21 September 2020

News Flash

नोकरीची संधी

१) आय.टी. ऑफिसर्स - २१९ पदे (अजा - ३७, अज - ११, इमाव - ५४, खुला - ११७)

|| सुहास पाटील

आयबीपीएस २० सहयोगी बँकांत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर्स स्केल-१’ पदांच्या भरतीसाठी (सीआरपी एसपीएल-श्ककक) ऑनलाइन परीक्षा डिसेंबर २०१८/जानेवारी २०१९ मध्ये आयोजित करणार आहे.

१) आय.टी. ऑफिसर्स – २१९ पदे (अजा – ३७, अज – ११, इमाव – ५४, खुला – ११७)

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स/आय.टी./इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा एम्एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/एमसीए इ.) किंवा डीओईएसीसी ‘बी’ लेव्हल परीक्षा उत्तीर्ण पदवीधारक.

२) अ‍ॅग्रिकल्चरल फिल्ड ऑफिसर – ८५३ पदे (अजा – १४६, अज – ४४, इमाव – २२०, खुला – ४४३)

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टिकल्चर/अ‍ॅनिमल हजबंडरी/व्हेटर्नरी सायन्स /डेअरी सायन्स/फूड टेक्नॉलॉजी इ.)

३) राजभाषा अधिकारी – ६९ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १८, खुला – ३८)

पात्रता – एम.ए. (हिंदी) (पदवी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण) किंवा एम.ए. (संस्कृत) (हिंदी आणि इंग्रजी विषय घेऊन पदवी उत्तीर्ण).

४) लॉ ऑफिसर – ७५ पदे (अजा – १०, अज – ५, इमाव – १९, खुला – ४१)

पात्रता – एलएल.बी. उत्तीर्ण.

५) एचआर पर्सोनेल ऑफिसर – ८१ पदे (अजा – १५, अज – ४, इमाव – १९, खुला – ४३)

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि पर्सोनेल मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन्स/एचआर/एचआरडी/सोशल वर्क/लेबर लॉमधील पदवी/पदविका उत्तीर्ण.

६) मार्केटिंग ऑफिसर – ३०२ पदे (अजा – ३९, अज – २०, इमाव – ८८, खुला – १५५)

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि एमएमएस/एमबीए (मार्केटिंग)/पीजीडीबीए/पीजीडीबीएम् इ. (सर्व पदांमधून काही पदे अपंगांसाठी राखीव आहेत)

वयोमर्यादा – दि. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २० ते ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, अपंग – ४० वर्षेपर्यंत)

निवड पद्धती – लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी पदांसाठी –

(अ) पूर्व परीक्षा – इंग्लिश लँग्वेज – ५० प्रश्न/२५ गुण, रिझिनग – ५० प्रश्न/५० गुण,

जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न/५० गुण (बँकिंग इंडस्ट्रीशी आधारित) एकूण १२५ गुण, वेळ प्रत्येकी ४० मिनिटे, एकूण १२० मिनिटे.

इतर पदांसाठी – इंग्लिश लँग्वेज – ५० प्रश्न/२५ गुण, रिझिनग – ५० प्रश्न/५० गुण, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न/५० गुण, प्रत्येकी ४० मिनिटे, एकूण १२० मिनिटे.  (ब) मुख्य परीक्षा – राजभाषा अधिकारी पदासाठी – व्यावसायिक ज्ञान ऑब्जेक्टिव्ह ४५ प्रश्न आणि डिस्क्रिप्टीव्ह – २ प्रश्न, एकूण ६० गुण, वेळ प्रत्येकी ३० मिनिटे, एकूण ६० मिनिटे.  इतर पदांसाठी – व्यावसायिक ज्ञान – ६० प्रश्न/६० गुण, वेळ ४५ मिनिटे.

ऑब्जेक्टिव्ह परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण (प्रश्नासाठी असलेल्या गुणांच्या) वजा केले जातील.  (क) मुलाखत – ऑनलाइन परीक्षेतून शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना सहयोगी बँकांच्या मुलाखतीस सामोरे जावे लागेल. ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर दि. २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत.

 

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)

दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी कम्बाइंड डिफेन्स सíव्हसेस एक्झामिनेशन आयोजित करणार आहे. यातून ४१७ पदांची भरती पुढील कोर्सससाठी केली जाईल.

१) इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए), डेहराडून – १०० पदे.

२) इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (आयएनए), इझिमाला – ४५ पदे.

३) एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद – ३२ पदे.

४) ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – २४० पदे (एसएससी (पुरुष) – १७१ पदे, जेएजी (पुरुष) – ४ पदे, एनसीसी स्पेशल एन्ट्री – ५० पदे, एस्एस्सी (महिला) – १५ पदे). (महिला उमेदवार फक्त ओटीए, चेन्नई आर्मी ट्रेनिंगसाठी पात्र आहेत.) ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही.

वयोमर्यादा – आयएमए आणि आयएनएसाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९६ ते १ जानेवारी २००१ दरम्यानचा असावा. एअरफोर्स अ‍ॅकॅडमीसाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ ते १ जानेवारी २०००दरम्यानचा असावा. ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीसाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००१ दरम्यानचा असावा.

पात्रता – (i) आयएमए आणि ओटीएसाठी पदवी (कोणत्याही शाखेतील), (ii) आयएनएसाठी इंजिनीअरिंग पदवी, (iii) एअरफोर्स अ‍ॅकॅडमीसाठी पदवी (कोणत्याही शाखेतील परंतु बारावी फिजिक्स/गणित विषयांसह उत्तीर्ण असावा.) किंवा इंजिनीअरिंग पदवी.

शारीरिक मापदंड – आर्मीसाठी उंची (पुरुष) १५७.५सें.मी., (महिला) – १५२ सें.मी. नेव्हीसाठी पुरुष – १५७ सें.मी., एअरफोर्ससाठी पुरुष – १६२.५ सें.मी.

छाती (पुरुष) – किमान ५ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक.

उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक. (जाहिरातीतील अपेंडिक्स-कश् प्रमाणे)

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/महिला उमेदवारांना फी माफ)

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा आणि मुलाखत. आयएमए, आयएनए आणि एअरफोर्स अ‍ॅकॅडमीसाठी (इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, प्राथमिक गणित – १०० गुण, कालावधी प्रत्येकी २ तास). ओटीएसाठी (इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, कालावधी प्रत्येकी २ तास)

लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी सारखेच गुण असतील. (ओएमआर शीटवर उत्तरे फक्त काळ्या बॉलपॉइंट पेननेच मार्क करावयाची आहेत.)

मुलाखत कालावधी – ४ दिवस

(स्टेज-१ ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट; स्टेज-२ (इंटरव्ह्य़ू, ग्रुप ऑफिसर टास्क्स आणि सायकॉलॉजी टेस्ट्स आणि कॉन्फरन्स))

ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २६ नोव्हेंबर २०१८ (१८.००वाजे)पर्यंत करावेत.

 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ

सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (आयआयएसईआर), पुणे येथे फिजिक्स, केमिस्ट्री, अर्थ अ‍ॅण्ड क्लायमेट सायन्स आणि बायोलॉजी विषयांतील पीएच्.डी. प्रोग्रॅम जानेवारी, २०१९ साठी प्रवेश.

पात्रता – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि पुढीलपकी एका परीक्षेत उत्तीर्ण (सीएसआयआर – यूजीसी एनईटी/जीएटीई/जेईएसटी/एनबीएचएम/जेजीईईबीआयएलएस). विद्यार्थ्यांची अंतिम निवड मुलाखतीतील कामगिरीवर आधारित केली जाईल.

कोर्स फी – सेमिस्टर-१ जनरल/ओबीसी –

रु. ४१,८००/-, अजा/अज – रु. २३,६००/-,

सेमिस्टर २ व ३ साठी रु. ९,९०५/- (रु. ४०४९/- अजा-अज) एकूण १० सेमिस्टर्स.

ऑनलाइन अर्ज  http://www.iiserpune.ac.in/admissions/phd-programme या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत.

शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केली जाईल. मुलाखती १०/११ डिसेंबर २०१८ रोजी होतील.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 12:04 am

Web Title: loksatta job opportunity 40
Next Stories
1 करिअर मंत्र
2 यूपीएससीची तयारी : १९९१च्या आर्थिक सुधारणा
3 संशोधन संस्थायण : शोध जैवतंत्रज्ञानाचा
Just Now!
X