News Flash

नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २००० ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती.

|| सुहास पाटील

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २००० ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती. (जाहिरात क्र. सीआरपीडी/पीओ /२०१९- २०/०१) (अजा – ३००, अज – १५०, इमाव – ५४०, ईडब्ल्यूएस – २००, खुला – ८१०)

(१) एलडी, (२) व्हीआय, (३) एच्आय्, (4) एसएलडी/एमआय/एमडी प्रत्येकी २० पदे राखीव आहेत.

एचआय कॅटेगरीसाठी ५३ पदे बॅकलॉगमधील राखीव आहेत.)

पात्रता – (दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील)

(अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०१९ रोजी) २१ ते ३० वर्षे (अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अपंग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती –

फेज-१ – प्रीलिमिनरी एक्झामिनेशन (दि. ८, ९, १५ व १६ जून २०१९ रोजी) ऑब्जेक्टिव्ह टाइप १०० गुण, वेळ ६० मिनिटे. (i) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, (ii) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ३५ प्रश्न, (iii) रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न.)

प्रत्येक सेक्शनसाठी वेळ २० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नाला असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

फेज-२ – मुख्य परीक्षा (दि. २० जुल २०१९ रोजी)

(i) ऑब्जेक्टिव्ह टाईप – २०० गुण, वेळ ३ तास.

(ii) डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट – ५० गुण, वेळ ३० मिनिटे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज (लेटर व निबंध लेखन)

फेज-३ – (सप्टेंबर २०१९ दरम्यान) ग्रुप एक्झरसाईज (२० गुण) व मुलाखत

(३० गुण) अंतिम निवडीसाठी फेज-२ व फेज-३ मधील गुण विचारात घेतले जातील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी खुल्या गटातील उमेदवार फक्त ४ वेळा परीक्षेला बसू शकतात. (इमावचे उमेदवार ७ वेळा बसू शकतात.) (अजा/अजसाठी अट लागू नाही.)

परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/अज/अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी बँक परीक्षापूर्व प्रशिक्षण पुढील केंद्रांवर देणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. अजा/अज/अल्पसंख्यांक उमेदवार जे सशुल्क परीक्षापूर्व प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्यांनी ऑनलाईन अर्जात तसे नमूद करावे.

ऑनलाइन पूर्वपरीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई /ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा.

ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी केंद्र – औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/ नवी मुंबई.

पूर्व परीक्षेचा निकाल जुल २०१९च्या पहिल्या आठवडय़ात मुख्य परीक्षेचा निकाल ऑगस्ट, २०१९च्या तिसऱ्या आठवडय़ात आणि अंतिम निकाल ऑक्टोबर, २०१९च्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर केला जाईल.

परीक्षा शुल्क – रु. ७५०/- (अजा/अज/अपंग – रु. १२५/-)

निवडलेल्या उमेदवारांना बँकिंग नॉलेजचे बेसिक ट्रेनिंगसाठी ऑनलाइन कोर्स करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers

या संकेतस्थळावर दि. २२ एप्रिल २०१९ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:36 am

Web Title: loksatta job opportunity 50
Next Stories
1 ‘सक्षम’ विद्यार्थी घडवताना!
2 यूपीएससीची तयारी : राज्यव्यवस्था
3 दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा
Just Now!
X