व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर पदविका (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती आणि या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होताना विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन..

आपले करिअर  उत्तम घडावे अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची मनोमन इच्छा असते. अनेकजण कुठल्यातरी अग्रगण्य कंपनीत अधिकारी अथवा व्यवस्थापक होण्याचे स्वप्न  उराशी बाळगून असतात. ‘व्यवस्थापन अभ्यासक्रम’ हा अशा  करिअरकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे. एमबीए/ एमएमएस अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून महाराष्ट्रामध्ये एकूण ३९२ संस्था असून त्यांची एकत्रित प्रवेशक्षमता ४३,७५० आहे. यामध्ये पुणे-मुंबई पट्टय़ामध्ये २५२ संस्था असून त्यांची एकत्रित प्रवेशक्षमता ३०,९२५ (७१%) आहे. याशिवाय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त PGDM पदविका देणाऱ्या साधारण १५-२० संस्था असून त्याव्यतिरिक्त खासगी तसेच अभिमत विद्यापीठांमधून व्यवस्थापन अभ्यासक्रम चालविण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये १२ विद्यापीठे असून त्यांच्या अखत्यारीत  अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त एमबीए / एमएमएस  अभ्यासक्रमाच्या अन्य संस्था येतात.

Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?

खासगी आणि  अभिमत विद्यापीठ, अल्पसंख्याक संस्था तसेच PGDM अभ्यासक्रमाच्या संस्था वगळता एकूण प्रवेशक्षमतेच्या साधारण ८०% प्रवेश हे तंत्रशिक्षण विभागाच्या सामायिक प्रवेशप्रक्रियेमधून करण्यात येतात. २०% प्रवेश हे संस्था स्तरावर केले जातात. महाराष्ट्रामधील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा (MAH-MBA/MMS-CET 2016) अलीकडेच  घेण्यात आली असून त्याचा निकाल तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर www.dtemaharashtra.gov.in/MBA 2016 उपलब्ध आहे. साधारणत: ७३ हजार विद्यार्थ्यांनी यंदाची प्रवेश परीक्षा दिली असून त्याव्यतिरिक्त  कॅट  २०१५ (कॅट २०१५ ही चाचणी आयआयएमतर्फे घेतली जाते)/ जीमॅट (जीमॅट चाचणी GMAC, USA तर्फे घेतली जाते.)/ मॅट (मॅट परीक्षा AIMA तर्फे घेतली जाते) / झ्याट (XAT)ही परीक्षा XLRI  तर्फे घेतली जाते  / आत्मा (ATMA) ही परीक्षा AIMS तर्फे घेतली जाते.  अशा राष्ट्रीय पातळीवरील  इतर प्रवेशप्रक्रियांचे पर्सेटाइल पात्र धरण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील शासकीय कोटय़ामधून भरल्या जाणाऱ्या जागांपकी १५% जागा (१५ % ऑफ ८०%) अखिल भारतीय स्तरावर भरण्यात येतात, तसेच उर्वरित जागांपकी ५०% जागा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता राखून ठेवलेल्या असतात.

शैक्षणिक  अर्हता : विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केलेली कोणत्याही विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुणांनी (महाराष्ट्रामधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता किमान  ४५%) उत्तीर्ण असावी. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभाग घेता येईल. त्यांना ‘प्रोव्हिजनल’ प्रवेश घेऊन, साधारणत: ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत अंतिम गुणपत्रिका सादर करता येईल.

व्यवस्थापन संस्थेची निवड करताना : इच्छुक विद्यार्थी एकतर २०% संस्थास्तरीय जागांसाठी आपला अर्ज संबंधित संस्थेच्या विहित अर्जाप्रमाणे देऊ शकतात अथवा शासनाच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. दोन्हीपकी कोणत्याही प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी किमान १० संस्थांची यादी तयार करावी. सर्वप्रथम कोणत्या शहरात आपल्याला हा अभ्यासक्रम करायचा आहे हे ठरवावे, याचे कारण जेथे औद्योगिक आस्थापना अधिक प्रमाणात आहेत आणि संस्था आणि अशा आस्थापनांचा चांगला संपर्क आहे अशा शहरात एमबीए केल्यास पुढे काही इंटर्नशिप कार्यक्रम आणि इतर प्रोजेक्टसाठी उपयोग होऊ शकतो.

