साहसी जीवनाची आवड असेल आणि सागरी लाटांवर स्वार होण्याची इच्छा असेल तर तुम्ही
‘र्मचट नेव्ही’ या क्षेत्राचा करिअर म्हणून जरूर विचार करा. र्मचट नेव्हीतील विभागवार कामाचे स्वरूप, विविध करिअर संधी आणि प्रशिक्षण संस्था यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात..
केंद्रातील मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात बंदर उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे बंदर व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या र्मचट नेव्ही या क्षेत्राला विशेष चालना मिळणार आहे.
जगातील एकूण व्यापारापकी ९५ टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जगभरात सुमारे ८५ हजार व्यापारी जहाजे आहेत. शंभराहून अधिक प्रकारची मालवाहू जहाजे आहेत. एकविसाव्या शतकात आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मालवाहतूक होत आहे. कारण इतर कोणत्याही मालवाहतुकीच्या पर्यायांपेक्षा जलवाहतुकीचा पर्याय केव्हा स्वस्त ठरतो. र्मचट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे तर भारतीय नौदल हा संरक्षण खात्याचा भाग आहे. यामुळे र्मचट नेव्ही आणि भारतीय नौदल या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. उच्च दर्जाचा व्यवसाय म्हणून जगभरात शििपग व्यवसायाकडे पाहिले जाते. जगभरात भारतीय कंपन्यांच्या सागरी वाहतुकीला सर्वाधिक मागणी आहे. कारण आपल्याकडे दिले जाणारे पायाभूत शिक्षण हे खूप उच्च दर्जाचे आहे. याचबरोबर आपल्याकडे तांत्रिक भागही अगदी चांगल्या प्रकारे शिकवला जातो.
र्मचट नेव्हीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग येतात- हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात. पहिला विभाग असतो तो म्हणजे शिप-डेक, यामध्ये कॅप्टन, मुख्य अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, तृतीय श्रेणी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. या खालोखाल दुसरा टप्पा येतो तो म्हणजे इंजिन. यामध्ये मुख्य अभियंता, रेडिओ अधिकारी, इलेक्ट्रिकल अधिकारी
आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असतो. त्या खालोखाल सलूनचा टप्पा येतो. यामध्ये केटिरगचा विभाग येतो. यापकी कोणत्याही विभागात काम करायचे असेल तर त्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. आयएमओ, आयएमयू, केंद्र सरकारचे डीजी शििपग यांच्या नियमांनुसार प्रशिक्षण घेतल्याशिवाय येथे काम करण्याची संधी मिळू शकत नाही.
जगभर फिरण्याची संधी, गलेलठ्ठ पगार या गोष्टी तरुणांना र्मचट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी आकर्षति करीत असतात. या क्षेत्रातील करिअरला एक वेगळेच ग्लॅमर आहे. विशेषत: ज्यांना फिरण्याची आवड ते या क्षेत्रात अगदी आवडीने काम करू शकता.

विभागवार संधी डेक विभाग : या विभागात डेक अधिकारी जहाजाला दिशा दाखवण्यापासून ते जहाज चालवणे, सामान सुरक्षित जहाजात भरणे आणि उतरवणे, जहाज संभाषण यंत्रणेची व्यवस्था पाहणे आदी कामांसाठी जबाबदार असतो. यासाठी दहावी अधिक दोन किंवा अभियांत्रिकी
पदवीधर ही किमान पात्रता असते. याशिवाय जहाज प्रशिक्षणातील ‘अ’ वर्गाचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक असते. डेक अधिकाऱ्याला १२०० अमेरिकन डॉलर इतके वेतन मिळते. यानंतर ते सातत्याने वाढत जाऊन साधारणत: आठ वर्षांच्या कालावधीत तुम्ही मास्टरच्या पदावर गेल्यावर हे वेतन ४,५०० ते १४ हजार अमेरिकन डॉलर इतके होऊ शकते. याव्यतिरिक्त राहण्याचा आणि इतर अनेक भत्ते तुम्हाला मिळतात.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

