दहावी उत्तर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. दोन आर्मी हेड क्वार्टर सिग्नल रेजिमेंट, मेरठ कॅन्ट ने विविध सिव्हिलियन ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार पाच ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेद्वारे एकूण दहा पदांची भरती केली जाईल. ज्यात कुकची तीन पदे, न्हावी एक पदे, ईबीआर (इक्विपमेंट बोर्ड रिपेअर) ची दोन पदे, वॉशर मॅनची तीन पदे आणि टेलरच एक पद भरती केली जातील. कुक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १९९०० ते ६३२०० रुपये दरमहा वेतन दिले जाईल. तर, इतर पदावरील निवडक उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये दरमहा वेतन मिळेल.

पात्रता काय?

या पदांवर भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावी. यासोबतच संबंधित क्षेत्रात प्राविण्य असावे. वयोमर्यादेबद्दल बोलताना, गट C च्या विविध पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान असावे. मात्र, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

(हे ही वाचा: नोकरीची संधी: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती)

काय असेल भरती प्रक्रिया?

मेरठ येथे आयोजित लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे संरक्षण मंत्रालय गट सी भर्ती २०२१ साठी उमेदवारांची निवड केली जाईल. या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य जागरूकता प्रश्न विचारले जातील.लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे या पदांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य जागरूकता प्रश्न विचारले जातील. प्रत्येक उत्तरासाठी ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक चाचणीची तारीख आणि वेळ उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवली जाईल.

(हे ही वाचा:MHADA Recruitment 2021 : लिपिक,अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती)

या पदांवर भरतीसाठी सर्व इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात “द कमांडिंग ऑफिसर, दोन आर्मी हेडक्वार्टर्स सिग्नल रेजिमेंट, रूरकी रोड, मेरठ कॅन्ट – २५०००१ ” यावर ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवू शकतात.