27 January 2021

News Flash

एमपीएससी मंत्र : यूएन फॅमिली तथ्यात्मक अभ्यास

संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संघटना यांबाबत चर्चा करण्यात येत आहे.

रोहिणी शहा

संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना व तिचे मुख्य सहा घटक यांची माहिती मागील लेखामध्ये पाहिली. या लेखामध्ये यूएन फॅमिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संघटना यांबाबत चर्चा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांची विशेष अभिकरणे, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेले निधी व कार्यक्रम यांचा या संयुक्त राष्ट्र कुटुंबामध्ये समावेश होतो. या संघटनांचे स्वतंत्र निधी, नेतृत्व आणि रचना असते.

संयुक्त राष्ट्रांची विशेष अभिकरणे

ही अभिकरणे म्हणजे संयुक्त राष्ट्रांसोबत कार्यरत असणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत. यांपैकी काही संयुक्त राष्ट्रांच्या आधी स्थापन झालेली आहेत, काही अभिकरणे राष्ट्रसंघाशी संलग्न होती तर काही अभिकरणे ही संयुक्त राष्ट्रांबरोबर समांतरपणे स्थापन झालेली आहेत.

अन्न व कृषी संघटना

(स्थापना – १६ ऑक्टोबर १९४५)

मुख्यालय – रोम, इटली

उद्देश – जागतिक अन्न सुरक्षितता आणि भूकमुक्ती

सदस्य देश – १९४ देश, १ सदस्य संघटना आणि २ निरीक्षक देश (व्हॅटिकन सिटी आणी पॅलेस्टाईन)

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद ((ECOSOC)

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी

(स्थापना – १५ डिसेंबर १९७७)

मुख्यालय – रोम, इटली

उद्देश – ग्रामीण भागातील दारिद्रय़ निवारण आणि भूकमुक्ती

सदस्य देश – १७७

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

आंतरराष्ट्रीय जलवाहतूक संघटना

(स्थापना – १७ मार्च १९४८)

मुख्यालय – लंडन, ब्रिटन

उद्देश – आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचे नियंत्रण व सदस्य देशांना तांत्रिक साहाय्य

सदस्य देश – १७४

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना

(स्थापना – ४ एप्रिल १९४७)

मुख्यालय – मान्ट्रिअल, कॅनडा

उद्देश – आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन, मानकीकरण

सदस्य देश – १९३ (यातील कुक बेटे हा देश संयुक्त राष्ट्रांचा सदस्य नाही.)

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद ((ECOSOC)

आंतरराष्ट्रीय दळणवळण संघटना

(स्थापना – १७ मे १८६५)

मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्र्झलड

उद्देश – आंतरराष्ट्रीय स्तरावर दळणवळण व्यवस्थापन, मानकनिश्चिती आणि विकास

सदस्य देश – १९३, ९०० कंपनी आणि आस्थापना

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद ((ECOSOC))

आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (सन १९१९)

मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्र्झलड

उद्देश – श्रमविषयक मानके ठरविणे, कामगारांच्या हक्कांचे संवर्धन, कामगारांची सामाजिक सुरक्षितता

सदस्य देश – १८७ देश, कामगार संघटना आणि उद्योगांचे मालक अशी त्रिपक्षीय संघटना

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC) व सर्वसाधारण सभा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(स्थापना – २७ डिसेंबर १९४५)

मुख्यालय – वॉशिंग्टन डी. सी.

उद्देश – आंतरराष्ट्रीय स्तरावर चलन व्यवस्थापन करणे तसेच चलन विनिमय दर व्यवस्थापन

सदस्य देश – १९०

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रे

जागतिक बँक समूह

(स्थापना – जुलै १९४४)

मुख्यालय – वॉशिंग्टन डी. सी.

उद्देश – अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सदस्यांना भांडवली प्रकल्पांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्जपुरवठा

सदस्य देश – १८९

युनेस्को

(स्थापना – ४ नोव्हेंबर १९४५)

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO)

मुख्यालय – पॅरिस, फ्रान्स

उद्देश – शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे.

सदस्य देश – १९३ व ११ सहकारी सदस्य

संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (स्थापना – १७ नोव्हेंबर १९६६)

मुख्यालय –  व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

उद्देश – विकसनशील देशांमध्ये औद्योगिक विकासास साहाय्य

सदस्य देश – १७०

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना

(स्थापना – १ नोव्हेंबर १९७४)

मुख्यालय – माद्रिद, स्पेन

उद्देश – शाश्वत पर्यटनास चालना देणे आणि त्याद्वारे आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय शांतता व मानवी हक्कांची जपणूक करणे.

सदस्य देश – १५९

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

जागतिक पोस्ट संघटना

(स्थापना – ९ ऑक्टोबर १८७४)

मुख्यालय – बर्न, स्वित्र्झलड

उद्देश – जागतिक स्तरावर पोस्ट/ टपाल व संबंधित सेवांचे व्यवस्थापन व सहकार्य

सदस्य देश – १९२

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

जागतिक आरोग्य संघटना

(स्थापना – ७ एप्रिल १९४८)

मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्र्झलड

उद्देश – सार्वत्रिक आरोग्यनिश्चिती आणि जागतिक स्तरावरील सार्वजनिक आरोग्याचे संवर्धन

सदस्य देश – १९४

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC))

जागतिक बौद्धिक संपदा संघटना

(स्थापना – १४ जुलै १९६७)

मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्र्झलड

उद्देश – नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे जागतिक स्तरावर बौद्धिक संपदा अधिकारांचे नियमन करणे

सदस्य देश – १९३

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

जागतिक हवामानशास्त्र संघटना

(स्थापना – २३ मार्च १९५०)

मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्र्झलड

उद्देश – हवामानविषयक तसेच जलशास्त्रीय माहितीचे आदानप्रदान

सदस्य देश – १९३

पालक संघटना – संयुक्त राष्ट्रांची आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:06 am

Web Title: mpsc exam preparation tips in marathi mpsc exam 2020 zws 70 3
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सुरक्षा
2 एमपीएससी मंत्र  : संयुक्त राष्ट्रांची ७५ वर्षे सिंहावलोकन
3 यूपीएससीची तयारी : आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन
Just Now!
X