इंजिन विभाग : या विभागात काम करण्यासाठी दहावी अधिक दोन, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल या विद्याशाखांमध्ये पदविका किंवा पदवी शिक्षण असणे आवश्यक आहे. या विभागातील अभियंत्याला इंजिनची संपूर्ण प्रणाली नियंत्रित करण्याची जबाबदारी असते. यात ‘क्लास फोर सीओसी’धारक फोर्थ अभियंता म्हणून कामावर रुजू होऊ शकतो. या पदासाठी सुरुवातीला १,२०० अमेरिकन डॉलर इतके वेतन मिळते. आठ वर्षांच्या कालावधीत तुम्ही मुख्य अभियंताच्या पदावर पोहोचता आणि तुमचे वेतन १०,५०० अमेरिकन डॉलरआणि इतर भत्ते
इतके होऊ शकते.

करिअर संधी
या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. ज्यांनी र्मचट नेव्हीचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना नोकरी पुरवणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे किंवा टँकरवर नोकरी मिळू शकते. मालवाहू जहाजे चालवणाऱ्या कंपन्यांना जहाज चालवणे आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. या कंपन्यांमध्ये चेर्वोन अ‍ॅण्ड मोबिल, वॉलम शिप मॅनेजमेंट हाँगकाँग, डेन्होल्म या परदेशी तर देशातील शििपग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ग्रेट ईस्टर्न शििपग, एस्सार आणि चौगुले शििपग अशा कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.
र्मचट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. र्मचट नेव्ही शिवाय आयात-निर्यात होणे कठीण आहे. यामुळे या क्षेत्राला कधीही धोका नाही. प्रशिक्षित तरुणांना जहाजावरील डेक आणि इंजिन विभागात नोकरीच्या उत्तम संधी आहेत. देशातही सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये तरुणांना मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. याविषयी बोलतना ‘सेलर टुडे’चे संस्थापक कॅप्टन सुनील नांगिया यांनी सांगितले, ‘र्मचट नेव्हीचे करिअर हे नेहमीच आव्हानात्मक आहे. मात्र, बहुतांश लोकांना या क्षेत्रातील करिअरविषयी माहिती नसते. र्मचट नेव्ही क्षेत्र आणि शििपग उद्योग हा अर्थशास्त्राचा कणा आहे. या दरम्यानच्या प्रत्येक टप्प्यातील क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. जर तुम्हाला सन्मानाचे आणि यशस्वी आयुष्य जगायचे असेल तर र्मचट नेव्हीचा पर्याय योग्य ठरू शकतो. सध्या या क्षेत्रात मुलींनाही मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.’

वेतन आणि इतर लाभ
गलेलठ्ठ वेतन देणाऱ्या काही मोठय़ा क्षेत्रांमध्ये र्मचट नेव्ही या क्षेत्राचा समावेश होतो. यामध्ये दरमहा १२ हजार रुपयांपासून आठ लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. या वेतनात कंपनीनुसार, शहरांनुसार, आयात-निर्यातीच्या गरजेनुसार तफावत असते. सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जहाजावर जेवण विनामूल्य उपलब्ध असते. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पत्नीला एखाद्या वेळी सोबत नेण्याची संधीही मिळते. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यावर आपल्याला त्यांच्या चलनानुसार वेतन मिळते. यामुळे वेतनमूल्य साहजिकच वाढते. तसेच प्रत्यक्षात नोकरीच्या ठिकाणी फारसा दैनंदिन खर्च नसल्यामुळे वेतनातील बहुतांश रक्कम सुरक्षित राहते. याशिवाय अनेक परदेशी उंची वस्तू जहाजावर डय़ुटी फ्री उपलब्ध असतात. दरवर्षी चार महिन्यांची रजा मिळते. काही कंपन्यांमध्ये तीन महिन्यांच्या प्रवासानंतर कर्मचाऱ्यांना एक महिना रजा देण्यात येते.

