|| सुहास पाटील

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद.) जिल्हा अभियान व्यवस्थापन, पालघर ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या एकुण ५७ जागा.

१) प्रभाग समन्वयक (क्लस्टर को-ऑíडनेटर) – ४१ पदे (महिलांसाठी ११ पदे राखीव)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (समाजकार्य, कृषी एमबीए ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्थापन यातील पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य)

नियुक्तीचे ठिकाण – पालघर, तलासरी, वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड, मोखाडा. एकत्रित मानधन – रु. २०,५०० दरमहा.

२) प्रशासन व लेखा साहाय्यक – ६ पदे. पात्रता – बी.कॉम. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. वेगाची टायिपग परीक्षा उत्तीर्ण. टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

एकत्रित मानधन – रु. १५,०००/-.

३) डेटा एन्ट्री ऑपरेटर – ५ पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण अधिक इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण. शिवाय एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

एकत्रित मानधन – रु. १०,०००/-.

४) शिपाई – ५ पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण.

एकत्रित मानधन – रु. ८,०००/-

सर्व पदांसाठी संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. ३७४/-, मागासवर्गीय – रु. २७४/-

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ३८ वर्षेपर्यंत, मागासवर्गीय – ४३ वर्षेपर्यंत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर दि. ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत.

हेल्पलाईन क्र. १८००३०००७७६६.

निवड पद्धती – क्लस्टर को-ऑíडनेटर पद भरतीकरिता – ८० गुणांची संगणक आधारित परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ८० प्रश्न (मराठी – १४ गुण, इंग्रजी – १४ गुण, सामान्य ज्ञान – १४ गुण, बौद्धिक चाचणी – १४ गुण, सामाजिक शास्त्रे – १४ गुण व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – १० गुण)

मुलाखत – २० गुण. इतर पदांसाठी – १०० गुणांची संगणक आधारीत परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या विषयावरील प्रत्येकी २० गुण.) सदर पद भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, परीक्षा दिनांक, परीक्षा वेळ व ठिकाण इ. www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर व एमएसआरएलएम, पालघर जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. परीक्षा प्रवेशपात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करावेत.

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, बुलढाणा, कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या करारावर पुढील ९३ पदांची भरती.

१) प्रभाग समन्वयक – ५० पदे (तालुका स्तरावर)

पात्रता – पदवी उत्तीर्ण (कृषी/समाजकार्य/रुरल डेव्हलपमेंट इ. पदवीधरांना प्राधान्य.

मानधन रु. २०,५००/-

२) प्रशासन व लेखा साहाय्यक – १३ पदे.

पात्रता – बी.कॉम. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि./मराठी ३० श.प्र.मि. वेगाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आणि एमएस-सीआयटी व टॅली परीक्षा उत्तीर्ण.

मानधन – रु. १५,०००/-.

३) डेटा एन्ट्री ऑपरेटर- १३ पदे.

पात्रता – १०वी उत्तीर्ण आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

मानधन – रु. १०,०००/- प्रतिमाह.

४) शिपाई – १३ पदे.

पात्रता -दहावी उत्तीर्ण आणि जिल्हा स्तरावर इतर

४ पदे.

सर्व पदांसाठी ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – ३८ वर्षेपर्यंत (मागासवर्गीय – ४३ वर्षेपर्यंत)

निवड पद्धती – क्लस्टर को-ऑíडनेटर पद भरतीकरिता – ८० गुणांची संगणक आधारित परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याची स्वरूपाचे ८० प्रश्न (मराठी – १४ गुण, इंग्रजी – १४ गुण, सामान्य ज्ञान – १४ गुण, बौद्धिक चाचणी – १४ गुण, सामाजिक शास्त्रे – १४ गुण व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – १० गुण)

मुलाखत – २० गुण. इतर पदांसाठी – १०० गुणांची संगणक आधारीत परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या विषयावरील प्रत्येकी २० गुण.)

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज  http://buldanamsrlm.govrecruit.in/ या संकेतस्थळावर दि. १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. अर्जाचे शुल्क रु. ३७४/- (मागासवर्गीय रु. २७४/-) लेखी परीक्षा दि. २५ नोव्हेंबर २०१८. अंतिम निवड यादी दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केली जाईल.