अंतिम पदवी जरी विद्यापीठ देणार असले तरी त्या विद्यापीठाशी संलग्न संस्थांमधे अभ्यासक्रम कसा राबवला जातो हे समजून घेणे आवश्यक आहे, दोन वर्षांच्या कालावधीमध्ये माझ्यामधील व्यवस्थापकीय गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया कशी राबवली जाते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या संस्थेमध्ये कोणते तज्ज्ञ शिक्षक आहेत, त्यामधील डॉक्टरेट झालेले किती आहेत, तसेच उद्योगक्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ नियमितपणे मार्गदर्शन करण्यास येतात का याची माहिती घ्या. संस्थेच्या प्लेसमेंटमध्ये कोणत्या कंपन्या नियमित सहभागी होतात आणि कोणत्या पट्टय़ात वार्षकि वेतन दिले जाते, माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात का, सध्या अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुभव कसा आहे, योग्य संस्थेची निवड खूप महत्त्वाची आहे, कारण पदवीपेक्षा दोन वर्षांत तुमच्या व्यवस्थापकीय गुणांचा कसा विकास केला जातो हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि शिक्षक कोणत्या संस्थेत अधिक प्रभावी आहेत ते प्रथम समजून घ्या. मार्केटिंग, फायनान्स, एचआर, ऑपरेशन्स, आयटी अशी अनेक क्षेत्रे उपलब्ध असून तुमचा सर्वसाधारण कल बघून अशी निवड करा. प्रत्येक संस्था विशिष्ट प्रकारच्या स्पेशलायझेशनकरता नावाजलेली असते. उदाहरण द्यायचे झाले तर आयआयएम अहमदाबाद मार्केटिंगसाठी आयआयएम बंगळूर फायनान्ससाठी तसेच आयआयएम कोलकाता स्टॅटिस्टिक्ससाठी नावाजलेली आहे. प्रत्येक संस्थेचा एक ऊळए कोड असतो. यातही फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट अशा दोन वेगवेगळ्या वेळांमधे अभ्यासक्रम चालतो. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन प्राधान्यक्रम भरताना संस्थेचा कोड भरावा लागतो.

२०१६-२०१७ मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आणि त्याचे वेळपत्रक तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर  www.dtemaharashtra.gov.in/mba 2016  जाहीर होणार आहे. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असून त्यानंतर अफउ मध्ये जाऊन स्वत:च्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे.  लक्षात ठेवा की, कोणत्याही कारणाने आपला लॉगइन आणि पासवर्ड कधीही कोणाला देण्याची गरज नाही. अनेकदा काही संस्था किंवा व्यक्ती हा लॉगइन आणि पासवर्ड घेऊन त्यांना हवे ते प्राधान्यक्रम टाकतात आणि मग योग्य महाविद्यालयात प्रवेशाची संधी आपण गमावू शकता. आपला प्राधान्यक्रम आपणच निवडून स्वत: भरायला हवा. राखीव जागांसाठी अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे तसेच जातपडताळणी अशी सर्व प्रमाणपत्रे आपल्याकडे संकेतस्थळावर असल्याप्रमाणे उपलब्ध असण्याची गरज आहे. ही सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग शासनातर्फे गुणवत्ता यादी खुल्या तसेच इतर प्रवर्गानुसार प्रसिद्ध करण्यात येते. त्यात काही शंका किंवा दुरुस्ती असल्यास तात्काळ संबंधित अफउ अथवा तंत्र शिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधावा. साधारणत: प्रवेशाच्या तीन फेऱ्या (राऊंड्स) होतात. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम भरायचे असून तिसरी फेरी समुपदेशनाची असून ती फक्त महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांकरता आहे. प्रथम फेरीत किमान ०१ आणि जास्तीतजास्त १०० प्राधान्यक्रम भरता येतील. यातले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांने प्रवेश निश्चित केल्यास अथवा न केल्यास त्याला पुढच्या फेरीत जाता येणार नाही. २-१०० पर्यंतचे महाविद्यालय मिळाल्यास अन् प्रवेश न घेतल्यास त्याला पुढील प्रवेश फेरीत सहभागी होता येईल. दुसऱ्या फेरीत पुन्हा किमान ०१ आणि जास्तीतजास्त १०० प्राधान्यक्रम भरता येतील. यातील पहिल्या सात पसंतीमधील महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांने प्रवेश निश्चित केल्यास अथवा न केल्यास त्याला पुढच्या फेरीत जाता येणार नाही. तिसरी फेरी उर्वरित रिक्त जागांसाठी तसेच फक्त महाराष्ट्रामधील पात्र विद्यार्थ्यांसाठी असते. यामध्ये उर्वरित पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार उपस्थित विद्यार्थ्यांना उपलब्ध रिक्त जागांवर तात्काळ प्रवेश निश्चित केले जातात. प्रक्रिया सोपी तसेच पारदर्शी असून त्यामध्ये समजून आणि अभ्यासपूर्ण सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. योग्य संस्थेची निवड ही  करिअरच्या यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांची सविस्तर प्रक्रिया अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामध्ये काही बदल असल्यास ते लक्षात घेऊनच प्रवेशप्रक्रियेत सहभागी व्हावे.

pckalkar@gmail.com