News Flash

Ministry of Defence Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी होणार भरती, दहावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

पात्र उमेदवार ५ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Ministry of Defence Group C Job
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २ आर्मी हेड क्वार्टर सिग्नल रेजिमेंट, मेरठ कॅन्ट ने विविध सिव्हिलियन ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार ५ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेद्वारे एकूण १० पदांची भरती केली जाईल. ज्यात कुकची ३ पदे, न्हावी १ पदे, ईबीआर (इक्विपमेंट बोर्ड रिपेअर) ची २ पदे, वॉशर मॅनची ३ पदे आणि टेलरच १ पद भरती केली जातील. कुक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १९९०० ते ६३२०० रुपये दरमहा वेतन दिले जाईल. तर, इतर पदावरील निवडक उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये दरमहा वेतन मिळेल.

(हे ही वाचा: मुंबई महापालिका सहकारी बँक भरती २०२१: सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी करा अर्ज)

या पदांवर भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावी. यासोबतच संबंधित क्षेत्रात प्राविण्य असावे. वयोमर्यादेबद्दल बोलताना, गट C च्या विविध पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान असावे. मात्र, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

मेरठ येथे आयोजित लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे संरक्षण मंत्रालय गट सी भर्ती २०२१ साठी उमेदवारांची निवड केली जाईल. या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य जागरूकता प्रश्न विचारले जातील. या पदांवर भरतीसाठी सर्व इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात “द कमांडिंग ऑफिसर, २ आर्मी हेडक्वार्टर्स सिग्नल रेजिमेंट, रूरकी रोड, मेरठ कॅन्ट – २५०००१ ” यांवर ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवू शकतात.

(हे ही वाचा: Nagpur Job Alert: बेरार फायनान्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या तपशील)

याशिवाय, संरक्षण मंत्रालयाने एएससी सेंटर नॉर्थ अंतर्गत सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर आणि एमटीएस आणि एएससी सेंटर नॉर्थ अंतर्गत कामगारांच्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार जाहिराती जारी झाल्यापासून २१ दिवसांच्या आत म्हणजेच १७ सप्टेंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 2:27 pm

Web Title: ministry of defence recruitment 2021 check for various civilian group c posts before 5 october apply online sarkari nokriya ttg 97
Next Stories
1 Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत 1128 पदांकरिता मोठी भरती, जाणून घ्या तपशील
2 नोकरीची संधी: Amazon India चा करियर डे! ८००० हून अधिक पदांसाठी होणार भरती
3 PMC Recruitment 2021: विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया
Just Now!
X