संरक्षण सेवेत अधिकारपदी निवड होण्यासाठी लेखी परीक्षा, मुलाखत तसेच शारीरिक क्षमता चाचण्यांमध्ये उत्तम कामगिरी करणे आवश्यक असते. त्यासाठी या परीक्षांचा अभ्यास योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. संरक्षण सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील युवकांना पूर्वतयारी प्रशिक्षण औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत दिले जाते.  
शैक्षणिक अर्हता: उमेदवार दहावीत असावेत. त्यांनी आठवी आणि नववीच्या परीक्षेत कमीतकमी ६० टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा  पात्र असावेत.
वयोगट: अर्जदारांचा जन्म १ जानेवारी १९९९ ते ३१ डिसेंबर २००० च्या दरम्यान झालेला असावा.
निवड पद्धती: अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राज्यातील नागपूर, पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर एप्रिल २०१५ मध्ये घेण्यात येईल. लेखी परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क: अर्जासह  ४३५ रु. रोखीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुठल्याही शाखेत  भरावेत अथवा डायरेक्टर एसपीआय, औरंगाबाद यांच्या नावाने असणारा व औरंगाबाद येथे देय असलेला
४०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट अर्जासह पाठवावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी औरंगाबादच्या सैनिकपूर्व शिक्षण संस्थेच्या http://www.spiauraugabad.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत: विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक तो तपशील,
कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह  संचालक- सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, सेक्टर- एन- १२, सिडको, औरंगाबाद- ४३१००३ या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.