21 November 2019

News Flash

नोकरीची संधी

प्रवेश क्षमता - ७० प्रशिक्षणार्थी.

|| सुहास पाटील

ठाणे महानगरपालिका, ठाणे संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२०च्या पूर्वप्रशिक्षणासाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षणास प्रवेश देण्यासाठी दि. ३० जून २०१९ रोजी एक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

प्रवेश क्षमता – ७० प्रशिक्षणार्थी.

पात्रता – पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण (कोणतीही शाखा) (इमाव/अजा/अज/विजा/भज/विमाप्र यांना गुणांची अट ५०%)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२० रोजी २१-३२ वर्षे (इमाव/विजा/भज/विमाप्र) २१ ते ३५ वर्षे; अजा/अज – २१ ते ३७ वर्षे)

संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण काळात उमेदवारास नोकरी अथवा इतर अभ्यासक्रमात सहभाग घेता येणार नाही.

मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी दि. ५ जुल २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाईल. मुलाखत ९ ते १२ जुल २०१९ दरम्यान घेतली जाईल. अंतिम निवड यादी १८ जुल २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेप्रमाणे सामान्य अध्ययन (जनरल स्टडीजवर आधारित प्रवेश परीक्षा दि. ३० जून २०१९ रोजी सकाळी १०-३० ते १२.०० या वेळेत बांदोडकर विज्ञान विद्यालय, ठाणे पश्चिम येथे घेण्यात येईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती, सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जाचा नमुना संस्थेच्या www.cdinstitute.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील अर्ज पदवी परीक्षेची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट), शाळा सोडल्याचा दाखला, आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि स्टॅम्प साइज छायाचित्राच्या दोन प्रतींसह पुढील पत्त्यावर दि. १५ जून २०१९ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी ११.०० ते संध्या ५.०० वाजेदरम्यान) सादर करावेत. अर्ज पोस्टाने, कुरिअरने, ई-मेलद्वारे स्वीकारले जाणार नाहीत.   चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय, इमारत, वेदांत कॉम्प्लेक्सच्या समोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम)

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (वढरउ) नागरी सेवा परीक्षा २०२० पूर्वप्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाकडून विनामूल्य प्रशिक्षणास प्रवेश देण्यासाठी  रविवार दि. २१ जुल २०१९ रोजी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे.

परीक्षेची वेळ सकाळी ११.०० ते १.०० (दोन तास).

प्रवेश क्षमता –  एकूण ८० (यातील प्रत्येक १० जागा अल्पसंख्याक आयोगाद्वारे अनुदानित आणि अनुसूचित जातींसाठी बार्टीद्वारा अनुदानित असतील).

पात्रता –  पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) वयोमर्यादा (दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी) १ ते ३२ वर्षे (इमाव/विमाप्र/विजा/भज – १२ ते ३५ वर्षे, अजा/अज – २१ ते ३७ वर्षे)

प्रवेश परीक्षा पद्धत – नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रवेश परीक्षा. एकूण २०० गुणांची असेल.

(ज्यात सेक्शन -१ सामान्य अध्यन – १०० गुण व सेक्शन -२ सी सॅट १०० गुण)

सेक्शन – १ मधील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाईल.

सेक्शन  – २ मध्ये पात्रतेसाठी किमान

४० गुण मिळविणे अनिवार्य आहे.

प्रवेश परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ (०.३३) एवढे गुण कमी केले जातील.

प्रवेश परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.

प्रवेश अर्ज शुल्क – रु. ३००/- खुला संवर्गकरिता व रु. १५०/- अजा / अज / इमाव / विमाप्र / विजा / भज संवर्गाकरिता.

संस्थेतील प्रवेशार्थीना (केवळ मुलींना) मर्यादित वसतिगृह प्रवेश, जागांच्या उपलब्धतेनुसार, गुणवत्ता व प्रचलित शासन नियमानुसार देण्यात येतील.

संपर्कासाठी दूरध्वनी क्र.

०२४०- २३३२२१०. ईमेल आयडी – preiasaurangabad@gmail.com ऑनलाईन अर्ज www.preiasaurangabad.ac.in  या संकेतस्थळावर दि. ५ जुल २०१९ पर्यंत करता येतील.

