23 January 2020

News Flash

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न

संयुक्त पेपर सराव प्रश्न

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

*     प्रश्न १) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो?

१) २५ फेब्रुवारी

२) २७ एप्रिल

३) २९ जून

४) ३१ ऑगस्ट

*     प्रश्न ) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मान कोणास प्राप्त आहे?

१) इंदिरा गांधी

२) सुषमा स्वराज

३) निर्मला सीतारामन

४) वरीलपैकी नाही

*      प्रश्न ३) पुढीलपैकी कोणत्या उत्पादनास जून २०१९मध्ये भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे?

१) सांगलीची हळद

२) कोल्हापुरी चप्पल

३) सोलापुरी चादर

४) सातारी कंदी पेढे

*      प्रश्न ४)पुढीलपैकी कोणत्या राज्याने महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची मुभा देण्यासाठी फॅक्टरी कायदा १९४८मध्ये दुरुस्ती केली आहे?

१) केरळ

२) गोवा

३) कर्नाटक

४) महाराष्ट्र

*     प्रश्न ५) त्रिनेत्र हे काय आहे?

१) भारतीय वायुदलाचे टेहळणी विमान

२) इस्रोने प्रक्षेपित केलेला टेहळणी उपग्रह

३) शासकीय कार्यलयातील सी.सी.टीव्ही प्रणाली

४) भारतीय रेल्वेसाठी रडार प्रणाली

*      प्रश्न ६. हिमा दास व सरबज्योत सिंग हे खेळाडू अनुक्रमे —– व ——- या खेळांशी संबंधित आहेत.

१) अ‍ॅथलेटिक्स व नेमबाजी

२) बॉक्सिंग व तिरंदाजी

३) क्रिकेट व हॉकी

४) बॅडमिंटन व ज्युडो

*      प्रश्न ७) पुढीलपैकी कोणात्या राज्याने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जून २०१९मध्ये सुरू केली आहे?

१) पश्चिम बंगाल

२) छत्तीसगढ

३) राजस्थान

४) महाराष्ट्र

*      प्रश्न ८) सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

१) सुमित्रा महाजन

२) ओम बिर्ला

३) व्यंकय्या नायडू

४) मीरा कुमार

*      प्रश्न ९. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

१) १ मे

२) २७ जून

३) १५ ऑगस्ट

४) १० डिसेंबर

उत्तरे व स्पष्टीकरणे

*      प्र. क्र. १ – योग्य पर्याय क्र.(३) भारतीय पंचवार्षकि योजनांमध्ये महत्त्वाचे प्रतिमान तयार करणारे सांख्यिकी तज्ज्ञ पी. सी. महलनोबीस यांचा जन्म दिवस २९ जून हा दरवर्षी  राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महालनोबीस यांनी भारतीय सांख्यिकी प्रणाली स्थापन केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. तसेच सांख्यिकी शाखेचे दैनंदिन महत्त्व अधोरेखित करण्यासाठीही तो साजरा करण्यात येतो.

*      प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(१) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या. मात्र पंतप्रधान असताना त्यांनी हा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत.

*      प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२) कोल्हापुरी चप्पल. या पादत्राणांचे उत्पादन बाराव्या शतकापासून सुरू असून छत्रपती शाहू महाराजांनी २०व्या शतकामध्ये त्याला प्रोत्साहन दिले आणि हे उत्पादन एक वैशिष्टय़पूर्ण ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि बागलकोट हे जिल्हे येथील उत्पादक WF GI tag वापरू शकतील.

*      प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(२) सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये महिला कामगारांकडून कार्य करून घेण्यास फॅक्टरी कायदा १९४८ मनाई करतो. या तरतुदीमध्ये बदल करून या कालावधीमध्ये महिला कामगारांना काम करण्याची मुभा देण्यासाठी गोवा शासनाने मंजुरी दिली आहे.

*      प्र.क्र.५. – योग्य पर्याय क्र.(४) भारतीय रेल्वेसाठी धुके व तत्सम कमी दृश्यमान परिस्थितीमध्ये रुळांवरील अडथळे समजावेत यासाठी त्रिनेत्र ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

*      प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(१)

*      प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४) राज्यामध्ये पुढील पाच वर्षांत १ लाख सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योगांची (units) उभारणी करून १० लाख रोजगार निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातील ४० टक्के उद्योग हे ग्रामीण भागात विकसित करण्यात येतील. तसेच तालुका पातळीवर ५० औद्योगिक पार्क्‍सची स्थापना करण्यात येईल.

*      प्र.क्र.८ – योग्य पर्याय क्र.(२) लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळाणकर होते तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार या होत्या.

*      प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र.     (२) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी तसेच कल्पकता व नावीन्यपूर्णतेस प्रोत्साहन देण्यामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०१७ पासून दरवर्षी २७ जून रोजी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस साजरा करण्यात येतो.

First Published on July 20, 2019 12:07 am

Web Title: maharashtra secondary examination mpsc abn 97
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर सामायिक घटकांची तयारी
2 यूपीएससीची तयारी : आधुनिक जगाचा इतिहास
3 शब्दबोध : जिमखाना
Just Now!
X