|| सुहास पाटील

इंडियन आर्मी, जुल २०१९ पासून सुरू होणाऱ्या १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स-४१ साठी अविवाहित पुरुष उमेदवारांना प्रवेश.

पात्रता – बारावी (पी.सी.एम. विषयांसह) सरासरी किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २००३ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची – १५७.५ सें.मी.

एकूण रिक्त पदे – ९०.

ट्रेनिंग – एकूण ५ वर्षांचे ट्रेनिंग दिले जाईल.

(अ) १ वर्षांचे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग – ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, गया येथे दिले जाईल.

(ब) टेक्निकल ट्रेनिंग – फेज-१ (प्री-कमिशिनग ट्रेनिंग – ३ वर्षांचे (सीएमई, पुणे किंवा एम्सीटीई, महू (मध्य प्रदेश) किंवा एमसीईएम्ई, सिकंदराबाद येथे) (i) फेज – २ – पोस्ट कमिशिनग ट्रेनिंग – १ वर्षांचे अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ट्रेनीजना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची इंजिनीअिरग पदवी दिली जाईल.

स्टायपेंड – ३ वर्षांचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. ४ वर्षांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास उमेदवारांना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल.

उमेदवारांना पे-मॅट्रिक्सच्या लेव्हल-१० साठी लागू असलेले वेतन किमान रु. ८०,०००/- देय असेल व ट्रेनिंग कालावधीसाठीचे लागू असलेल्या इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल.

निवड पद्धती – बारावीतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी सिलेक्शन सेंटर वाटप केले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी आर्मीच्या संकेतस्थळावर लॉग इन करून एसएसबी सेंटरची प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती नियमानुसार सेंटर निवडता येईल.

(सिलेक्शन सेंटर्स – बंगळुरु (कर्नाटक), भोपाळ (मध्य प्रदेश), कापूरथाला (पंजाब) आणि अलाहाबाद (उत्तर प्रदेश.)

(i) स्टेज-१ – सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्टिंग इ. (i) स्टेज-२ – स्टेज-१ उत्तीर्ण उमेदवार स्टेज-२ टेस्टिंगसाठी जातील. एसएसबी टेस्टिंग प्रक्रिया ४-५ दिवस चालेल.

(i) मेडिकल टेस्ट.

एसएसबी मुलाखत जानेवारी, २०१९ मध्ये आयोजित केल्या जातील.

उमेदवारांनी फक्त एकच अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी (१२.०० वाजे) पर्यंत करता येतील.

ऑनलाइन अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यावर ३० मिनिटांनी उमेदवारांनी दोन पिट्रआऊट्स काढाव्यात. ज्यावर रोल नंबर दिलेला असेल. ऑनलाइन अर्जाच्या पिट्र आऊटची एक कॉपी स्वयंसाक्षांकित करून सिलेक्शन सेंटरवर एस्एसबी मुलाखतीच्या वेळी पुढील कागदपत्रांसह सादर करावयाची आहे.

(i) दहावी प्रमाणपत्र/गुणपत्रक (ओरिजिनल), (ii) बारावी प्रमाणपत्रक/गुणपत्रक (ओरिजिनल), (iii) आयडी प्रूफ (ओरिजिनल), (iv) वरील प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित दोन प्रती, (५) अर्जासोबत स्वयंसाक्षांकित २० पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स आणावेत.

suhassitaram@yahoo.com