प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर २० तारखेला म्हणजे उद्या होत आहे. या पेपरमधील चालू घडामोडी या घटकाचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

   प्रश्न १. पी. एस. वॉरिअर यांची १५० वी जयंती सन २०१९ मध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यांच्याबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१)      भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना वैद्यरत्न खिताब दिला.

२)      सन १९०२ मध्ये त्यांनी आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनासाठी कोट्टाकल आर्य वैद्यशाळा स्थापन केली.

३)      त्यांनी १९१७ मध्ये कोट्टल येथे आयुर्वेदिक पाठशाळा सुरू केली.

४)      भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.

 

  प्रश्न २. भारतीय पॅरालिम्पिक समितीबाबत पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

१)      भारतीय क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्यामुळे सप्टेंबर २०१९ मध्ये समितीची मान्यता काढून घेण्यात आली आहे.

२)      दिव्यांग खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धा- पॅरालिम्पिक स्पर्धासाठी खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी समितीची आहे.

३)      नियमावलीचा भंग केल्यामुळे समितीची मान्यता काढून घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

४)      समितीची स्थापना सन १९९२ मध्ये करण्यात आली.

प्रश्न ३. राज्यातील ३४ जिल्ह्य़ांमधील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढीलपकी कोणाबरोबर करार करण्यात आला आहे?

१) जागतिक बँक

२) एशियन विकास बँक

३) जपान विकास बँक

४) क्रेडिट इन्टिटय़ूट फॉर रिकन्स्ट्रक्शन

  प्रश्न ४. सन २०१९ च्या जागतिक पर्यटन दिनाची मुख्य संकल्पना कोणती आहे?

१)      पर्यटन आणि रोजगार- सर्वासाठी चांगले भविष्य

२)      पर्यटन आणि कौशल्यविकास

३)      पर्यटनातून रोजगारनिर्मिती- भविष्यातील संधी

४)      वरीलपकी नाही

 

  प्रश्न ५. पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस कधी साजरा करण्यात आला?

१) २१ जून २०१८

२) ३० जानेवारी २०१९

३) १५ ऑगस्ट २०१९

४) १७ सप्टेंबर २०१९

 

प्रश्न ६. झुंड हत्यांविरोधात

कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

१) राजस्थान

२) मणिपूर

३) पश्चिम बंगाल

४) उत्तर प्रदेश

 प्रश्न ७. प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक/ लेखिका यांची कोणती जोडी बरोबर आहे?

१) डायरी ऑफ मनू गांधी – राहुल अग्रवाल, भारती प्रधान

२)      टब्र्युलन्स अँड ट्रायम्फ – द मोदी इयर्स – हॉलीनलाल गुटे

३)      अन स्टॉपेबल : माय लाइफ सो फार – मारिया शारापोवा

४)      कन्फेशन ऑफ अ डाइंग माइंड – प्रल्हाद सिंग पटेल

 

    प्रश्न ८. ऑस्कर पुरस्कारांसाठी नामनिर्देशित झालेला भारतीय माहितीपट कोणता आहे?  

१) मोती बाग

२) गली बॉय

३) लेडी टायगर

४) रोअर ऑफ अ लायन

 

उत्तर व स्पष्टीकरणे

प्र.क्र. १ – योग्य पर्याय क्र. (१) भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलने सन १९३३ मध्ये त्यांना वैद्यरत्न खिताब दिला.

प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र. (३) यापूर्वी भारतीय क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्यामुळे सन २०१५ मध्ये समितीची मान्यता काढून घेण्यात आली होती. तर सन २०१६ मध्ये पुन्हा मान्यता देण्यात आली होती.

प्र.क्र. ३ – योग्य पर्याय क्र. (२) प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्य़ांमधील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी एशियन विकास बँकेकडून कर्ज उभारण्यात येत आहे. किमान १००० लोकसंख्या (दुर्गम व आदिवासी भागात ५००) असलेली सर्व खेडी बारमाही रस्त्यांनी जोडणे हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तथापि सध्या किमान ५०० लोकसंख्या (दुर्गम व आदिवासी भागात २५०) असलेली सर्व खेडी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रातील किमान १०० ते २५० लोकसंख्येची गावेही बारमाही रस्त्यांनी जोडण्यात येत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण मार्ग विकास संघटना ही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी करते.

प्र.क्र. ४ – योग्य पर्याय क्र. (१) संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेकडून जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात येते. सन २०१९ च्या जागतिक पर्यटन दिनाचे यजमानपद भारताकडे आहे.

प्र.क्र. ५ – योग्य पर्याय क्र. (४) जागतिक आरोग्य संघटनेकडून १७ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस १७ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आला.

प्र.क्र. ६ – योग्य पर्याय क्र. (२) मणिपूर हे जमाव हत्यांविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मणिपूर विधानसभेने झुंड हत्यांविरोधी कायदा विधेयक पारित केले. ऑगस्ट २०१९ मध्ये राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये जमाव हत्यांविरोधात कायदे करण्यात आले आहेत.

प्र.क्र. ७ – योग्य पर्याय क्र. (३) ‘अन स्टॉपेबल : माय लाइफ सो फार – मारिया शारापोवा’ ही जोडी बरोबर आहे. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत.

पर्यायांतील पुस्तके आणि त्यांचे लेखक यांच्या योग्य जोडय़ा पुढीलप्रमाणे –

डायरी ऑफ मनू गांधी – प्रल्हाद सिंग पटेल;

टब्र्युलन्स अँड ट्रायम्फ -द मोदी इयर्स – राहुल अग्रवाल, भारती प्रधान;

कन्फेशन ऑफ अ डाइंग माइंड – हॉलीनलाल गुटे

प्र.क्र. ८ – योग्य पर्याय क्र. (१)