अभियांत्रिकीच्या मेकॅट्रॉनिक्स या नव्या विद्याशाखेची माहिती आणि त्यातील करिअर संधींचा आढावा
मेकॅट्रॉनिक्स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रिकरण होते. मेकॅट्रॉनिक्स अभियंते अत्याधुनिक यंत्रणांचे डिझाइन अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा मेळ कॉम्प्युटर प्रोग्रािमगशी घालतात. उदा. वॉिशग मशिन्स, स्वयंचलित रोबोटिक असेम्ब्ली लाइन्स, कॅमेरा, लेझर प्रिंटर्स आणि फोटोकॉपिअर्स अशा मेकॅनिकल उपकरणांचे डिझाइन करण्याच्या दृष्टीने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा मेळ साधला जातो.
मेकॅट्रॉनिक्स अभियंते सेन्सर्स आणि अॅक्युएटर्सचे डिझाइन करतात. कंट्रोल अल्गोरिदम तयार करतात आणि चॅसिस स्टॅबिलायिझग सिस्टीम, अँटी-लॉक ब्रेक्स, इंजिन कंट्रोल युनिट्स, डिस्क ड्राइव्हज्, कॅमेरा, सíव्हस व सर्जकिल रोबोट आणि कृत्रिम हृदये अशा मेकॅनिकल सिस्टीम्सच्या डिझाइनकरिता अत्याधुनिक कार्यकारी साहित्याचा वापर करतात किंवा अशा साहित्याची निर्मिती करतात.
मेकॅट्रॉनिक्सचा उपयोग करण्यात आलेले उत्कृष्ट उदाहरण द्यायचे झाले तर नासाने वापरलेल्या मार्स रोव्हरचे उदाहरण द्यावे लागेल. या उपकरणाने मंगळाच्या पृष्ठभागावरील नमुने आणि छायाचित्रे गोळा केली होती. जर तुम्हाला ऑटोमेशन आणि रोबोटिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर मेकॅट्रॉनिक्स तुम्हाला त्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
मानवी आयुष्याला मोठय़ा प्रमाणावर स्पर्श करणाऱ्या आणि व्यवसायातील नवी क्षेत्रे खुली करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल भाकीत वर्तवताना अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से अहवालामध्ये मेकॅट्रॉनिक्सचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. सृजनशील क्षेत्रामधील नवी आव्हाने पेलण्याकरिता मेकॅट्रॉनिक्ससारख्या नव्या तंत्रज्ञानामधील कौशल्य उपयुक्त ठरेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानातील कौशल्य व मानवी संसाधने यांच्या बाबतीत मागणी आणि पुरवठा यांत मोठी दरी आहे. ही दरी जोपर्यंत भरून निघत नाही, तोपर्यंत राष्ट्राला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अगणित संधींचा लाभ घेता येणार नाही. या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने म्हणजे या विषयीचा अभ्यासक्रम आणि प्रयोगशाळांचे स्वरूप, तज्ज्ञ शिक्षकांची उणीव आणि संशोधनाचे स्वरूप.
आपल्याकडे आजही बहुतेक विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांत आंतरशाखीय दृष्टिकोन जोपासलेला क्वचितच बघायला मिळतो. या अभ्यासक्रमांसाठी उपयोगात आणल्या गेलेल्या प्रयोगशाळांची सेट-अप्स आणि त्यात वापरले गेलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांशी अनुरूप नसतात. ही दरी भरून काढण्याकरता आंतरशाखीय गरजांची पूर्तता करणे आणि त्याकरिता उद्योगाचा सहभाग वाढवणे, उद्योगातील मानकांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अनेक कार्याशी परिचित करून देण्याच्या दृष्टीने प्रकल्प आणि संशोधन हाती घेणे या गोष्टींचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमाची गरज आहे. त्यामुळे उद्योगाच्या गरजांची पूर्तता होईल.
करिअर संधी
मेकॅट्रॉनिक्सचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ऑटोमोबाइल, तेल आणि वायू, खाणकाम, परिवहन, संरक्षण, रोबोटिक्स, एअरोस्पेस आणि एव्हिएशन अशा क्षेत्रांमध्येही त्यांना काम करता येते. विद्यार्थ्यांना नौदल, हवाई दल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अशा संस्थांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना डीआरडीओ, दिल्लीत मानाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
डॉ. शरद म्हैसकर, अधिष्ठाता, मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी,
मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग. एनएमआयएमएस.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!