निवड स्टेज-२ मधील गुणवत्तेनुसार.

ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास टेक्निशियन-बी (वेतन रु. ३०,०००/-)/टेक्निशियन-सी (वेतन रु. ३७,०००/-) पदावर नेमणूक केली जाईल.

 

(२) स्टायपेंडीअरी ट्रेनी –

कॅटेगरी-क – एकूण ७० पदे.

(i) केमिकल – ३५ पदे, (ii) मेकॅनिकल –

१६ पदे, (iii) इलेक्ट्रिकल – ८ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा- दि. २५ जून २०१८ रोजी

१८ ते २४ वर्षे.

स्टायपेंड प्रतिमाह – रु. १६,०००/-

पहिल्या वर्षी आणि रु. १८,०००/- दुसऱ्या वर्षी.

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्य़ू. लेखी परीक्षा (सायकोमेट्रिक/अ‍ॅप्टिट्यूड/जनरल नॉलेज/दैनंदिन विज्ञान/संबंधित विषय) यावर आधरित प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप – कालावधी – २ तास. प्रत्येक बरोबर उत्तराला १  गुण दिला जाईल व प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/२वजा केला जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास सायंटिफिक असिस्टंट पदावर (वेतन – रु. ६०,०००/-) नेमले जाईल. स्टायपेंडीअरी ट्रेनी पदासाठी शारीरिक मापदंड – उंची – पुरुष-१५२ सें.मी., महिला – १४८ सें.मी. वजन उंचीच्या प्रमाणात असावे.  उच्च पात्रताधारक अर्ज करण्यास पात्र आहेत.

(३) स्टेनोग्राफर ग्रेड-ककक – (ग्रुप-बी) २ पदे. पात्रता – १० वी उत्तीर्ण. इंग्रजी स्टेनोग्राफी स्पीड १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायिपग स्पीड ४५ श.प्र.मि. वेतन – रु. ५०,०००/-

(४) स्टेनोग्राफर – ग्रेड-ककक (ग्रुप सी) – २ पदे.

पात्रता – १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

इंग्रजी स्टेनोग्राफी स्पीड ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायिपग स्पीड ३०  श.प्र.मि. वेतन – रु. ३७,०००/-.

(५) अप्पर डिव्हीजन क्लर्क (यूडीसी) –

७ पदे.  पात्रता – पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (इष्ट पात्रता – इंग्रजी टायिपग स्पीड ३० श.प्र.मि.)

वेतन – रु. ३७,०००/-. पद क्र. (३), (४)

व (५) साठी वयोमर्यादा – २७ वर्षेपर्यंत.

निवड पद्धती –

लेव्हल-१ – लेखी परीक्षा (जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड (अंकगणित)).

लेव्हल-२ – स्टेनोग्राफर पदांसाठी स्टेनोग्राफी टेस्ट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी – इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन (वर्णनात्मक स्वरूपाची लेखी परीक्षा).

 

(६) टेक्निशियन – सी/डी (क्रेन/फोर्कलिफ्ट) ऑपरेटर – २ पदे. पात्रता – १०वी

किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण किंवा १२ वी (विज्ञान आणि गणित) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – ३३ वर्षेपर्यंत.

अनुभव – टेक्निशियन-सीसाठी ४ वर्षांचा आणि टेक्निशियन-डीसाठी ८ वर्षांचा.

वेतन – रु. ३०,०००/-/ रु. ४२,०००/-

 

(७) नर्स-ए – ५ पदे. पात्रता – बी.एस्सी. (नìसग) (नìसग काऊंसिल ऑफ इंडियाकडे रजिस्ट्रेशन आवश्यक)

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत.

वेतन – रु. ६२,०००/- सर्व पदांसाठी वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा /अज – ५ वर्षे.

अर्जाचे शुल्क – रु.१००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ).

ऑनलाईन अर्ज www.hwb.gov.in किंवा www.hwb.mahaonlinegov.in या संकेतस्थळावर दि. २५ जून २०१८ (२४.००वाजे)पर्यंत करावेत.