05 August 2020

News Flash

कर सहायक पदनिहाय पेपरची तयारी

मागील लेखामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित व नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.

एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित व नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. उर्वरित घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

पंचवार्षकि योजना 

 • पंचवार्षकि योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.
 •  योजनेचा कालावधी, योजनेची घोषित ध्येये हेतू आणि त्याबाबतची पाश्र्वभूमी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, योजनेतील सामाजिक पलू, सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना
 •   योजनेचे मूल्यमापन व यश / अपयशाची कारणे, परिणाम
 •    योजनाकाळात घडलेल्या उल्लेखनीय आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना
 •    योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक व शैक्षणिक धोरणे
 •     योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.

पुस्तपालन आणि लेखाकर्म

 •  पुस्तपालन आणि लेखाकर्म या दोन्ही बाबी रोजच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा पाया आहेत. त्यामुळे दोन्हीमधील तरतुदींमागची कारणे समजून घेतल्यास कुठे काय चपखल बसते हे सामान्यज्ञानाच्या आधारावर लक्षात येऊ शकते. म्हणून या घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी यातील पारंपरिक बाबी म्हणजेच व्याख्या, तरतुदी, नोंदींची कारणमीमांसा, स्थान व मर्यादा, किंमती आणि मूल्यांच्या गणनेच्या पद्धती व त्यामागील कारणमीमांसा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
 •  या घटकावरील प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवीच्या स्तराची असेल हे आयोगाने विहीत केले आहे. संकल्पनात्मक आणि पारंपरिक प्रश्नांवर भर देण्यात आलेला आहे. हे प्रश्न मूलभूत संकल्पना समजून घेतल्यास आणि नेमका आणि मुद्देसूद अभ्यास केल्यास आत्मविश्वासाने सोडविता येतील. त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासक्रमातील कोणताच मुद्दा वगळू नये.
 •   मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तरी त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन माहीत असायला हवे. कारण एखादे उदाहरण देऊन त्यामध्ये नियमांच्या आधारे किंवा पुस्तपालनातील कोणती पद्धत व्यवहार्य ठरते तो पर्याय शोधण्यासारखे प्रश्नही विचारलेले दिसून येतात. त्यामुळे नियम वा पद्धतींचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे खूप उपयोगी ठरेल.
 •  बँक जुळवणी पत्रक, घसारा मूल्य इत्यादी बाबत गणिते विचारण्यात आली आहेत. गणितांचे स्वरूप पाहता ती कमी वेळेत सोडविता येतील अशी असल्याचे दिसते. यासाठी नियमांची माहिती आणि त्यांचा योग्य वापर करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे पदवीपर्यंतच्या पुस्तकांमधील वेगवेगळी उदाहरणे आणि गणिते सोडवण्याचा सराव महत्त्वाचा आहे.

 

आर्थिक सुधारणा आणि कायदे

 •     या घटकावर २० प्रश्न विचारण्यात आले आहेत. पारंपरिक, तथ्यात्मक, बहुविधानी, मूलभूत संकल्पनांवर आधारीत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत.
 •    घटकाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट प्रत्येक मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामुळे तयारी करताना सर्व मुद्दे व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
 •    आर्थिक सुधारणांशी संबंधित सर्व मूलभूत संकल्पना समजून घेणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. आर्थिक सुधारणामध्ये समाविष्ट कर, आयात, निर्यात, उद्योगस्न्ोही धोरणे, शासनाची भूमिका याबाबतचे मुद्दे समजून घ्यायला हवेत.
 •    उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुरू करण्यात आलेले बदल, नव्या बाबी कालानुक्रमे व कारणमीमांसा समजून घेऊन अभ्यासणे आवश्यक आहे. यामध्ये तथ्यात्मक बाबींवरही सारखाच भर द्यावा.
 •   जागतिकीकरणामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ठळक व दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णय, ठराव आणि इतर घडामोडींचा अभ्यास कालानुक्रम लक्षात घेऊन करावा. प्रत्येक ठळक निर्णयामागील कारणे, पाश्र्वभूमी, आणि परिणाम समजून घ्यावेत. याबाबतच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
 •     उदारीकरण आणि खासगीकरणाबाबतच्या निर्णयांची पाश्र्वभूमी, स्वरूप आणि त्यामूळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले लक्षणीय बदल समजून घ्यावेत. याबाबत सार्वजनिक वित्त आणि सूक्ष्म अर्थशास्त्र (Macro & Micro economics) या दोन्हींवरील परिणाम समजून घेणे उपयुक्त ठरेल. याबाबतच्या चालू घडामोडींबाबत सजग राहणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे.
 •  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, बँकिंग, परकीय चलन व्यवस्थापन, परकीय गुंतवणूक, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, सार्वजनिक खर्चावरील मर्यादा या सर्व बाबींमधील मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात. तसेच यांचेशी संबंधित महत्त्वाचे आणि सध्या लागू असलेले कायदे पाहायला हवेत. यामध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा, वित्तीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, वस्तू व सेवा कर कायदा, विविध क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा या बाबींचा आढावा घ्यायला हवा.
 •    कररचना, बँकिंग, सार्वजनिक वित्त याबाबत शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचा आढावाही उपयुक्त ठरेल. समिती, विषय व ठळक शिफारशी अशा मुद्यांच्या आधारे कोष्टकामध्ये टिप्पणे काढणे पुरेसे ठरेल.
 •   जागतिक बँक समूह, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, एशियन डेव्हलपमेंट बँक या आणि तत्सम आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक संघटना / संस्थांचा अभ्यास स्थापनेची पाश्र्वभूमी, उद्देश, सदस्य, महत्त्वाचे अद्ययावत निर्णय, त्याबाबत भारताची भूमिका या मुद्यांच्या आधारे करावा. या बाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 1:03 am

Web Title: mpsc exam preparation akp 94 12
Next Stories
1 तंत्रज्ञान, आर्थिक विकास आणि इतर
2 शतकापूर्वीचे शिक्षण केंद्र सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
3 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा सराव प्रश्न
Just Now!
X