• इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चमध्ये वरिष्ठ कारकुनांच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली- ११०००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१८.

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात करार तत्त्वावर जनसंपर्क अधिकारी म्हणून संधी-

अर्जदार पदवीधर असावेत. पत्रकारितेतील पात्रताधारकांना प्राधान्य. संगणकाचे ज्ञान व संबंधित क्षेत्रातील १० वर्षांचा अथवा पत्रकारितेतील २० वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जाहिरात अर्ज. तपशीलवार अर्ज महाव्यवस्थापक (कर्मचारी व औद्योगिक संबंध), महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय,  मुंबई- ४००००८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०१८.

  • एक्ससव्‍‌र्हिसमन काँट्रिब्युटरी हेल्थ स्कीमअंतर्गत कोल्हापूर</strong>, सांगली, सातारा व कराड येथे महिला साहाय्यिकांसाठी संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एक्ससव्‍‌र्हिसमन काँट्रिब्युटरी हेल्थ स्कीम- महाराष्ट्रची जाहिरात पाहावी अथवा  http://www.echs.gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार भरलेले अर्ज एक्ससव्‍‌र्हिसमन काँट्रिब्युटरी हेल्थ स्कीम, कोल्हापूर मुख्यालय, कोल्हापूर या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१८.