|| सुहास पाटील

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबादमध्ये गट-क संवर्गातील ‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)’ (वेतनश्रेणी रु.९,३००/- ३४,८००/- ग्रेड वेतन रु. ४,३००/-) च्या एकूण ११ पदांची भरती. (अजा – २, भज(क) – १, विमाप्र – १, सा.व शै.मा. – २, इमाव – ५)

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका.

वयोमर्यादा – दि. १ फेब्रुवारी २०१९ रोजी १८-४३ वर्षे (मागासवर्गीय) (४५ वर्षांपर्यंत माजी सनिक)

निवड पद्धती – भरती परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (ओएमआर उत्तरपत्रिका) (मराठी १० प्रश्न, इंग्रजी १० प्रश्न, सामान्यज्ञान – १० प्रश्न, बुद्धिमापन चाचणी – १० प्रश्न, अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी – ६० प्रश्न, एकूण १०० प्रश्न). प्रत्येक प्रश्नाला २ गुण, एकूण २०० गुण.

परीक्षा शुल्क – रु. ३००/- राखीव प्रवर्गासाठी (महिला, मागासवर्ग, माजी सनिक, अंशकालीन इ.) ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क www.aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावर https://onlinesbi.com/sbicollect/collecthome.htm?corpID=938905  या लिंकवर दि. २३ फेब्रुवारी २०१९पर्यंत भरावे. www.aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज दि. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी देवगिरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय (वेदांत हॉटेलकडील गेटवर), स्टेशन रोड, औरंगाबाद येथे घेऊन ११ ते १२ वाजेदरम्यान उमेदवारांनी थेट भरती प्रक्रियेसाठी हजर राहावे, येताना प्रवेशपत्र (दोन प्रती) त्यावर फोटो चिकटवून संपूर्ण माहिती भरून तसेच विहित नमुन्यातील अर्ज, जाहिरातीत नमूद केलेली कागदपत्रे स्वसाक्षांकित करून परीक्षा केंद्रावर हजर राहावयाचे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड यादी www.aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावर दि. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांनी दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मूळ कागदपत्रांसह औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात (टाऊन हॉल) येथे हजर राहावयाचे आहे.

suhassitaram@yahoo.com