05 August 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्वपरीक्षा – भूगोल प्रश्न विश्लेषण

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील भूगोल घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.

रोहिणी शहा

राज्यसेवा पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. मागील लेखांमध्ये पूर्वपरीक्षेच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखापासून भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील भूगोल घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.

मागील तीन वर्षांतील प्रातिनिधिक प्रश्न पाहणे यासाठी उपयुक्त ठरेल. (योग्य उत्तराचे पर्याय ठळक केले आहेत.)

* प्रश्न १. जोडय़ा जुळवून योग्य पर्याय निवडा.

अ. गोंडवाना श्रेणीचे खडक

ब. धारवाड श्रेणीचे खडक

क. आर्कियन श्रेणीचे खडक

ड. विंध्य श्रेणीचे खडक

I. यवतमाळ, गडचिरोली

II. सावंतवाडी, वेंगुर्ला

III. भंडारा, गोंदीया

IV. चंद्रपूर

पर्यायी उत्तरे

१) अ – ककक, ब – कक, क – कश्, ड – क

२) अ – कश्, ब – क, क – कक, ड – ककक

३) अ – क, ब – ककक, क – कक, ड – कश्

४) अ – कक, ब – क, क – ककक, ड – कश्

* प्रश्न २. खालील वैशिष्टय़े कोणत्या प्रदेशाची आहेत?

अ. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे.

ब. नारळाचे उत्पादन घेतले जाते.

क. मासेमारीसाठी अनुकूल असतो.

ड. पर्यटकांसाठी आकर्षक असतो.

पर्यायी उत्तरे

१) उत्तर भारतीय मदानी प्रदेश

२) प्रायद्वीपीय पठारी प्रदेश

३) किनारवर्ती प्रदेश

४) हिमालयीन प्रदेश

*  प्रश्न ३. खालीलपैकी कोणाते वैशिष्टय़ सीबीडीला (मध्यवर्ती व्यापार जिल्हा) लागू होत नाहीत?

अ. मोठय़ा प्रमाणात कार्यालये व दुकाने

ब. सुलभ वाहतूक

क. आडव्यापेक्षा उभी वाढ

ड. निवासस्थाने असलेला विभाग

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ आणि ड

२) फक्त क आणि ड

३) फक्त ड

४) फक्त अ, ब आणि क

* प्रश्न ४. पुढील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा.

अ. ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.

ब. उबदार उष्णकटीबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.

क. उष्ण आणि थंड समुद्री प्रवाहांच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.

ड. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा खूप महत्त्वाची आहे.

पर्यायी उत्तरे

१) विधाने अ आणि ब सत्य आहेत.

२) विधाने अ आणि क सत्य आहेत.

३) विधाने ब, क आणि ड सत्य आहेत.

४) विधाने अ, ब आणि क सत्य आहेत.

* प्रश्न ५. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्यायाची निवड करा.

* विधान अ – पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनला आहे.

* विधान ब – पृथ्वीचे कवच हे सिलिका, अ‍ॅल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअम यांच्यापासून बनले आहे.

पर्यायी उत्तरे

१) विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

२) विधान अ बरोबर असून ब चूक आहे.

३) विधान अ चूक असून ब बरोबर आहे.

४) विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

या प्रातिनिधिक प्रश्नांवरून तयारी करताना विचारात घ्यायचे पुढील मुद्दे लक्षात येतात.

* सरळसोट एका शब्दाचा / वाक्याचा पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण नगण्य आहे.

* बहुविधानी प्रश्नांमध्येही योग्य-अयोग्य पर्याय शोधणे अशा ठरावीक स्वरूपाबरोबरच कथन – कारण शोधणे, निष्कर्ष शोधणे असेही प्रश्न विचारलेले दिसून येतात. यामध्ये जोडय़ा लावणे प्रकारच्या प्रश्नांवर आयोग बहुतांश वेळ भर देताना आढळतो.

* भूगोलाच्या शाखा, सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक या बाबींवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. नकाशावर किंवा आकृत्यांवर आधारित किमान एका प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या भूगोलावरही किमान एक प्रश्न विचारलेला दिसतो.

* उर्वरित अभ्यासक्रमावरील घटकांवरील प्रश्नांची संख्या दरवर्षी बदलताना दिसत असली तरी मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून एखाद्या वर्षी कोणता घटक जास्त किंवा कमी महत्त्वाचा असेल याचा अंदाज घेणे कठीण नाही.

*  तरीही भूरूपे, जागतिक हवामान, महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाची शहरे, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे भाग नेहमीच महत्त्वाच्या यादीत असले पाहिजेत.

* बहुविधानी प्रश्न सोडविण्यास नकाशा समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून मदत होते. तसेच वारंवार आकृत्या / चित्र पाहत उजळणी केल्यास भूरूपे या घटकावरील कोणत्याही प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात.

*  बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप पाहता मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ते आत्मविश्वासाने सोडविता येतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा आधी मूलभूत संकल्पना समजून घेणे व त्यानंतर नकाशावर आधारित अभ्यास व शेवटी तथ्यात्मक अभ्यास अशा क्रमाने करणे फायदेशीर ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:51 am

Web Title: mpsc exam information mpsc exams guidance mpsc career opportunities zws 70
Next Stories
1 करिअर क्षितिज : जीवतंत्रज्ञान म्हणजे काय?
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : वृत्ती आणि वर्तनातील परस्परसंबंध
Just Now!
X