04 July 2020

News Flash

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाताना..

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाताना कुठल्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असतात, यासंबंधीची सविस्तर माहिती-

| March 3, 2014 07:08 am

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाताना कुठल्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असतात, यासंबंधीची सविस्तर माहिती-
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाताना नियोजन अत्यावश्यक असते.   परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांमध्ये आपल्याकडच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करतात. यापकी बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जाणारे असतात.
 भारतीय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा अमेरिकेकडे असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच इंग्लंड आणि युरोपमधल्या इतर देशांमध्येही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. केवळ अभियांत्रिकी विद्याशाखेतच नाहीत तर इतर शाखांमधील विद्यार्थ्यांनाही विविध अभ्यासक्रमांसाठी परदेशात जाता येते आणि पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी. करता येते. परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या गोष्टी आणि टाळाव्या लागणाऱ्या काही बाबींची माहिती करून घेऊ या.
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यापूर्वी..
परदेशातील उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या देशात जायचे आहे, हे व्यवस्थित ठरवता यायला हवे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही विद्यार्थ्यांना जसे आपण पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अर्ज करावा की पीएच.डी.ला हे ठरवता येत नाही, तसेच पुढील शिक्षण युरोपमध्ये घ्यावे की अमेरिकेत, याचा निर्णयही त्यांना घेता येत नाही. अनेकदा अमेरिकेचा बोलबाला आहे, म्हणून तिथल्या विद्यापीठांना अर्ज केला जातो किंवा मित्र किंवा नातेवाईक अमेरिकेत आहेत, म्हणून अमेरिकन विद्यापीठांत अर्ज केले जातात. हे निकष पूर्णपणे चुकीचे आहेत. उच्चशिक्षणासाठी आपल्या संशोधनाचा किंवा अभ्यासक्रमाचा विषय कोणत्या ठिकाणी उत्तम शिकवला जातो हे नीट जाणून घेत मग त्या विद्यापीठाचा संबंधित विषयाच्या संशोधनात जागतिक क्रमवारीत कितवा क्रमांक आहे, हे पाहून विद्यापीठाची किंवा देशाची निवड करावी. उदाहरणार्थ, पदार्थविज्ञान किंवा मूलभूत विज्ञानाच्या कोणत्याही विषयातील संशोधनासाठी जर्मनी किंवा इतरही अनेक युरोपियन देशांचा पर्याय उत्तम मानला जातो. संगणक अभियांत्रिकीसाठी अमेरिकेतील विद्यापीठांना विद्यार्थ्यांची प्रथम पसंती असते. तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी इंग्लंड हा उत्तम पर्याय मानला जातो.
एकदा का विशिष्ट देशाची निवड ठरली की मग प्रश्न येतो तो म्हणजे कोणत्या परीक्षा द्यायच्या? प्रत्येक देशानुसार व अभ्यासक्रमानुसार हे उत्तर वेगळे असते. भारत इंग्रजी राष्ट्रभाषा नसलेला देश आहे, म्हणून इंग्रजीची टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन परीक्षांपकी एक परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागते. त्या त्या देशानुसार द्याव्या लागणाऱ्या परीक्षांची माहिती पुढे सविस्तरपणे दिलेली आहे.
अमेरिका – अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी पहिली पसंती अमेरिकेला असते. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील जागतिक दर्जाची विद्यापीठे व त्यांचे संशोधन. विद्यार्थ्यांला जर अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला जीआरई (ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम)  व  टोफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज अ फॉरेन लँग्वेज) या दोन परीक्षा देणे अनिवार्य आहे. या दोन्ही परीक्षा अमेरिकेतील इटीएस (एज्युकेशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिस) या संस्थेमार्फत घेतल्या जातात. यांपकी ‘जीआरई’ ही परीक्षा विद्यार्थ्यांला संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) द्यायची आहे की पेपरवर आधारित (पेपर बेस्ड) द्यायची आहे, हे ठरवावे लागते. ‘जीआरई’ परीक्षा पूर्वी १६०० गुणांची असायची, आता मात्र ती ३४० गुणांची करण्यात आली आहे. यामध्ये तीन पेपर असतात. अ‍ॅनालिटिकल रायटिंग, क्वान्टिटेटिव्ह रिझनिंग अ‍ॅण्ड व्हर्बल रिझनिंग. ‘टोफेल’ ही फक्त इंग्रजीची परीक्षा आहे. अमेरिकेतील बरीचशी विद्यापीठे ‘आयईएलटीएस’ परीक्षा स्वीकारत नाहीत. त्यामुळे ‘जीआरई’बरोबर ‘टोफेल’ ही परीक्षाही द्यावी लागते. ‘टोफेल’मध्ये चार विभाग असतात- वाचन, लेखन, ऐकणे आणि बोलणे (रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग). ही परीक्षा जरी १२० गुणांची असली तरी यामध्ये फक्त उत्तीर्ण होऊन चालत नाही. जगभरातल्या बऱ्याचशा विद्यापीठांना ‘टोफेल’मध्ये किमान ८० गुण हवे असतात. ‘जीआरई’च्या गुणांची वैधता पाच वर्षांची असते, तर ‘टोफेल’ची दोन वर्षांची. ‘जीआरई’-‘टोफेल’चे गुण थेट विद्यापीठाला न कळवता ‘ईटीएस’मार्फत (एज्युकेशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिस) कळवावे लागतात. संगणक, जैव-अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकीच्या किंवा अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी बहुतांश विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम अमेरिका असतो. याशिवाय एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, मानसशास्त्र आणि मूलभूत विज्ञानातील संशोधन इत्यादी विषयांतील अभ्यासक्रमांसाठीसुद्धा विद्यार्थी अमेरिकेची निवड करतात.  
 जर्मनी – अमेरिकेखालोखाल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती जर्मनीला असते. अमेरिकेपेक्षा जर्मनीतील शैक्षणिक व्यवस्था थोडीफार वेगळी आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्रात इथे जास्त परीक्षा नसतात. वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांला सगळ्या परीक्षा एकदम द्याव्या लागतात. जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला शैक्षणिक बाबींमध्ये जरी जर्मन भाषेची गरज नसली तरी थोडीफार तरी जर्मन भाषा येणे
अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांला जर्मनीत उच्च  शिक्षण घेण्यासाठी फक्त इंग्रजीची परीक्षा (इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट) द्यावी लागते. जर्मनीतील बहुतांश विद्यापीठे आयईएलटीएस (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम)  स्वीकारतात. फक्त ‘आयईएलटीएस’च्या उत्तम गुणांवर व उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमीवर जर्मनीत सहजरीत्या प्रवेश मिळू शकतो. मॅक्स प्लँक संशोधन संस्थेसारख्या
नामांकित संशोधन संस्था इथे असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांचा ओढा मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकीतील विविध शाखा यांसारख्या अभ्यासक्रमांकडे असतो.
इंग्लंड – व्यवस्थापनशास्त्र, भाषा आणि कला शाखेतील अनेक विषयांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्यातील संशोधनासाठी अनेक विद्यार्थी इंग्लंडला प्राधान्य देतात. जागतिक मानांकनात असलेली इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, केंब्रिजसारखी अनेक विद्यापीठे, विविध शाखांमध्ये सुरू असलेले उत्कृष्ट दर्जाचे संशोधन व एकूण जागतिक संशोधनात सर्वात जास्त असलेला वाटा या सर्व जमेच्या बाजू असल्याने इंग्लंडकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा नसेल तरच नवल! इंग्लंडमधील अर्जप्रक्रिया बव्हंशी जर्मनीशी साम्य दाखवणारी आहे- फॉल किंवा िस्प्रगमधील प्रवेश, त्यावर आधरित अर्जप्रक्रिया व अंतिम मुदत. कोणत्याही विद्यापीठातील प्रवेशासाठी ‘आयईएलटीएस’ किंवा ‘टोफेल’मध्ये किमान गुण. इंग्लंडमध्ये या दोन्ही परीक्षा वैध आहेत. येथील प्रवेशासाठी ‘जीआरई’ची गरज नाही. जर व्यवस्थापन शाखेतल्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर ‘जीमॅट’मध्ये उत्तम गुण मिळवावे लागतात.
अर्जप्रक्रिया व त्यातील काही समान गोष्टी  – वरीलपकी कोणत्याही देशात दोन वेगवेगळी शैक्षणिक सत्रे असतात- फॉल किंवा िस्प्रग. साधारणत: ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्राला ‘फॉल’ म्हणतात तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास सुरू होणाऱ्या सत्राला ‘िस्प्रग’ असे म्हणतात. विद्यार्थ्यांला ‘फॉल’ किंवा ‘िस्प्रग’ यांपकी एका सत्राला अर्ज करावा लागतो. अर्ज करताना अर्जाचे शुल्क मात्र प्रत्येक देशातील विद्यापीठावर अवलंबून असते. वरील तिन्ही देशांपकी कुठेही अर्ज करताना अर्जासहित विद्यार्थ्यांने एस.ओ.पी.  (स्टेटमेन्ट ऑफ पर्पज), त्याचा सीव्ही, दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्टस्च्या अधिकृत प्रती इत्यादी आवश्यक गोष्टी कुरिअरने त्या विद्यापीठाकडे पाठवाव्यात. यांपकी काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या गरजेनुसार वेगवेगळ्याही असू शकतात. त्या त्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर अर्ज कसा करावा याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली असतेच. ती तपासून मगच अर्ज करावा. परदेशात प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याचे आरोग्य विमाकवच घ्यावे लागते. प्रत्येक देशाच्या निकषांनुसार आरोग्य विम्याची रक्कम मात्र वेगवेगळी असेल. कोणत्याही देशात विद्यार्थ्यांला उच्च शिक्षण घ्यावयाचे असो त्याची इंग्रजीवर प्रभुत्व आणि शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच जीआरई, ‘टोफेल, जीमॅट किंवा आयईएलटीएस या परीक्षांमध्ये किमान गुण परदेशी विद्यापीठात फक्त प्रवेश मिळवून देऊ शकतात. मात्र जर चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांला संबंधित परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे जर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असेल किंवा संशोधनाच्या बाबतीत त्याचे संशोधन प्रबंध प्रकाशित झाले असतील तर प्रवेशाच्या संधी दुणावतात. अर्जाच्या प्रक्रियेपासून ते प्रवेश मिळेपर्यंत इतर दोन देशांच्या तुलनेत अमेरिकन अर्जप्रक्रिया जास्त खíचक आहे.
पीएच.डी. की एमएस?  – भारतातून परदेशी उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला हा मोठा प्रश्न असतो. पीएच.डी.साठी विद्यापीठाकडून मासिक आíथक भत्ता सहज उपलब्ध होतो. पण पीएच.डी.ला प्रवेश मिळवणे खूप कठीण आणि स्पर्धात्मक असते. पीएच.डी.ला अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला आपण पीएच.डी.साठी अर्ज का करतोय, हे नीट माहीत असायला हवे.
आíथक मदतीबद्दल..  – परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्याला शिष्यवृत्ती किंवा एखादी पाठय़वृत्ती तरी मिळावी अशी इच्छा असते. कारण त्यात टय़ुशन फी भरता येते व त्याबरोबरच तिथल्या वास्तव्याचा व खर्चाचा प्रश्न निकाली निघतो. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र विद्यार्थ्यांला ‘टय़ुशन फी वेव्हर’- म्हणजेच टय़ुशन फीमधून सवलत मिळू शकते. मग आíथक प्रश्न कसा सोडवायचा? अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठाला तेथील औद्योगिक क्षेत्राचे मोठे पाठबळ मिळत असते. त्या पाठबळावर विद्यापीठ जमेल तेवढय़ा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्याकडील ‘कमवा आणि शिका’ योजनेसारखे त्या विद्यापीठाच्या आवारात अर्धवेळ काम करण्याची मुभा देते. ही कामे विद्यापीठाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील पुस्तकांच्या कामापासून ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवण्यासारखी ही कामे असतात. अमेरिकतल्या व्हिसा नियमानुसार, प्रत्येक विद्यार्थ्यांला आठवडय़ात एकूण २० तास काम करण्याची परवानगी मिळते. हाच नियम जर्मनी व इंग्लंडमध्येही लागू आहे. सुट्टीमध्ये तर विद्यार्थी या तिन्ही देशांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असेल त्यांना रिसर्च असिस्टंट (RA) तर काही विद्यार्थ्यांना टीचिंग असिस्टंट (TA)  म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांना उत्तम वेतनही दिले जाते. कोणतेही अर्धवेळ काम असो, विद्यार्थ्यांला त्या शहराच्या खर्चानुसार किमान मासिक वेतन मिळावे एवढी काळजी विद्यापीठाने घेतलेली असते. जर्मनी व इंग्लंडमध्ये साधारणपणे एका तासाला सहा ते सात युरो एवढय़ा दराने विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाते. ‘टय़ुशन फी वेव्हर’साठी विद्यार्थ्यांने विद्यापीठाचे निकष वेबसाइटवर तपासावेत. तसेच विद्यापीठाकडून दिले जाणारे अर्धवेळ काम हे गृहीत धरू नये. कारण हे काम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिले जाते. तसेच विद्यापीठाकडून मिळणारे अर्धवेळ काम, असिस्टंटशिप किंवा शिष्यवृत्ती या सर्व गोष्टी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असतात.  
महत्त्वाच्या वेबसाइट्स – वरील तिन्ही देशांमधील प्रवेशाची अर्जप्रक्रिया किंवा त्यानंतरच्या इतर सोपस्कारांसाठी खालील वेबसाइट्स नक्की उपयोगी पडतील.
https://www.ets.org
https://www.ets.org/gre
http://www.ielts.org
http://www.happyschools.com/
http://www.gradschools.com
http://www.uniguru.co.in/
http://www.edwiseinternational.com/
https://www.educationusa.info/
http://www.topuniversities.com/                           
itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2014 7:08 am

Web Title: moving abroad for higher education
टॅग Study
Next Stories
1 ‘स्ट्रगल पीरिअड’चा सामना
2 अभियांत्रिकीचा सुमार दर्जा.. आणि वाढू लागलेल्या रिक्त जागा!
3 वैद्यकीय प्रवेशपरीक्षेची गरजच काय?
Just Now!
X