18 July 2019

News Flash

नोकरीची संधी

झोननुसार रिक्त पदांचा तपशील -

|| सुहास पाटील

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) (जाहिरात क्र. ०१/२०१९ – एफसीआय कॅटेगरी-३) ज्युनियर इंजिनीअर, असिस्टंट ग्रेड-२, असिस्टंट ग्रेड-३ च्या एकूण ४,१०३ पदांची भरती. झोननुसार रिक्त पदांचा तपशील –

नॉर्थ झोन – १,९९९ पदे,

साऊथ झोन – ५४० पदे,

ईस्ट झोन – ५३८ पदे,

वेस्ट झोन – ७३५ पदे,

नॉर्थ-ईस्ट झोन – २९१ पदे.

वेस्ट झोनमधील रिक्त पदांचा तपशील –

१) असिस्टंट ग्रेड-३ (डेपो) – एकूण ३५३ पदे (अजा – ३०, अज – ६७, इमाव – ५९, ईडब्ल्यूएस – ३५, खुला – १६२) (१४ पदे अपंग व ५१ पदे माजी सनिक यांच्यासाठी राखीव.)

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) आणि संगणक कौशल्य.

२) असिस्टंट ग्रेड-३ (टेक्निकल) – १५३ पदे (अजा – ३१, अज – १४, इमाव – ०, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ९३) (अपंग – ७, माजी सनिक – २२ पदे राखीव.)

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर/बॉटनी/झुऑलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/बायो-केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/फूड सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक. (फूड सायन्स/फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी/अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग/बायो-टेक्नॉलॉजी.)

३) असिस्टंट ग्रेड-३ (अकाऊंट्स) – ६५ पदे (अजा – ८, अज – ६, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३७) (३ पदे अपंग, १० पदे माजी सनिक यांच्यासाठी राखीव.)

पात्रता – बी.कॉम. आणि संगणक कौशल्य.

४) असिस्टंट ग्रेड-३ (जनरल) – १२४ पदे (अजा – १२, अज – २३, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ५७) (५ पदे अपंग, १८ पदे माजी सनिक यांच्यासाठी राखीव.)

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) आणि संगणक कौशल्य.

५) टायपिस्ट (हिंदी) – ४ पदे (अज – १, खुला – ४) (१ पद बी/एलव्ही अपंग यांच्यासाठी राखीव.)

पात्रता- पदवी (कोणतीही शाखा),  हिंदी टायिपग – ३० श.प्र.मि. (हिंदी व इंग्रजी टायिपग येणाऱ्या व संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)

६) असिस्टंट ग्रेड-२ (हिंदी) – ४ पदे (१ पद बी/एलव्ही अपंग यांच्यासाठी राखीव)

पात्रता-हिंदी मुख्य विषयासह पदवी. इंग्रजीतून हिंदी आणि हिंदीतून इंग्रजी भाषांतराचा १ वर्षांचा अनुभव. इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान.

७) स्टेनो ग्रेड-२ – ९ पदे (खुला) (१ पद बी/एलव्ही अपंगांसाठी राखीव). १ पद माजी सनिकांसाठी राखीव.

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स किंवा ओ लेव्हल डीओईएसीसी पात्रता आणि पदवी (कोणतीही शाखा), ४० श.प्र.मि. टायिपग स्पीड व ८० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड.

८) ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल) – ९ पदे (खुला) (१ पद माजी सनिकांसाठी राखीव.)

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी/पदविका (मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदविका धारकांसाठी १ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

९) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल इंजिनीअरिंग) – १४ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईब्ल्यूएस – १, खुला – १०) (अपंग १ पद, माजी सनिक २ पदे राखीव.)

पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी/पदविका) (पदविका धारकांसाठी १ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०१९ रोजी)

पद क्र. १ ते ४ साठी २७ वर्षेपर्यंत.

पद क्र. ५ व ७ साठी – २५ वर्षेपर्यंत,

पद क्र. ६, ८ व ९ साठी – २८ वर्षेपर्यंत (इमावसाठी – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत सूट.)

