News Flash

एकुलत्या एक मुलीला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

मुलींच्या उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ही शिष्यवृत्ती दिली जाते.

| July 27, 2015 01:05 am

मुलींच्या उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ही शिष्यवृत्ती दिली जाते. याद्वारे कुटुंबातील एकुलती एक मुलगी असणाऱ्या विद्यार्थिनीला तिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्कमाफी दिली जाते.
अर्हता- ती विद्यार्थिनी कुटुंबातील एकुलती एक मुलगी असावी, जिने मान्यताप्राप्त विद्यापीठातील पूर्ण वेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला आहे.
वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे.
अर्जप्रक्रिया- अर्ज ऑनलाइन पद्धतीने ३१ जुलैपर्यंत करावेत.
अधिक माहिती- सविस्तर माहितीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या www.ugc.ac.in/sgc/  या वेबसाइटला भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:05 am

Web Title: masters degree scholarship for only girl child
टॅग : Scholarship
Next Stories
1 अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती
2 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती
3 उद्योजकता आत्मसात करण्यासाठी..
Just Now!
X