News Flash

महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट-२०१४

राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण मंडळातर्फे राज्यांतर्गत उपलब्ध असणाऱ्या एमबीए, एमएमएस, व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम इ.च्या २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी

| February 10, 2014 01:08 am

राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण मंडळातर्फे राज्यांतर्गत उपलब्ध असणाऱ्या एमबीए, एमएमएस, व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम इ.च्या २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असायला हवी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५% पर्यंत शिथिलक्षम आहे.

निवड पद्धती : अर्जदारांना वर नमूद केल्याप्रमाणे एमबीए, एमएमएस वा व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन एन्ट्रंस टेस्ट-२०१४ ही प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागेल.
ही प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर १५ व १६ मार्च २०१४ रोजी घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेशपात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांनी १००० रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी ८०० रु.) राज्यातील एक्सिस बँकेच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा व रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाच्या www.dtemaharashtra.gov.in/mba2014 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 1:08 am

Web Title: maharashtra board technical common entrance test 2014
Next Stories
1 सैन्यदलात महिला विधी पदवीधरांची निवड
2 न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशन- तारापूर येथे संशोधन साहाय्यकांच्या ६ जागा
3 व्यापार-उद्योगाचा शुभारंभ
Just Now!
X