News Flash

नोकरीची संधी

कोणत्याही शाखेतील इंजिनिअरींग पदवी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भारतीय नौदलात शॉर्ट सíव्हस कमिशन – ‘ऑफिसर (पायलट/ऑब्र्झवर/एअर ट्रफिक कंट्रोलर)’ (जानेवारी २०१९ पासून सुरू होणाऱ्या) कोर्ससाठी इंजिनिअर पदवीधरांना प्रवेश.

(i) एअर ट्रफिक कंट्रोलर (एटीसी) – ७ पदे, (ii) ऑब्र्झवर – ४ पदे, (iii) पायलट (एमआर) – ३ पदे, (iv) पायलट (पायलट एमआर वगळता) – ५ पदे.

पात्रता – कोणत्याही शाखेतील इंजिनिअरींग पदवी (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र) दहावी/बारावी. बारावीला इंग्रजी विषयात/पदवीला किमान ६०% गुण आवश्यक.

वयोमर्यादा – एटीएससाठी उमेदवाराचा जन्म

दि. २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा. इतर पदांसाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००० दरम्यानचा असावा. पायलट (एमआर वगळता) पदासाठी फक्त अविवाहीत पुरुष पात्र आहेत. इतर पदांसाठी अविवाहीत पुरुष/ महिला पात्र.  शारीरिक मापदंड – पायलट/ऑब्र्झवर पदांसाठी उंची १६२.५ सें.मी. एटीसीसाठी उंची –

पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना आयएनए इझिमाला, केरळ येथे ऑफिसर म्हणून सब-लेफ्टनंट रँकवर (पे-मॅटिक्स १० मूळ वेतन रु. ५६,१००/-  एमएसपी रु. १५,५००/-  इतर भत्ते).

नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (२२ आठवडे) साठी तनात केले जाईल.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना एसएसबी टेस्टसाठी मे २०१८ ते जुल २०१८ दरम्यान बंगलोर (पायलट/ऑब्र्झवरसाठी) आणि एटीसीसाठी बंगलोर/भोपाळ/कोईम्बतूर/विशाखापट्टणम् येथे बोलाविले जाईल. (एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.)  ऑनलाईन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. ४ मार्च २०१८पर्यंत करावेत.

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:01 am

Web Title: loksatta job opportunity 9
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा?
2 संशोधन संस्थायण : चर्मशास्त्रातील संशोधन
3 एमपीएससी मंत्र : भारतीय अर्थसंकल्प
Just Now!
X