रोहिणी शहा

चालू घडामोडींमध्ये पर्यावरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे पर्यावरणामध्ये होणारे बदल हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत घडणाऱ्या सर्व अद्ययावत बाबींबाबत माहिती असणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रातील पर्यावरणविषयक घडामोडी या राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. या लेखामध्ये महाराष्ट्रातील पर्यावरणविषयक घडामोडींबाबत चर्चा करण्यात येत आहे.

Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

मुंबईसाठी एकात्मिक पूर इशारा प्रणाली — IFLOWS—MUMBAI

जागतिक तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे भारतामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अनेकदा महापुराचा सामना करावा लागला आहे. पूर आणि संभाव्य धोक्यांचा इशारा योग्य वेळी मिळाल्यास कमीत कमी हानी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील या हेतूने मुंबईसाठी एकात्मिक पूर इशारा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे: – (Integrated Flood Warning System (IFLOWS) असे या प्रणालीचे सविस्तर नाव आहे.

*  ही प्रणाली बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भू विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांनी साकारली आहे. नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटोरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थांकडे उपलब्ध माहिती (डाटा), प्रारूपे आणि प्रणाली यांच्या आधारावर ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.

* ही यंत्रणा किमान सहा ते कमाल ७२ तास आधी पुराचे आणि संभाव्य प्रवण क्षेत्रे यांबाबत इशारे देण्यास सक्षम आहे.

* पूरप्रवण क्षेत्रे, पूर पातळीची कमाल उंची किती असू शकेल, संपूर्ण शहरातील प्रभागांमधील पुराचा धोका तसेच उद्भवणारी संभाव्य जोखीम यांचाही अंदाज वर्तवण्यास ही प्रणाली सक्षम आहे.

* पर्जन्यमान (पावसाचा अंदाज) हा या प्रणालीसाठी मुख्य स्रोत असला तरी मुंबई हे समुद्रकिनाऱ्यावरील शहर असल्याने भरती आणि वादळी लाटा यांच्या अंदाजाचाही पुराचे इशारे देण्यापूर्वी आधार यामध्ये घेतला जातो.

* दि. १२ जून २०२० रोजी या पूर इशारा प्रणालीची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे.

* ही यंत्रणा कार्यान्वित होणारे मुंबई हे चेन्नईनंतरचे देशातील दुसरे शहर आहे.

* मुंबईमध्ये दि. २६ जुलै २००५ रोजी २४ तासांच्या कालावधीत १०० वर्षांतील सर्वाधिक ९४ सेंटिमीटर पाऊस पडला होता.

लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये रंगबदल

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ामध्ये लोणार सरोवराचा रंग गुलाबी/लाल झालेला दिसून आला. नासाच्या दुर्बिणीतून दि. १२ जून रोजी घेण्यात आलेल्या छायाचित्रांवरून हा रंगबदल लक्षात आला.

*  बुलडाणा शहराच्या दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला ९० किमी अंतरावर लोणार अभयारण्यामध्ये लोणार गावालगत उल्कापातामुळे तयार झालेले हे खाऱ्या पाण्याचे वैशिष्टय़पूर्ण सरोवर आहे.

* प्लीस्टोसीन कालखंडामध्ये सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी बेसॉल्ट खडकावर उल्कापात (हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराइट इम्पॅक्ट) होऊन निर्माण झालेल्या विवरामध्ये पाणी साठून या सरोवराची निर्मिती झाली आहे. हे सरोवर जगातील सर्वात ‘कमी वयाचे’ (नवे) उल्का विवर सरोवर (impact crater lake)  आहे. मास्केलाईन तसेच ग्रहीय विरूपीकृत प्रारूपे (planar deformation features)  यांच्या स्वरूपात हे विवर सरोवर असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत.

*  सरोवराचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास एक हजार ७८७ मीटर, तर उत्तर-दक्षिण व्यास एक हजार ८७५ मीटर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४६४.६३ मीटर असून खोली १५० मीटर आहे.

* या सरोवरामधील पाण्याची क्षारता आणि यातील विशिष्ट शैवाल (Hanobacterium आणि Dunaliella Salina)  यामुळे हा रंगबदल झाला असावा असा प्राथमिक अंदाज याबाबत पर्यावरणतज्ज्ञ आणि भूवैज्ञानिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

*  लोणार सरोवराचे पाणी हे अल्कधर्मी असून सामान्यपणे या पाण्याचे Ph मूल्य हे ७ पेक्षा जास्त असते आणि बाष्पीभवनाचा वेग जास्त असेल त्या काळात ते ११ पर्यंत पोचते. लोणार हे अल्कधर्मी आणि क्षारीय सरोवर आहे. सामान्यपणे ७ पेक्षा जास्त ढँ मूल्य असणाऱ्या पाण्यास अल्कधर्मी म्हटले जाते, तर ज्या अल्कधर्मी पाण्यामध्ये सोडियमचे क्षार जास्त असतात त्यास क्षारीय सरोवर (Soda lake)  म्हणतात.

* लोणार सरोवर हे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतामध्ये एकूण ३४ राष्ट्रीय भूवारसा स्थळे आहेत. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील एकमेव भूवारसा स्थळ आहे. सर्वाधिक १२ भूवारसा स्थळे ही राजस्थानमध्ये आहेत.