08 August 2020

News Flash

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदनिहाय घटक विश्लेषण

पदासाठी विहित अभ्यासक्रमातील काही मुद्दे बाकीच्या पदनिहाय पेपर्समध्ये सामायिक आहेत तर काही मुद्दे स्वतंत्र.

एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पदनिहाय पेपर मागील वर्षी पहिल्यांदा झाला. या पदासाठी विहित अभ्यासक्रमातील काही मुद्दे बाकीच्या पदनिहाय पेपर्समध्ये सामायिक आहेत तर काही मुद्दे स्वतंत्र. पदनिहाय पेपरमधील भारतीय राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रमातील कायदे व नियमपुस्तिका खंड या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे. यासाठी मागील वर्षीच्या पेपरमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

 

(प्रश्नातील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

प्रश्न – विधान परिषदेबाबत खालीलपकी कोणते चुकीचे आहे?

१)      सामान्य विधेयकास विधान परिषद जास्तीतजास्त सहा महिन्यांसाठी रोखू शकते किंवा विलंब करू शकते.

२)      ते फक्त उशीर लावू शकणारे गृह किंवा सल्लागार संस्था आहे.

३)      घटनादुरुस्ती विधेयकाच्या संमतीमध्ये विधान परिषदेला प्रभावी स्थान नसते.

४)      विधान परिषदेचे अस्तित्वच विधानसभेच्या इच्छेवर अवलंबून असते.

 

प्रश्न – खालील तरतुदीचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या — या भागात केला आहे?

‘राज्य ग्राम पंचायती स्थापण्याची योजना करील, त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देवून समर्थ बनविण्यासाठी पावले उचलेल.’

१)      भाग १ – संघ आणि तिचे राज्ये किंवा प्रांत

२)      भाग ४ – राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

३)      भाग ९ – स्थानिक स्व-शासन (पंचायती राज)

४)      भाग ३ – मूलभूत अधिकार

प्रश्न – ‘अ’ आणि ‘ब’च्या लग्नात ‘अ’च्या वडिलांनी ‘ब’च्या वडिलांकडे मोटारगाडी घेण्यासाठी रु. ५ लाख मागितले. त्याप्रमाणे ‘ब’च्या वडिलांनी वरील पसे विवाहानंतर एक आठवडय़ात ‘अ’च्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ ‘क’ यांच्याकडे दिले.

वरील उदाहरणात हुंडा बंदी अधिनियम, १९६१च्या अंतर्गत कोण दोषी ठरेल?

१) ‘अ’चे वडील

२) ‘ब’चे वडील

३) क         ४) वरील सर्व

 

प्रश्न – मानवी हक्क म्हणजे —

१)      जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान यांच्याशी संबंधित व्यक्तीचे अधिकार.

२)      प्रथा, परंपरा, पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयाचा दाखला याद्वारे मिळालेले अधिकार.

३)      स्थानिक कायद्यांद्वारे दिलेले अधिकार.

४) ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दिलेले अधिकार.

 

प्रश्न – पुढील विधानांचा प्रोहिबिशन कायद्याच्या संदर्भात विचार करा.

अ.      या कायद्याअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र आहेत.

ब.      या कायद्याअंतर्गत नेमलेल्या प्रोहिबिशन अधिकाऱ्याला कलम १२३ प्रमाणे, वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.

पर्यायी उत्तरे

१) अ बरोबर असून, ब चूक आहे.

२) अ चूक असून, ब बरोबर आहे.

३) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

४) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

प्रश्न –  महाराष्ट्रात अफू ओढण्यासंबंधीच्या अधिनियम, (१९३६चा २०)च्या कलम ७नुसार,जी कोणतीही व्यक्ती अफू ओढणाऱ्या जमावाचा सदस्य असेल, तिला सिद्धअपराध ठरविण्यात आले असता—– कारावासाची शिक्षा आणि —– रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही होतील.

१) ३ महिने, ५०० रु.

२) ६ महिने, १,०००रु.

३) १ वर्ष, २०००रु.

४) ३ वष्रे, ५,०००रु.

 

ल्ल      प्रश्न – अमली पदार्थ औषधे आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५हा खालील कोणत्या हेतूने करण्यात आला आहे?

अ.      अमली पदार्थाच्या औषधांशी संबंधित विद्यमान कायद्यात एकत्रीकरण आणि सुधारणा.

ब.      वरील कायद्याशी संबंधित पदार्थाच्या बाबतीत कडक नियम बनवणे.

क.      मादक द्रव्यांच्या अवैध वाहतुकीमधून प्राप्त मालमतेची जप्ती

ड.      सदर कायद्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मान्य झालेले करार लागू करणे.

पर्यायी उत्तरे

१) फक्त ब

२) फक्त ब आणि क

३) फक्तक आणि ड

४) अ, ब, क आणि ड

 

प्रश्न – महाराष्ट्र औषधे (नियंत्रण) नियम, १९६३च्या कोणत्या नियमान्वये अधिसूचित औषधांच्या किरकोळ विक्रेत्याची अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येणे?

१) नियम ४              २) नियम ५

३) नियम ६              ४) नियम ७

 

  •    भारतीय राज्यघटना घटकावर १० प्रश्न, मानवी हक्क व जबाबदाऱ्या घटकावर १० प्रश्न आणि कायदे व नियमपुस्तिका खंड या घटकांवर एकत्रितपणे ४० प्रश्न विचारलेले आहेत.
  •    राज्यघटनेच्या तरतुदींमागील तत्त्वज्ञान, घटनेचा विकास, महत्त्वाची कलमे, कायदेमंडळाचे कार्य व अधिकार, राजकीय व्यवस्थेची तथ्यात्मक माहिती अशा मुद्दय़ांच्या आधारे प्रश्न विचारलेले दिसून येतात.
  •      मानवी हक्क व जबाबदाऱ्या घटकामध्ये मानवी हक्कांची व्याख्या, वैशिष्टय़े, मानवी हक्क संरक्षणासाठीच्या कायद्यांमधील तरतुदी, मानवी हक्क आयोगाची कार्यपद्धती, मानवी हक्कांशी संबंधित योजना अशा मुद्दय़ांवर प्रश्न विचारलेले आहेत.
  •     अभ्यासक्रमातील कायदे व नियमपुस्तिका खंड यांचा मुळातून अभ्यास आवश्यक असल्याचे प्रश्नांच्या विश्लेषणातून लक्षात येते. त्यामुळे संबंधित कायदा लागू करणारा प्राधिकारी, व्याप्तीचे क्षेत्र, व्याख्या, अंमलबजावणीसाठीच्या नेमक्या तरतुदी व नियम, अंमलबजावणी अधिकारी, दंड, शिक्षा, अपवाद अशा मुद्दय़ांच्या आधारे प्रश्न विचारलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:41 am

Web Title: mpsc exam preparation akp 94 7
Next Stories
1 अरुंधती दर्शन न्याय
2 भारत आणि जग
3 भारत आणि शेजारील देश
Just Now!
X