|| सुहास पाटील

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संधी शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील एकूण ५५५ पदांच्या भरती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा-२०१९’ रविवार, दि. २४ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

१) सामान्य प्रशासन विभाग –

साहाय्यक कक्ष अधिकारी – एकूण २४ पदे

(अजा – ५, अज – २,

विजा (अ) – १, भज (क) – १, इमाव – १, सा व शै मा – ४, खुला – १०)

 

२) वित्त विभाग – ‘राज्य कर निरीक्षाक’ – एकूण ३५ पदे (अजा – ८, अज – ३, विजा (अ) – १, भज (क) – १,

भज (ड) – १, इमाव – ४, विमाप्र – १, सा व शै मा – ६, खुला – १०)

(प्रत्येकी १ पद अपंग पीएच/एचएच/व्हीएचसाठी राखीव)

 

३) गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक – ४९६ पदे (अजा – ६८, अज – ३८, विजा(अ) – १७, भज (ब) – १२,

भज (क) – १८, भज (ड) – १०,

इमाव – ९४, विमाप्र – १०, सा व शै मा – ७९, खुला – १५०.)

सर्व पदांमधून महिलांसाठी ३०% पदे राखीव आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदांमधून ५% पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत.

पात्रता – पदवी किंवा समतुल्य (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र)

 

वयोमर्यादा –

(१) साहाय्यक कक्ष अधिकारी

दि. १ मे २०१९ रोजी १८ ते ३८ (अमागास), १८-४३ (मागासवर्गीय)

(२) राज्य कर निरीक्षक – दि. १  एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (अमागास), १८-४३ वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू), १८-४५ वर्षे (अपंग),

(३) पालीस उपनिरीक्षक – दि. १ मे २०१९ रोजी १९-३१ वर्षे (अमागास), १९-३४ (मागासवर्गीय), १९-३६ वर्षे (खेळाडू.)

वेतनश्रेणी सर्व पदांसाठी रु. ९,३००/-३४,८००/- (ग्रेड-पे ४,३००/-)

अधिक नियमांनुसार भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. ३८,०००/-. (वेतन श्रेणीमध्ये शासनाच्या धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी –

उंची – पुरुष – १६५ सें.मी.,

महिला – १५७ सें.मी.

छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.

 

निवड पद्धती – साहाय्यक कक्ष अधिकारी/राज्य कर निरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा (१०० गुण) दि. २८ जुल २०१९ रोजी व मुख्य परीक्षा – २०० गुण.

साहाय्यक कक्ष अधिकारी – २५ ऑगस्ट २०१९ रोजी आणि राज्य कर निरीक्षक – ११ ऑगस्ट २०१९ रोजी.

पोलीस उपनिरीक्षक – संयुक्त पूर्व परीक्षा (१०० गुण) (दि. २८ जुल २०१९ रोजी), मुख्य परीक्षा (२०० गुण).

(दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी) शारीरिक चाचणी – १०० गुण व मुलाखत – ४० गुण.

संयुक्त पूर्वपरीक्षेस पात्र असल्यास उमेदवार एक, दोन किंवा तीनही पदांसाठी विकल्प (ऑप्शन) देऊ शकतात.

संयुक्त पूर्व परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेकरिता निवडले जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ३७४/- (आमागास), रु. २७४/- (मागासवर्गीय) ऑफलाइन एसबीआय चलानमार्फत दि. ३० जानेवारी २०१९ बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत भरता येईल.

ऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. २९जानेवारी २०१९ पर्यंत करावेत.

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी),

मुंबई ‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

गट-ब (अराजपत्रित)’च्या ४०५पदांची भरती.

(अजा – ३४, अज – ११, विजा (अ) – ५, भज (ब) – ९, भज (क) – ९, विमाप्र – ६, इमाव – ४७, सा व शै मा -६५, खुला – २१९)

(महिलांसाठी ३०%, खेळाडूंसाठी ५% आणि अनाथांसाठी खुल्या प्रवर्गात १% आरक्षण)

(६ पदे कर्णबधिर आणि ६ पदे अस्थिव्यंग (३ पदे प्रत्येकी ओएल/ओए) साठी राखीव)

पात्रता – (दि. ३ जानेवारी २०१९ रोजी) स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका (डिप्लोमा सिव्हील इंजिनीअरिंग) किंवा शासन सार्वजनिक बांधकाम विभाग राजपत्र कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सेवाप्रवेश नियम दि. १ जानेवारी १९९८ द्वारे मान्यता दिलेली समतुल्य पात्रता.

वयोमर्यादा – १८ ते ३८वर्षे (मागासवर्गीय/खेळाडूंसाठी १८-४३ वर्षे, अपंग उमेदवारांसाठी – १८-४५ वर्षे).

वेतनश्रेणी – (पी.बी. १) रु. ९,३००/- ३४,८००/- ग्रेड-पे ४,३००/- (सहाव्या वेतन आयोगानुसार).

अंदाजे वेतन दरमहा रु. ३८,०००/-.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची

(१) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजीत एकुण ७५ प्रश्न, प्रत्येकी २ गुण आणि

(२) सामान्य ज्ञान – (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी इंग्रजी व मराठी भाषेत एकूण २५ प्रश्न प्रत्येकी २ गुण) एकुण १०० प्रश्न, २०० गुण. चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुणपद्धत अवलंबली जाणार नाही.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग रु. ४५०/-. (राखीव वर्ग रु. २५०/-) (फक्त ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहे.) ऑनलाइन अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ जानेवारी २०१९पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com