|| सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. (जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षणासाठी) वर्ष २०१९-२० मध्ये पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य ‘पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे.

पात्रता – बारावी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे.

उंची  – पुरुष – १६५ सें.मी. व महिला – १५५ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.  उमेदवाराचे वार्षकि कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. (पुरावा द्यावा लागेल.)

इच्छुक उमेदवारांनी दि. १९ ऑगस्ट २०१९, सकाळी ११.०० वाजता खाली नमूद केलेल्या ठिकाणी अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतींसह उपस्थित राहावे.

(१) मुंबई/मुंबई उपनगर-पोलीस परेड ग्राऊंड, नायगाव (दादर), मुंबई.

(२) इतर जिल्हे – जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड आणि आनुषंगिक सर्व कार्यवाही केली जाईल. (अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, आधारकार्ड इ. कागदपत्रांच्या सत्यप्रती देणे आवश्यक.)

प्रशिक्षणाचे स्वरूप 

उमेदवारांना एकूण २ महिने (५० दिवस) प्रशिक्षण दिले जाईल. (दररोज ३ तासांचे वर्ग प्रशिक्षण व २ तासांचे मदानी प्रशिक्षण देण्यात येईल.)

प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान

  • रु. १,५००/- प्रतिमाहप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल.
  • मदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल.
  • गणवेश साहित्यासाठी (गणवेश, बूट, मौजे, बनियन इ.) रु. १,०००/- एवढे एकरकमी अनुदान देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.