|| सुहास पाटील

मध्य रेल्वे डिव्हिजनल ऑफिस, पर्सोनेल ब्रँच, मुंबई डेटा एन्ट्री ऑपरेटर्स/एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स/डिजिटल ऑफिस असिस्टंट्स (जाहिरात क्र. BB/P/558/ADM/Contract Staff) – एकूण ७८ पदांची १ वर्षांसाठी काँट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती. (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, खुला – ३९) (प्रत्येकी १ पद अपंग ओएच/व्हीएच/ एचएचसाठी राखीव)

पात्रता – कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स विषयातील पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, अपंग – ४० वर्षेपर्यंत).

मासिक एकत्रित मानधन – रु. २१,६००/-

निवड पद्धती- पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यानंतर स्किल असेसमेंट टेस्ट उमेदवारांची बेसिक कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स (एमएस अ‍ॅप्लिकेशन्स जसे की, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच टायिपग स्किल्स आणि जनरल स्किल असेसमेंट ऑन ऑफिस प्रोसिजर) क्षमता पाहण्यासाठी टेस्ट पीसी/लॅपटॉपवर घेतली जाईल.

विहीत नमुन्यातील अर्ज (www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीत उपलब्ध आहे. About us > Division > Mumbai > Personnel > Engagement of Data Entry Operators/Executive Assistants/Digital Office Assistants) पुढील पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह साध्या पोस्टाने अथवा ड्रॉप इन बॉक्समध्ये टाकून ११ जानेवारी २०१९ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. The Divisional Railway Manager, Personnel Office, 2nd Floor, Annex Bldg., CSMT, Mumbai – 400 001

 

मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथे १ वर्ष कालावधीकरिता पुढील इंजिनीअर्स/ व्होकेशनल अ‍ॅप्रेंटिस पदांवर भरती.

(१) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अ‍ॅप्रेंटिसेस – मेकॅनिकल इंजिनीअर – २ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

(२) इंजिनीअरिंग डिप्लोमा टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसेस – (अ) मेकॅनिकल – ४ पदे, (ब) इलेक्ट्रिकल – १ पद, (क) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(३) व्होकेशनल अ‍ॅप्रेंटिसेस – (१० + २ व्होकेशनल) (अ) एमआरईडीए – १ पद, (ब) ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी – १ पद, (क) पच्रेसिंग अँड स्टोअरकीपिंग – ३ पदे.

पात्रता – १० + २ व्होकेशनल कोर्स पूर्ण.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील अंतिम वर्षांच्या गुणवत्तेनुसार. (वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.)

पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केवळ ३ वर्षांपर्यंत अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता उमेदवार पात्र आहेत.

स्टायपेंड – दरमहा रु. ४,९८४/- ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिससाठी, रु. ३,५४२/- डिप्लोमा (टेक्निशियन) अ‍ॅप्रेंटिससाठी आणि रु. २,७५८/- व्होकेशनल अ‍ॅप्रेंटिसेससाठी.

लोकसत्ता/टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रांच्या १७ डिसेंबरच्या अंकातील (मुंबई आवृत्ती) मधील जाहिरातीत अर्जाचा नमुना दिला आहे. विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज, राजपत्रित अधिकारी/सक्षम प्राधिकारीद्वारा साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती (जातीचा दाखला, जन्माचा दाखला, गुणपत्रिका व इतर) पुढील पत्त्यावर दि. १६ जानेवारी २०१९ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. ‘महाव्यवस्थापक, मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी, अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०२’

suhassitaram@yahoo.com