News Flash

नोकरीची संधी

आयआयएसईआर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट

|| सुहास पाटील

आयआयएसईआर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (भारत सरकार, मानव संसाधन आणि विकास मंत्रालयअंतर्गत स्वायत्त संस्था) बेरहामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरूअनंथपुरम्, तिरुपती या ७ कॅम्पसमधील ‘BS-MS दुहेरी पदवी प्रोग्रॅम २०१९’ मधील प्रवेशासाठी ‘आयआयएसईआर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (आयएटी) २०१९’ दि. २ जून २०१९ रोजी घेणार आहे.

  • बॅचलर ऑफ सायन्स – मास्टर ऑफ सायन्स BS-MS (Dual Degree) हा एक ५ वर्ष कालावधीचा दुहेरी पदवी शिक्षणक्रम आहे. (८ सेमिस्टर्स ज्यात लॅबोरेटरी, लेक्चर्स आणि प्रोजेक्ट्सचा समावेश असेल. त्यानंतर २ सेमिस्टर्समध्ये मास्टर्स रिसर्च प्रोजेक्टचा समावेश असेल.) बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयातील बीएस-एमएस दुहेरी पदवी शिक्षणक्रमासाठी बहुतेक आयआयएसईआरमध्ये प्रवेश दिला जातो. अर्थ अँड इन्व्हिरॉनमेंटल सायन्सेस विषयातील अभ्यासक्रमासाठी काही निवडक आयआयएसईआरमध्ये प्रवेश दिला जातो.
  • प्रवेश क्षमता – एकूण १,४८१. (बेरहामपूर – १५०, भोपाळ – २२५, कोलकाता – २२०, मोहाली – २२५, पुणे – २५६, तिरूअनंतपुरम् – २२०, तिरुपती – १८५)

५० % जागा KVPY आणि JEE-Advanced चॅनेलमधून भरल्या जातील.

इतर ५०% जागा स्टॅट अँड सेंट्रल बोर्ड (एससीबी) चॅनेलमधून भरल्या जातील.

पात्रता – बारावी (विज्ञान) शाखेतून २०१८ किंवा २०१९मधील परीक्षा टॉप २०पर्सेटाइलसह उत्तीर्ण.

उमेदवारांना तीन चॅनेल्समधून प्रवेश दिला जातो.

(१) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना KVPY) चॅनेल २०१९-२० साठी KVPY फेलोशिप मिळविलेले विद्यार्थी.

(२) जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE-Advanced) (इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ टेक्नॉलॉजी)च्या कॉमन रँक लिस्ट (CRL) मधील १०,००० रँकपर्यंतचे उमेदवार.

(३) स्टेट आणि सेंट्रल बोर्ड्स चॅनेल (SCB)

बारावी (विज्ञान) परीक्षेतील कॅटेगरीनुसार कट ऑफ मार्क्‍स (५०० पकी) इतके गुण मिळविणे आवश्यक.

सीबीएसई – अजा – ४०१,

अज – ३८५, इमाव – ४२०,

खुला – ४३१, अपंग – ३८५.

महाराष्ट्र बोर्ड – अजा – ३२५,

अज – ३१८, इमाव – ३४४,

खुला – ३४२, अपंग – ३१८.

बारावीतील (i) फिजिक्स, (ii) केमिस्ट्री, (iii) बायोलॉजी/मॅथ्स, (iv) एक भाषा, (५) (v) ते (vi) विषयांव्यतिरिक्त ज्या विषयात जास्तीचे गुण मिळाले असतील असा पाचवा विषय निवडावा.

(प्रत्येक विषयातील १०० पैकी गुण काढावेत.)

(इमावसाठी गुणांत ५% ची सूट. अजा/अज/अपंग यांना ५५% गुणांची अट)  (JEE-Advanced) चॅनेलसाठी बारावी (विज्ञान) ला अजा/अज/अपंग उमेदवारांना ६५% गुण व इतरांना ७५%  गुण मिळविणे आवश्यक आहे.)

