दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे कृषी, पशू-विज्ञान, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या विषयातील एमएस्सी/एमटेक या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘कम्बाइन्ड बायोटेक्नॉलॉजी एन्ट्रन्स एक्झामिनेशन’ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी कृषी, पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीबीएस यांसारख्या विषयांतील पदवी कमीतकमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध शहरांमध्ये घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. परीक्षा १९ मे २०१५ रोजी होईल.
उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित कृषी वा पशुविज्ञान विद्यापीठ वा शैक्षणिक संस्थेत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
शैक्षणिक शिष्यवृत्ती- प्रवेशपात्र विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थी नियमांनुसार शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
करिअर संधी
कृषी, पशुविज्ञान वा बायोटेक्नॉलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांना कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, शासकीय विभाग, इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगार वा शैक्षणिक संधी उपलब्ध असतात.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २६० रु.चा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या नावे असणारा आणि नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
संपर्क
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ जानेवारी- ६ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘कम्बाइंड बायोटेक्नॉलॉजी एन्ट्रन्स एक्झामिनिशेन’ २०१५-१६ ची जाहिरात पाहावी अथवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या http://www.jnu.ac.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने प्रवेश अर्ज वरील संकेतस्थळावर अथवा संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सेक्शन ऑफिसर (अ‍ॅडमिशन्स), रूम नं. २८, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली- ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची अंतिम मुदत ९ मार्च २०१५ आहे.