जहाजाचे प्रकार
र्मचट नेव्हीमध्ये मालवाहू जहाज, कंटेनर जहाज, बार्ज कॅिरग जहाज, टँकर्स, बल्क कॅरिअर्स, रेफ्रिजरेटर्स जहाज, प्रवासी जहाज असे प्रमुख प्रकार येतात. इतर जहाजांच्या तुलनेत मालवाहू जहाजांमध्ये नोकरी मिळणे सोपे आहे.
०    बार्जवाहू जहाज हे मोठे असते. याचा वापर प्रामुख्याने जहाजांच्या टोिव्हगसाठी केला जातो.
०    वाहनांची ने-आण करण्यसाठी रोल ऑन रोल ऑफ जहाजे विकसित करण्यात आली आहेत.
०    धान्य, तेल अणि इतर अवजड सामानाची
ने-आण करण्यासाठी बल्क कॅरिअर्सचा वापर केला जातो.
०    तेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थाची ने-आण करायला टँकरचा वापर केला जातो.
०    शीतपेटीत साठवून नेणाऱ्या वस्तूंसाठी रेफ्रिजरेटर जहाजाचा उपयोग होतो.
०    दोन शहरादरम्यान प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी प्रवासी जहाजांचा उपयोग
केला जातो.

आवश्यक पात्रता
०    र्मचट नेव्हीमध्ये काम करण्यासाठी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे तीन विषय अभ्यासाला असणे गरजेचे आहे. यासाठीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्क्रीिनग आणि मुख्य लेखी परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते.
०    उमेदवाराला नोकरीसाठी अर्ज करण्याआधी जहाज प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. हे प्रशिक्षण अल्प कालावधीसाठी असते. यामध्ये उमेदवाराला प्राथमिक सुरक्षा उपायांचेही प्रशिक्षण दिले जाते.
०    परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत, वैद्यकीय चाचणी, दृष्टीची चाचणी पूर्ण करावी लागते.
०    याचबरोबर काही खासगी संस्था र्मचट नेव्हीत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करीत असते. या संस्था उमेदवारांना डेक कॅडेड्स आणि मरिन अभियंता पदाच्या नोकरीसाठी तयार करतात.
०    उमेदवारांना पोहण्याचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे.     

प्रशिक्षण संस्था र्मचट नेव्हीचे प्रशिक्षण देणाऱ्या देशभरातील संस्था-
०    अकॅडमी ऑफ मेरिटाइम ट्रेिनग- १३५, ईस्ट कोस्ट रोड, कांथूर महाबलिपूरम, चेन्नई.
०    सीस्कॅन मरिन सíव्हसेस प्रा. लिमिटेड- फायर सíव्हसेस पणजी संचालनालय, पणजी, गोवा.
०    र्मकटाइल मेरिटाइम अकॅडमी- २, न्यू तर्तला मार्ग, कोलकाता.
०    लालबहादूर शास्त्री नॉटिकल विज्ञान महाविद्यालय- रे रोड, हे बंदर, मुंबई.
०    नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट-उथांडी, चेन्नई.
०    वेल्स मेरिटाइम स्टडीज महाविद्यालय, पल्लावरम, चेन्नई.
०    इंटरनॅशनल मेरिटाइम स्टडीज, गेट्रर नॉएडा, उत्तर प्रदेश.
०    टोलानी मेरिटाइम इन्स्टिटय़ूट,
एरंडवणे, पुणे.
०    टी. एस. चाणक्य इन्स्टिटय़ूट, मुंबई.
०    टी. एस.  भांद्रा, कोलकाता.
०    टी. एस. मेखाला, विशाखापट्टणम.
०    असोसिएशन ऑफ मरिन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कॉलेज – ग्लासग्लो कॉलेज ऑफ नॉटिकल सायन्स, ग्लासग्लो, ब्रिटन.
या क्षेत्रातील करिअरच्या अधिक संधी आणि अधिकृत संस्थांची नावे केंद्र सरकारच्या http://www.dgshipping.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com