आयडीए आधारित वेतनश्रेणी –

पद क्र. १ ते ५ साठी रु. ९,३००/-२२,९४०/-,

पद क्र. ६ व ७ साठी – रु. ९,९००/- २५,५३०/-,

पद क्र. ८ व ९ साठी रु. ११,०००/- २९,९५०/- (अधिक इतर भत्ते).

निवड पद्धती –

ऑनलाइन टेस्ट – फेज-१ व फेज-२.

१) ऑनलाइन परीक्षा फेज-१

(१) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, (२) रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, (३) न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न. एकूण १०० प्रश्न प्रत्येकी १ गुण. प्रत्येकी विषयासाठी वेळ २० मिनिटे एकूण वेळ ६० मिनिटे (ऑब्जेक्टिव्ह टाइप). प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. (फेज-१ चे गुण अंतिम गुणवत्तेसाठी मोजले जाणार नाहीत.)

(२) ऑनलाइन परीक्षा फेज-२ –

पेपर-१, पेपर – ३, पेपर – ५ – ऑब्जेक्टिव्ह टाइप १२० प्रश्न प्रत्येकी १ गुण;

पेपर – २ – ऑब्जेक्टिव्ह टाइप ६० प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी;

पेपर- ४ – वर्णनात्मक २ प्रश्न प्रत्येकी ६० गुण.

सर्व ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर्समध्ये चुकीच्या उत्तराला प्रश्नासाठी असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

पेपर – २ साठी ६० मिनिटांचा कालावधी असेल.

इतर पेपर्सना कालावधी प्रत्येकी ९० मिनिटांचा असेल.

पेपर-१ (असिस्टंट ग्रेड-२ हिंदी, टायपिस्ट हिंदी, स्टेनो ग्रेड – २ पदे वगळता सर्व पदांसाठी) – जनरल अ‍ॅप्टिटय़ूड (रिझिनग/जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज) कॉम्प्युटर प्रावीण्य, जनरल अवेअरनेस, करंट इव्हेंट्स, डेटा अ‍ॅनालिसिस/न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी/डेटा इंटरप्रिटेशन.)

पेपर – २ (जेई (सिव्हिल), जेई (इलेक्ट्रिकल), जेई (मेकॅनिकल), एजी-३ (अकाऊंट्स), एजी-३ (टेक्निकल) पदांसाठी संबंधित विषयातील टेक्निकल नॉलेज विषयी प्रश्न.

पेपर-३ एजी ग्रेड-२ (हिंदी) आणि टायपिस्ट (हिंदी) पदांसाठी) – जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटर नॉलेज.

पेपर-४ एजी ग्रेड-२ (हिंदी) पदासाठी ऑनलाइन सब्जेक्टिव्ह टेस्ट – दोन उताऱ्यांचे भाषांतर प्रत्येकी एक इंग्लिशमधून हिंदी आणि एक हिंदीमधून इंग्लिश.

पेपर-५ (स्टेनो ग्रेड-२ पदासाठी) जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटर नॉलेज.

फेज-१ मधील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी धरले जाणार. परीक्षा पद्धती आणि परीक्षेचा अभ्यासक्रम दि. २३ फेब्रुवारी २०१९ एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये पान क्र. १३ व १४ वर उपलब्ध आहे.

३) स्किल टेस्ट-टायपिस्ट (हिंदी)-हिंदी टायिपग टेस्ट, स्टेनो ग्रेड-२ – इंग्रजी टायिपग व शॉर्ट हँड टेस्ट.

४) कागदपत्र पडताळणी –

फेज-१ साठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र-अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर. फेज-२ साठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- (अजा/अज/अपंग/माजी सनिक/महिला यांना फी माफ)

वेस्ट झोनमध्ये पुढील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

(१) महाराष्ट्र, (२) मध्य प्रदेश,

(३) छत्तीसगड, (४) गुजरात,

(५) दादरा नगर हवेली, (६) गोवा.

ऑनलाइन अर्ज www.fci.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ मार्च २०१९ पर्यंत करावेत.

उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन टेस्ट एप्रिल/मे, २०१९ मध्ये आयोजित केली जाईल.

suhassitaram@yahoo.com

First Published on March 9, 2019 12:01 am

Web Title: loksatta job opportunity 48