फारुक नाईकवाडे

सीसॅट पेपरमधील या घटकामध्ये एकूण ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात. म्हणजे उताऱ्यावरील प्रश्नांनंतर गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता या घटकाचा आहे. या तीन उपघटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. या वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण यातील जास्तीतजास्त आणि शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या-प्रयुक्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणावरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर या भागामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

अंकगणित

* संख्यामालिका

यामध्ये एखादी संख्या आधाराशी घेऊन तिच्यावर ठरावीक गणिती सूत्रे किंवा प्रक्रिया वापरून पुढील संख्या काढली जाते आणि त्याच प्रक्रियेने त्यापुढील संख्या. अशा प्रकारे तयार केलेल्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची संख्या शोधायची असते. किंवा दिलेल्या संख्या या ठरावीक गणिती प्रक्रियेचे मूल्य असलेल्या असतत. उदा. क्रमाने मूळ संख्यांचे वर्ग अथवा घन अधिक / उणे ठराविक संख्या.

* काळ – काम / अंतर – वेग

मजुरांच्या कामाचे वेग आणि होणारे काम किंवा गाडी / ट्रेनच्या वेगावरून कापलेले अंतर यावर आधारित प्रश्न असतात. यामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या वेगाची कॉम्बिनेशन्स वापरून काठीण्य पातळी वाढविण्यात येते.

* गुणोत्तर व प्रमाण, टक्केवारी व भागीदारी (नफा – तोटा)

मिश्रणांमधील घटकांचे गुणोत्तर किंवा टक्केवारी देऊन त्यावर ठरावीक प्रक्रिया केल्यास तयार होणारे नवीन प्रमाण शोधणे, वेगवेगळ्या वेळी भागीदारी स्वीकारणारे भागीदार व त्यांच्या भांडवलांचे एकमेकांशी असलेले प्रमाण देऊन अंतिम नफा-तोटा मोजणे अशा प्रकारचे प्रश्न.

* त्रिकोणमिती, क्षेत्रमिती

त्रिकोणमिती आणि क्षेत्रमितीच्या सूत्रांच्या आधारे कमी-जास्त होणारे क्षेत्रफळ किंवा त्याच्या देखभाल/ दुरुस्ती/ रंगरंगोटीचा खर्च अशा प्रकारचे उपयोजित प्रश्न. तसेच त्रिकोणमितीच्या आधारे दिशाज्ञानाचे प्रश्न.

* आकृतीमधील गणिती प्रक्रिया

एकाच आकृतीमध्ये समाविष्ट संख्यांमधील संबंध समजून घेऊन गहाळ संख्या शोधणे; एका आकृतीमधील संख्यांचा संबंध समजून घेऊन दुसऱ्या आकृतीमधील संख्या शोधणे.

तर्कक्षमता

* विधानांवर आधारित निष्कर्षपद्धती (Syllogism)

सर्वसाधारणपणे अवास्तव वाटणारी काही विधाने देऊन त्यांच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांची योग्यायोग्यता तपासायची असते.

* सहसंबंध

दिलेल्या पदांमधील / आकृत्यांमधील सहसंबंध ओळखून पुढील पद शोधणे

* नातेसंबंध

दिलेल्या वर्णनावरून गटातील व्यक्तींचे नातेसंबंध प्रस्थापित करून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही मागील काही वर्षांपासून विचारण्यात आले आहेत.

* बैठक व्यवस्था

एका सरळ रेषेत किंवा वर्तुळाकार बसलेल्या व्यक्तींचा क्रम शोधणे

* दिशा, घडय़ाळ व कॅलेंडर

बुद्धिमत्ता चाचणी

* व्यक्तींच्या माहितीचे संयोजन

गटातील व्यक्तींचे छंद / व्यवसाय/ शिक्षण/ वय/ खेळ/ रहिवासाची ठिकाणे यांची कॉम्बिनेशन्स देऊन ठरावीक व्यक्तीशी संबंधित माहिती विचारण्यात येते.

* सांकेतिक भाषा / संकेत, अंकाक्षर सांकेतिक भाषा

यावरील प्रश्नांचे दोन ठळक प्रकार पडतात. शब्द किंवा अक्षरांना संकेत देऊन तयार केलेली वाक्ये किंवा पदे देण्यात येतात व त्या नियमांच्या आधारे एखाद्या शब्द / अक्षराचा संकेत शोधणे हा एक प्रकार. तर गटातील अक्षरांना संकेत देऊन त्याखाली दिलेल्या नियमांच्या आधारे तयार होणाऱ्या सांकेतिक पदांवर प्रश्न विचारण्यात येतात. हा प्रकार दुय्यम सेवेमध्ये जास्त विचारण्यात येतो.

* ठोकळे

*  ठरावीक शब्द किंवा संख्या यांच्या क्रमामध्ये होणाऱ्या बदलांचे नियम समजून घेऊन त्या आधारे दुसऱ्या गटातील शब्द किंवा संख्यांच्या संयोजनावर आधारित प्रश्न.

* आकृतिमालिका, आकृत्यांवर आधारित प्रश्न

आकृतीमध्ये समाविष्ट तुकडे किंवा तुकडय़ांनी तयार होणारी आकृती; कागदाला घडी घालून छिद्र केल्यास तयार होणारी अंतिम आकृती, पारदर्शक कागदाच्या घडीनंतर दिसणारी आकृती, एका आकृतीवर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या आकृतीबाबतचे नियम समजून घेऊन अशा प्रक्रियांच्या संयोजनावरील प्रश्न, ठरावीक नियमांनी बनलेल्या आकृत्यांच्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची आकृती शोधणे.

* वर्णाक्षरमालिका

* सांकेतिक प्रक्रिया

आकृती किंवा संख्या/अक्षर यांचा समूह यांवर वेगवेगळ्या सांकेतिक चिन्ह / खुणा आल्यावर होणारे बदल/प्रक्रिया समजून घेऊन उत्तर शोधणे.

डेटा सफिशिएन्सी

* माहितीचे अर्थातरण

सांकेतिक माहितीच्या आधारावर माहितीचे अर्थातरण

*  माहितीचा पुरेसा साठा 

दिलेल्या माहितीमधील कोणती माहिती एखादे विधान सिद्ध करण्यास आवश्यक किंवा पुरेशी आहे हे शोधणे; दिलेल्या संकेतांच्या आधारे माहितीवर प्रक्रिया करून उत्तर शोधणे अशा प्रकारचे प्रश्न.

राज्य लोकसेवा आयोगाकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे हे सर्वसाधारणपणे ढोबळ स्वरूप आहे. यांच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.