• नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (ठकरट), वाशी, नवी मुंबई/ पाताळगंगा, रायगड/ चेन्नई येथे पुढील पदांची भरती.

(I) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह/ एक्झिक्युटिव्ह

(५ वर्षांच्या करारावर, कामगिरीच्या आधारावर पुढील एक्स्टेन्शन दिले जाऊ शकते.)

१) प्रोग्रॅम को-ऑडनेटर,

२) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन,

३) अकाऊंट्स,

४) एचआर,

५) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट,

६) इस्टेट अँड प्रिमायसेस मॅनेजमेंट डिपार्टमेंट.

पात्रता – पदवी उत्तीर्ण. एक वर्षांचा अनुभव. (उत्कृष्ट शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल. तसेच अपवादात्मक उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह पदावर घेतले जाईल.)

(II) अ‍ॅकॅडेमिक असोसिएट (एससीआय – एक्झाम डिपार्टमेंट) (२ वर्षांच्या करारावर – कामगिरीच्या आधारावर असिस्टंट मॅनेजर पदावर ५ वर्षांच्या करारावर नियुक्ती होऊ शकते.)

(III) असिस्टंट मॅनेजर (एससीआय एक्झाम डिपार्टमेंट).

पात्रता – पद क्र. (I) आणि (II) साठी फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमर्समधील प्रथम वर्गातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. पद क्र. (I) साठी १ वर्षांचा अनुभव आणि पद क्र. (III) साठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(IV) असिस्टंट मॅनेजर (लीगल अँड कॉम्प्लायन्स) – पात्रता – कायदा विषयातील प्रथम वर्गातील पदवी. २ वर्षांचा अनुभव.

(V) इंजिनीअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल),

(VI) इंजिनीअर ट्रेनी (सिव्हिल) –

पात्रता – इंजिनीअर ट्रेनीसाठी प्रथम वर्गातील संबंधित इंजिनीअरिंग पदवी. २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी ३० वष्रेपर्यंत इतर पदांसाठी ३५ वष्रेपर्यंत.

वेतन – पद क्र. (I) साठी रु. २ ते ३ लाख प्रतिवर्ष. पद क्र. (II) साठी स्टायपेंड रु. २२,०००/- ते ३०,०००/- प्रतिमाह. पद क्र. (III) आणि (IV) साठी रु. ५ ते ६ लाख प्रतिवर्ष. पद क्र. (V), (VI), (VII) आणि (VIII) साठी रु. ४ ते ५ लाख प्रतिवर्ष. ऑनलाइन अर्ज www.nism.ac.in या संकेतस्थळावर दि. १५ जानेवारी २०१८ पर्यंत करावेत.

  • ईसीजीसी लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई, ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’च्या एकूण ३२ पदांची भरती.

१) जर्नलिस्ट – १२ पदे.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

२) कॉमर्स – ३ पदे. पात्रता – एम.कॉम.

३) इकॉनॉमिक्स – २ पदे. पात्रता – एम.ए. (इकॉनॉमिक्स)  पद क्र. (१) ते (३) साठी पात्रता परीक्षेतील गुणांची अट किमान ६०% गुण. (अजा/अज उमेदवारांसाठी ५५% गुण).

४) आयटी – २ पदे. पात्रता – बी.ई. (सीएस/आयटी).

५) लीगल – ५ पदे. पात्रता – एलएलबी.

६) अकाऊंट्स – ५ पदे. पात्रता – सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएफए इ.

७) अ‍ॅक्च्युअरी – २ पदे. पात्रता – इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युअरीजचे किमान तीन पेपर्स उत्तीर्ण.

८) कंपनी सेक्रेटरी – १ पद. पात्रता – असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ACS).

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते

३० वर्षे(अजा/अज – ३५ वष्रेपर्यंत, इमाव – ३३ वर्षेपर्यंत).

प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग अजा/अजच्या निवडक उमेदवारांसाठी मुंबई, दिल्ली, बंगलोर इ. केंद्रांवर कंपनी आयोजित करणार आहे, त्यासाठी अर्ज ‘डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआरडी), ईसीजीसी लिमिटेड, दलामल हाऊस, ग्राऊंड फ्लोअर, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१’ या पत्त्यावर दि. २२ जानेवारी २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

निवड पद्धती –

(१) ऑनलाइन परीक्षा –

रिझिनग अ‍ॅबिलिटी – ५० गुण ४० मिनिटे,

इंग्लिश लँग्वेज – ४० गुण ३० मिनिटे,

कॉम्प्युटर नॉलेज – २० गुण १० मिनिटे,

जनरल अवेअरनेस – ४० गुण २० मिनिटे,

क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ५० गुण ४० मिनिटे.

एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ १४० मिनिटे.

(II) डिस्क्रिप्टिव्ह पेपर – एस्से रायटिंग – २० गुण,

प्रेसे रायटिंग – २० गुण. एकूण वेळ ४० मिनिटे.

ऑनलाइन अर्ज www.ecgc.in या संकेतस्थळावर दि. १५ जानेवारी २०१८ पर्यंत करावेत.

 

  • महाराष्ट्र शासन, अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती – अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक व आदिवासी निरीक्षकपदांसाठी अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा, तालुका व गावातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती.

१) माध्यमिक शिक्षण सेवक – ४५ पदे.  इंग्रजी – १५ पदे.

पात्रता – बी.ए. ५०% गुणांसह उत्तीर्ण, बी.एड.

विज्ञान – २० पदे. पात्रता – बी.एस्सी. (पीसीएम) ५०% गुणांसह बी.एड.

गणित – १० पदे. पात्रता – बी.एस्सी. (पीसीएम) ५०% गुणांसह बी.एड.

अर्ज करण्यास पात्र गावे – जि. अमरावती, ता. धारणी, चिखलदरा; जि. यवतमाळ, ता. केळापूर, मोरगाव, घाटंजी, झरी; जि. नांदेड, ता. किनवट. मानधन रु. ८,०००/-

२) उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक – ४ पदे. भौतिकशास्त्र – २ पदे, रसायनशास्त्र – २ पदे.

पात्रता – भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील एमएस्सी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण बी.एड्.

अर्ज करण्यास पात्र गावे – जि. अमरावती, ता. धारणी, चिखलदरा. मानधन – रु. ९,०००/-.

३) आदिवासी विकास निरीक्षक – अमरावती/ यवतमाळ/ नांदेड जिल्ह्य़ांसाठी प्रत्येकी

२ पदे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण. (पदव्युत्तर पदवी किंवा बी.एड.धारकांना प्राधान्य)

वेतन – रु.९,३००/- ३४,८००/- ग्रेड-पे रु. ४,२००/-

वयोमर्यादा – दि. १ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते ४३ वष्रेपर्यंत.

निवड पद्धती – पद क्र. (१) व (२) साठी पात्रता परीक्षेतील गुणांचे ५०% व बी.एड.चे ५०% गुण एकत्रित करून गुणवत्तेनुसार पद क्र. (३)साठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील २०० गुण. परीक्षा शुल्क – रु. १५०/-. ऑनलाइन अर्ज  https://maharecruitment.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १६ जानेवारी २०१८ रोजी २४.०० वाजेपर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जाची पिट्रआऊट एसबीआय चलान सोबत अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती, पोलीस मुख्यालयाच्या समोर, टी.बी. हॉस्पिटलमागे, अमरावती – ४४४ ६०३ या पत्त्यावर दि. १६ जानेवारी २०१८ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने साध्या पोस्टाने पाठवावेत.