एआयसीटीई मान्यताप्राप्त आणि केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संलग्न असलेल्या दिल्लीच्या लाल बहादूर शास्त्री इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव :
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना प्रत्यक्ष कामाचा सुमारे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २०२५ रु.चा ‘एलबीएसआयएम’च्या नावे असणारा व
नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलांसाठी संपर्क: अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी लाल बहादूर शास्त्री इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या http://www.lbsim.ac.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.    
निवड पद्धती
अर्जदारांची शैक्षणिक पात्रता
व अनुभवाच्या आधारे त्यांना समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लाल बहादूर शास्त्री इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिशन को-ऑर्डिनेटर लाल बहादूर शास्त्री इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटस प्लॉट नं. ११/७, सेक्टर-१३, मेट्रो स्टेशनजवळ, द्वारका, नवी दिल्ली ११००७५ या पत्त्यावर १५ मे २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.