(ज्या उमेदवारांचा बारावीचा रिझल्ट लागावयाचा बाकी असेल अशा उमेदवारांनी Result Awaited Option मधून अर्ज करावा.) ङश्ढ चॅनेलमधून प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना  ङश्ढच्या नियमांनुसार स्कॉलरशिप मिळेल.

खएए चॅनेल आणि रउइ चॅनेलमधून प्रवेश घेतलेल्या निवडक विद्यार्थ्यांना कठरढकफए स्कॉलरशिप डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकारच्या नियमांनुसार मिळू शकेल.

कोर्स फी – अंदाजे रु. ५०,०००/- प्रत्येक सेमिस्टरला (खुला गट व इमावसाठी) आणि (रु. १५,५००/- प्रत्येक सेमिस्टरला अजा/अज उमेदवारांसाठी).

अर्जाचे शुल्क – रु. २,०००/- (अजा/अज/अपंग यांना रु. १,०००/-). शंकासमाधानासाठी ई-मेल ask-jac2019@iiserb.ac.in (ChairpersonJAC2019 यांना ई-मेल करावा.) फोन नं. ७५५२६९२५००(कामाच्या दिवशी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत) आयआयएसईआर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (IAT-2019) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १८० गुणांसाठी कालावधी १८० मिनिटे.

(१) बायोलॉजी, (२) केमिस्ट्री, (३) मॅथेमॅटिक्स, (४) फिजिक्स प्रत्येक विषयातील १५ प्रश्न (एकूण ६० प्रश्न) प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल.

रउइ चॅनेलमधून कअळ-2019 प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन www.iiseradmission.in  या संकेतस्थळावर दि. २८ एप्रिल २०१९ (१७.०० वाजे)पर्यंत करावे.

ङश्ढ चॅनेल रजिस्ट्रेशनसाठी अ‍ॅडमिशन पोर्टल २६ मे २०१९ पासून सुरू होईल.  खएए चॅनेल रजिस्ट्रेशनसाठी अ‍ॅडमिशन पोर्टल १५ जून २०१९ पासून सुरू होईल व २० जून २०१९ (१७.०० वाजता) बंद होईल.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भोपाळ येथे ४ वर्ष कालावधीच्या इर प्रोग्रॅम इन इंजिनीअरिंग सायन्सेस (केमिकल इंजिनीअरिंग / डेटासायन्स अँड इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स) आणि इकॉनॉमिक सायन्सेससाठी प्रवेश दिला जाईल.

पात्रता – बारावी (विज्ञान) मॅथेमॅटिक्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक. या वर्षी ऑगस्ट २०१९पासून सुरू होणाऱ्या सेमिस्टरपासून, चार वर्ष कालावधीचा बीएस प्रोग्रॅम इन डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंग या नवीन प्रोग्रॅमसाठी प्रवेश आयआयएसईआर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (IAT)२०१९ मधून दिला जाणार आहे. आयआयएसईआर, भोपाळ येथे डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंगमधील बी.एस. प्रोग्रॅम हा इंटरडिसिप्लिनरी स्वरूपाचा असून सायन्स इंजिनीअरिंग सोसायटी इंटररिलेशनशिप मजबूत बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून तयार केला आहे. यात अ‍ॅप्लिकेशन ओरिएंटेड विविध टॉपिक्सचा समावेश असेल.

(जसे की आर्टििफशियल इंटेलिजन्स, मशीन लìनग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, इ.) यातून शैक्षणिक क्षेत्रात आणि इंडस्ट्रीमध्ये उज्ज्वल कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 8:45 am

Web Title: loksatta job opportunity 51
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञान विषयाची तयारी
2 शब्दबोध : लसूण
3 एमपीएससी मंत्र : गट ‘क’ संयुक्त पूर्वपरीक्षा
Just Now!
X