 

भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, (भारत सरकार) (जाहिरात क्र. १/२०१९ आर – कक) वर्क असिस्टंट / ए ग्रुप सीच्या एकूण ७४ पदांची भरती.

(अजा – १, अज – १, इमाव – ६२, खुला – ८, ईडब्ल्यूएस – २) काही पदे अपंगांसाठी राखीव. (ईडब्ल्यूएस)

इकॉनॉमिकली विकर सेक्शन अंतर्गत २ जागा राखीव आहेत. इडब्ल्यूएसमध्ये जे उमेदवार अजा/अज/इमाव आरक्षणात मोडत नाहीत आणि ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न रु. ८ लाखपेक्षा कमी आहे अशांना इडब्ल्यूएसचे आरक्षण मिळू शकेल त्यासाठी त्यांना इन्कम एन्ड असेट सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

कामाचे स्वरूप-परिसरातील स्वच्छता, टापटीपपणा व आरोग्यदायी वातावरणनिर्मिती करून टॉयलेटस अंतर्भूत लॅबोरेटरीज, ऑफिस बिल्डिग व सभोवतालच्या परिसराची सौंदर्यप्रसाधन देखभाल तसेच संकीर्ण ऑफिस कामे, संयंत्रे / यंत्रांची स्वच्छता व निर्जुतुकीकरण, संयंत्रे/कार्यशाळा/ भांडार आणि अन्य उपयोगी एरियात साहाय्य करणे.

डय़ूटी – रात्र-दिवसपाळीतसुद्धा करावी लागेल. माती खणून त्यामध्ये विविध रोपटी लावून बागेचा विकास करणे, झाडलोट, पाणी देणे, खुरपणी, गवतपाणी, खत घालणे, छाटणी, रोपटय़ांची पदास करणे व फुलांची व्यवस्था पेरणी, कापणी, कीटकनाशके व खते उपचार,

पक्ष्यांची टेहळणी इ.

नोकरी दरम्यान उमेदवारांस मिळणारे अधिकच फायदे –

१) स्फूर्तीदायक कामाचे स्वरूप,

२) बढतीची संधी, ३) कामगिरीवर आधारित आकर्षक प्रोत्साहन राशी,

४) स्वत: आणि कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा, ५) रजा मुदतीत प्रवास भत्ता,

६) शैक्षणिक फीचा परतावा,

७) निवास व्यवस्था इ.

पात्रता – १० वी पास, वयोमर्यादा (अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी) १८ ते २७ वर्षे (इमाव – ३० वर्षेपर्यंत, अजा/अज – ३२ वर्षेपर्यंत) (विधवा/परित्यक्ता महिला – ३५/३८/४० वर्षेपर्यंत) (अपंग – ३७/४०/४२ वर्षेपर्यंत.)

निवड पद्धती – प्रवेश परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. प्रत्येक चुकीच्या

उत्तराला १/३ (०.३३) एवढे गुण कमी केले जातील. प्रवेश परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.

स्टेज – १ प्रीलिमिनरी टेस्ट – ५० वस्तुनिष्ठ प्रश्न वेळ १ तास. (गणित – २० प्रश्न, विज्ञान – २० प्रश्न आणि जनरल अवेअरनेस – १० प्रश्न.)

प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण दिले

जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला

१ गुण वजा केला जाईल. रिक्त पदांच्या

४ ते ५ पट उमेदवार स्टेज -२ साठी निवडले जातील.

स्टेज – २ अ‍ॅडव्हान्स टेस्ट – ५० वस्तुनिष्ठ प्रश्न वेळ २ तास (गणित १५ प्रश्न, विज्ञान – १५ प्रश्न, जनरल अवेअरनेस – १० प्रश्न, बेसिक इंग्लिश – १० प्रश्न, प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील. आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. अंतिम निवड स्टेज – २ मधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (महिला / अजा / अज / अपंग / माजी सनिक यांना फी माफ.)

ऑनलाइन अर्ज https://recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर दि. १ जुल २०१९ पर्यंत करावेत.

 

suhassitaram@yahoo.com

First Published on June 12, 2019 2:01 am

Web Title: loksatta job opportunity 55
Just Now!
X