|| सुहास पाटील

डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर, पुणे – ४११००७ तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा (आयएएस/ आयपीएस/आयएफएस इ.) साठी १ वर्ष कालावधीचा मार्गदर्शन कार्यक्रम सन २०१९.

एकूण ७० जागांकरिता (अल्पसंख्याक – १०, मुस्लीम – ५, इतर प्रत्येकी १) (खुला – प्रवर्ग – ९, इमाव – ४, अजा – ३०, अज – १२, विजा (अ)/भज (ब)/भज (क)/ भज (ड)/विमाप्र प्रत्येकी – १)

प्रवेशासाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दि. २ डिसेंबर २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी २१ ते ३२ वर्षे. (इमाव/भज/विजा/विमाप्र – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत.)

परीक्षा शुल्क – रु. ३७५/- (बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेतून चलानद्वारे)

ऑनलाइन अर्ज www.geexam.com या संकेतस्थळावर दि. १२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत.

विस्तृत जाहिरात www.yashada.org/acec या संकेतस्थळावर पाहावी.

 

दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘नाविक (डोमेस्टिक ब्रँच)’ पदांवर इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये भरती.

रिक्त पदांचा तपशील –

१) ‘कूक’ – मेन्यूप्रमाणे व्हेज/नॉन-व्हेज. जेवण बनविणे, रेशन मालाचा हिशोब ठेवणे इ.

२) ‘स्टय़ुअर्ड’ – ऑफिसर्स मेसमध्ये जेवण वाढणे, उपलब्ध निधी, वाईन आणि सामान यांचा हिशोब ठेवणे, मेन्यू बनविणे इ.

पात्रता – दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज यांना ४५% गुण)

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१९ रोजी १८ ते २२ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००१ दरम्यानचा असावा.) (इमाव – २५ वर्षेपर्यंत, अजा/अज – २७ वर्षेपर्यंत.)

वेतन – दरमहा रु. २७,०००/- (सातवा वेतन आयोग पे-मॅट्रिक्स लेव्हल-३)

निवड पद्धती –

(i) परीक्षा केंद्र निहाय शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, गणित, सामान्य विज्ञान, इंग्रजी, जनरल अवेअरनेस (चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान) आणि रिझिनग (व्हर्बल/नॉन-व्हर्बल) या विषयांवर आधारित प्रश्न.)

(ii) लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी (पीएफटी) आणि (iii) प्राथमिक वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.

पीएफटी – (१) १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे. (२) २० उठाबशा. (३) १० पुशअप्स.

सर्व चाचण्या उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. निवड यादी मार्च २०१९ मध्ये इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

लेखी परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी सादर करावयाची कागदपत्रे (१) फोटो चिकटविलेले ई-अ‍ॅडमिट कार्ड (तीन प्रती), (२) इ. १०चे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, (३) जातीचा दाखला, (४) डोमिसाईल सर्टिफिकेट, (५) ओळखपत्र (पासपोर्ट/ड्रायिव्हग लायसन्स/ आधारकार्ड/व्होटर आयडी/ पॅनकार्ड/ स्कूल-कॉलेज आयडी इ.), (६) इमावसाठी प्रगत गटात मोडत नसल्याचा (एनसीएल) दाखला वरील सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती, (७) १० पासपोर्ट साइज फोटो (निळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर काढलेले) (फोटो एक महिन्यापेक्षा जुने नसावेत.)

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी., छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

दृष्टी – चांगला/खराब डोळा – ६/३६.

प्रशिक्षण – आयएनएस, चिल्का येथे ट्रेनिंग एप्रिल २०१९ पासून सुरू होणार.

त्यानंतर सी ट्रेनिंग आणि दिलेल्या ट्रेडमधील प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाणार.

ऑनलाइन अर्ज

www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर New Events Opportunities Select advertisement for Recruitment of Navik (DB) (10th Entry) 01/2019 Batch दि. २९ ऑक्टोबर २०१८ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.

वेस्टर्न झोनसाठी परीक्षा केंद्र मुंबई. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील.

suhassitaram@yahoo.com